Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘संपूर्ण जगात कुठेही मोफत शिक्षण आणि स्कॉलरशिप…’ वैभव सूर्यवंशीवर फिदा ललित मोदी, दिली मोठी ऑफर

आयपीएल २०२६ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या वैभव सूर्यवंशीला ललित मोदींनी एक मोठी ऑफर दिली आहे. त्याने या हंगामात ७०० हून अधिक धावा केल्या आहेत. कुठेही शिक्षणात बाधा येऊ नये म्हणून ललित मोदींची ऑफर

  • By दिपाली नाफडे
Updated On: May 30, 2026 | 10:28 AM
ललित मोदीचा वैभव सूर्यवंशीला मोठा प्रस्ताव (फोटो सौजन्य - X.com/Instagram)

ललित मोदीचा वैभव सूर्यवंशीला मोठा प्रस्ताव (फोटो सौजन्य - X.com/Instagram)

Follow Us
Follow Us:
  • ललित मोदीने दिली वैभव सूर्यवंशीला मोठी ऑफर 
  • संपूर्ण जगात कुठेही शिक्षण मोफत 
  • वैभव सूर्यवंशीला मिळणार शैक्षणिक स्कॉलरशिप 
आयपीएलचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी १५ वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशीला आयपीएलच्या इतिहासातील राजस्थान रॉयलची सर्वोत्तम खरेदी म्हटले आहे. गुजरात टायटन्सविरुद्ध क्वालिफायर २ मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना वैभवने अवघ्या ४७ चेंडूंमध्ये ९६ धावांची धडाकेबाज खेळी केली. या स्फोटक खेळीदरम्यान वैभवने सात षटकार ठोकले. वैभव केवळ १५ वर्षांचा आहे आणि त्याची खेळी ही अत्यंत क्लासी आहे. मोठमोठ्या गोलंदाजानाही मैदानावर वैभव घाम फोडतो आणि सर्वांनीच त्याचे कौतुक केले आहे. त्याने या आयपीएलमध्ये अनेक रेकॉर्ड्सही मोडले आहेत. दरम्यान भारतासाठी त्याने खेळावे असं अनेकांचं म्हणणं आहे. 

ललित मोदींचे भावनिक ट्विट आणि मोठी घोषणा

Today, Vaibhav Sooryavanshi may have fallen four runs short of a century. But in my view, he achieved something far greater. He woke up an entire nation to what fearless young talent looks like. As someone who has always believed that sport must create opportunity, not just… pic.twitter.com/bvHADvIR6v — Lalit Kumar Modi (@LalitKModi) May 29, 2026

वैभवच्या निर्भय फलंदाजीने प्रभावित होऊन, ललित मोदींनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक लांब आणि भावनिक पोस्ट लिहिली. त्यांनी वैभवच्या कामगिरीचे वर्णन ‘धावांच्या पलीकडचे’ असे केले आणि त्याला जगभरात कुठेही मोफत शिक्षण घेण्यासाठी पूर्ण शिष्यवृत्तीची घोषणा केली. ललित मोदींनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले, “आज वैभव सूर्यवंशी कदाचित शतक पूर्ण करण्यापासून चार धावा दूर राहिला असेल, पण माझ्या मते त्याने त्याहूनही मोठी गोष्ट साध्य केली आहे. एक निर्भय तरुण प्रतिभा म्हणजे काय असते, हे त्याने संपूर्ण देशाला दाखवून दिले आहे.”

RR vs GT: शेवटपर्यंत लढला अन्…डोळ्यात आले पाणी; फायनलचे स्वप्नं भंंगले, Vaibhav Sooryavanshi रोखू शकला नाही अश्रू

वैभव सूर्यवंशीला दिला प्रस्ताव

ललित मोदींनी ट्विटमध्ये पुढे लिहिले, “खेळाने केवळ मनोरंजनच नाही तर संधीही निर्माण केल्या पाहिजेत, यावर माझा नेहमीच विश्वास राहिला आहे. त्यामुळे, जर वैभवला भविष्यात शिक्षण घेण्याची इच्छा झाली, तर मी त्याला जगातील कोणत्याही विद्यापीठात किंवा महाविद्यालयात पूर्ण शैक्षणिक शिष्यवृत्ती देऊ इच्छितो, ज्याचा संपूर्ण खर्च उचलला जाईल. हे त्याने केलेल्या धावांसाठी नाही. तर त्याने लाखो तरुण भारतीयांना दिलेल्या धैर्यासाठी, विश्वासासाठी आणि प्रेरणेसाठी आहे. प्रतिभेला शिक्षण आणि महानता यापैकी एकाची निवड करण्यास कधीही भाग पाडले जाऊ नये.”

वैभवने कमाल केली

आयपीएल २०२६ हे वैभव सूर्यवंशीसाठी एक स्वप्न होते. त्याने या हंगामात १६ सामन्यांमध्ये ७७६ धावा केल्या आणि ऑरेंज कॅपही जिंकली. त्याचा स्ट्राइक रेट २३० पेक्षा जास्त होता. संपूर्ण हंगामात निर्भयपणे फलंदाजी करत, वैभव आपल्या संघाला दुसरी आयपीएल ट्रॉफी जिंकून देण्याच्या अगदी जवळ पोहोचला होता. मात्र गुजरात टायटन्सकडून हार पत्करावी लागल्यानंतर वैभव अत्यंत निराश झाला आणि त्याचे अनेक व्हिडिओही व्हायरल होत आहेत. 

अवघ्या १५ वर्षांच्या या मुलाच्या खेळीने जगाला वेड लावलं आहे इतकं मात्र नक्की. केवळ वैभवसाठी राजस्थान रॉयलने जिंकावं अशीच सर्वांची अपेक्षा होती. मात्र वैभव, फरेरा आणि जडेजा वगळून कोणीही क्वालिफायरमध्ये चांगली कामगिरी करू शकले नाही आणि त्याचाच परिणाम टीम फायनलमध्ये पोहचू शकली नाही. 

Vaibhav Suryvanshi चा नादच खुळा! नावावर केला ‘हा’ महारेकॉर्ड; ठरला पहिला भारतीय फलंदाज

Web Title: Ipl 2026 vaibhav sooryavanshi got offer from lalit modi free education and scholarship anywhere in the world

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 10:26 AM

Topics:  

  • IPL 2026
  • Lalit Modi
  • Vaibhav Sooryavanshi

संबंधित बातम्या

Baby Boss वैभव सूर्यवंशीसाठी मोठा धोका! 6 फूट 8 इंच उंचीचा बॉलर पाहतोय वाट, आर्चरनंतर आता अजून मोठा अडथळा
1

Baby Boss वैभव सूर्यवंशीसाठी मोठा धोका! 6 फूट 8 इंच उंचीचा बॉलर पाहतोय वाट, आर्चरनंतर आता अजून मोठा अडथळा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.