
IPL : मुंबई इंडियन्समध्ये पुन्हा मोठ्या हालचाली, आता 'हा' कोचिंग स्टाफ पडला बाहेर
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2027 आधी पाच वेळचा गतविजेता संघ मुंबई इंडियन्स (MI)च्या कोचिंग सेटअपमधील बदल कायम राहिल्याचे पाहण्यास मिळत आहे. लसिथ मलिंगा, पारस म्हांब्रे आणि कार्ल हॉपकिंसन हे देखील मुंबई इंडियन्सच्या कोचिंग स्टाफमधून वेगळे झाले आहेत. याबाबतची माहिती स्वतः मुंबई इंडियन्सने गुरुवारी दिली.
मुंबई इंडियन्सने आपल्या वेब साइटवर दिलेल्या माहितीनुसार, लसिथ मलिंगा, पारस म्हांब्रे आणि कार्ल हॉपकिंसन पुरुष संघाच्या कोचिंग सेटअपमधून आपापल्या भूमिकेतून मुक्त होत आहेत. आम्ही फ्रँचायजी प्रति त्यांची वचनबद्धता, योगदान आणि सेवांसाठी आभार मानतो.
लसिथ मलिंगा मुंबई इंडियन्स कुटुंबातील एक महत्त्वाचा भाग राहिला आहे. तो फ्रँचायजीच्या इतिहासात सर्वात आयकॉनिक लोकांपैकी एक आहे. एमआयच्या बॉलिंग अटॅकला लीड करणे आणि चार आयपीएल जेतेपद जिंकणे, तसेच 2011 चॅम्पियन्स लीग टी-20 च्या विजयात त्याची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. तसेच एक मेंटर आणि एका प्रशिक्षकाच्या रुपात परतण्यापर्यंत, एमआयसोबतचा त्याचा प्रवास खास राहिला आहे. त्याच्यातील झुंजवृत्ती, प्रतीस्पर्धी भावणा आणि संघाबाबतची वचनबद्धतेने अनेक पिढ्यांतील खेळाडूंला प्रेरणा दिली. त्याचा वारसा मुंबई इंडियन्सचा एक महत्त्वाचा भाग म्हणून राहिल.
पारस म्हांब्रेचे मुंबई इंडियन्ससोबत एक लांब व किमती नाते राहिले आहे. अगोदर 2010 आणि 2017 पर्यंत त्यानंतर 2024 मध्ये एमआयमध्ये पुन्हा पुनरागमन, दोन्ही वेळा पारस खुपच जास्त अनुभव आणि क्रिकेट संस्कृतीतील बारकावे शिकून एमआयमध्ये आला होता. संघातील नव्या गोलंदाजांना विकसित करणे. त्यांच्या खेळात सुधारणा करण्यासाठी पारस म्हांब्रेचा हात कोणीच पकडू शकत नव्हता. गोलंदाजांच्या चांगल्या कामगिरीबाबत त्याची वेळोवेळी स्तुती करण्यात आली आहे.
दरम्यान, कार्ल हॉपकिंसन 2025 च्या हंगामात मुंबई इंडियन्समध्ये समाविष्ट झाला होता. तो इंग्लंड पुरुष संघातील एक महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय अनुभव घेऊन फ्रँचायजीमध्ये आलेला. संघातील क्षेत्ररक्षण विभागात सुधारणा करण्यास त्याने मोलाची कामगिरी बजावली. तसेच व्यावसायिक भूमिका, विशेषज्ज्ञता आणि वचनबद्धतेसंदर्भात तो फ्रँचायजीसोबत चांगला असल्याचे सांगण्यात आले.
कांगारुंसाठी आनंदाची बातमी! ‘या’ महिन्यात Steve Smith करणार पुनरागमन
यावेळी एमआयच्या व्यवस्थापनाने तिघांचे आभार मानले. एमआय कुटुंबाकडून लसिथ, पारस आणि कार्लचे मनापासून आभार. त्यांनी फ्रँचायजीच्या प्रवासात नेहमीच मोलाचे योगदान दिले. त्यांच्यासोबतचे नाते व आठवणी आमच्या फ्रँचायजीचा नेहमीच भाग राहतील. आम्ही त्यांच्या भविष्यातील कारकिर्दीसाठी शुभेच्छा देतो. मुंबई इंडियन्समध्ये लसिथ मलिंगा आणि पासर म्हांब्रे गोलंदाजी प्रशिक्षक होते, तर कार्ल हॉपकिंसन क्षेत्ररक्षक प्रशिक्षकाच्या रुपात कार्यरत होता.
Ans: लसिथ मलिंगा, पारस म्हांब्रे आणि कार्ल हॉपकिंसन हे मुंबई इंडियन्सच्या पुरुष संघाच्या कोचिंग स्टाफमधून बाहेर पडले आहेत.
Ans: लसिथ मलिंगा मुंबई इंडियन्सचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून कार्यरत होता. खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून त्याचे संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे.
Ans: IPL 2027 च्या आधी मुंबई इंडियन्सने या तीन प्रशिक्षकांना त्यांच्या भूमिकांतून मुक्त केल्याची माहिती दिली आहे.