
IPL 2027 mini auction venue date
लिलावापूर्वी, सर्व १० फ्रँचायझींनी १५ नोव्हेंबरपर्यंत त्यांच्या रिटेन ठेवलेल्या खेळाडूंची यादी सादर करणे आवश्यक आहे. यामध्ये ते कोणत्या खेळाडूंना रिटेन ठेवणार आहेत आणि कोणाला रिलीज करणार आहेत, याची यादी जाहीर करतील. लिलावाच्या सुमारे एक आठवडा आधी फ्रँचायझींना अंतिम माहिती मिळणे अपेक्षित असते. यामध्ये खेळाडूंची यादी आणि त्यांच्या बोलीचा संपूर्ण तपशील समाविष्ट असेल. याच्या आधारे, संघ आपली रणनीती तयार करू शकतील आणि गरजेनुसार नवीन खेळाडू मिळवण्याची योजना आखू शकतील.
आयपीएल २०२६ हंगाम संपल्यानंतर खेळाडूंच्या ट्रेड प्रक्रियाही दिसून आली आहे. आयपीएलच्या नियमांनुसार, हंगाम संपल्यानंतर सुमारे एक महिन्याने खेळाडूंच्या ट्रेड विंडो उघडते आणि लिलावाच्या सुमारे एक आठवडा आधीपर्यंत सुरू राहते. यानंतर, नवीन हंगाम सुरू होण्याच्या सुमारे एक महिना आधी ही विंडो पुन्हा उघडते.
आतापर्यंत जाहीर झालेल्या दोन मोठ्या खेळाडूंच्या ट्रेडमध्ये ऋषभ पंत, कुलदीप यादव, टी नटराजन आणि झीशान अन्सारी यांचा समावेश आहे. जूनमध्ये, ऋषभ पंत लखनौ सुपरजायंट्स सोडून दिल्ली कॅपिटल्समध्ये ताफ्यात गेला. तर त्या बदल्यात कुलदीप यादव लखनौ संघात सामील झाला होता. ताज्या ट्रेडमध्ये, दिल्ली कॅपिटल्सने वेगवान गोलंदाज टी नटराजनला सनरायझर्स हैदराबादला सोपवले, तर झीशान अन्सारी दिल्ली पुन्हा दिल्लीच्या ताफ्यात सामील झाला.
झीशान अन्सारीने अद्याप आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेले नाही आणि त्यामुळे त्याला अनकॅप्ड खेळाडू मानले जाते. फ्रँचायझी आपल्या गरजेनुसार खेळाडूंची ट्रेड करून आपल्या संघात बदल करू शकतात. त्यामुळे, मिनी लिलावापूर्वी आणखी खेळाडूंची ट्रेड होण्याची शक्यता आहे.
आयपीएल २०२७ चे संपूर्ण वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. परंतु, २०२४ मध्ये, बीसीसीआयने पुढील तीन हंगामांसाठी एक तात्पुरते वेळापत्रक जाहीर केले होते. यानुसार २०२७ ची स्पर्धा १४ मार्च ते ३० मे दरम्यान आयोजित केले जाऊ शकते.
मागील तीन आयपीएल लिलाव देशाबाहेर आयोजित करण्यात आले होते. २०२४ चा लिलाव दुबईमध्ये, २०२५ चा लिलाव सौदी अरेबियातील जेद्दाह येथे आणि २०२६ चा लिलाव अबू धाबी येथे झाला होता. आता तब्बल तीन वर्षानंतर मिनी लिलाव पुन्हा भारतात होत आहे.
Ans: IPL 2027 चा मिनी ऑक्शन १६ डिसेंबर २०२६ रोजी होण्याची शक्यता आहे.
Ans: मिनी ऑक्शन गोव्यात आयोजित केला जाऊ शकतो. मात्र, लिलावाचे ठिकाण अद्याप अधिकृतरीत्या निश्चित झालेले नाही.
Ans: सर्व फ्रँचायझींना १५ नोव्हेंबरपर्यंत रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी सादर करावी लागणार आहे.