Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Yashshvi jaiswal : वेस्ट इंडिजविरुद्ध वनडेत ‘त्याला’ संधी द्या, इरफान पठाणने केली यशस्वी जयस्वालची पाठराखण

Yashshvi jaiswal : यशस्वी जयस्वालला सलामीला येऊन खेळण्याची संधी मिळावी असे मत माजी अष्टपैलू इरफान पठाणने व्यक्त केले आहे. तसेच आगामी वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत नव्या खेळाडूंनी संधीचे सोनं करावं असा सल्लाही त्याने क्रिकेटपटूंना दिला आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Sep 19, 2026 | 04:56 PM
Yashshvi jaiswal : वेस्ट इंडिजविरुद्ध वनडेत 'त्याला' संधी द्या, इरफान पठाणने केली यशस्वी जयस्वालची पाठराखण

Yashshvi jaiswal : वेस्ट इंडिजविरुद्ध वनडेत 'त्याला' संधी द्या, इरफान पठाणने केली यशस्वी जयस्वालची पाठराखण

Follow Us
Follow Us:
  • वेस्ट इंडिजविरुद्ध भारत तीन सामने खेळणार
  • भारतीय संघात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी
  • संधीचं सोनं करा असा पठाणचा सल्ला
भारताचा माजी अष्टपैलू इरफान पठाणने यशस्वी जयस्वाल (Yashshvi jaiswal) ला पाठिंबा देत वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत संधी देण्याची वकिली केली. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका येत्या २७ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

यशस्वी नेहमीच भारतीय संघातील बॅकअप ओपनर म्हणजेच राखीव सलामीवीर म्हणून राहिला आहे. मात्र त्याला मिळालेल्या मर्यादीत संधीचे त्याने सोने केले. डावखुऱ्या या फलंदाजाने आतापर्यंत सहा वनडे सामन्यात दोन खणखणीत शतक ठोकले आहेत. कर्णधार शुभमन गिल व स्टार फलंदाज रोहित शर्मानंतर सलामीच्या रुपात त्याने स्वतःची एक जागा निर्माण केली आहे. भारत २७ सप्टेंबरपासून घरच्या मैदानात वेस्टइंडिजविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. अशात पठाण हे पाहण्यास उत्सुक आहे की, भारतीय संघ व्यवस्थापन डावखुऱ्या फलंदाजाला कशाप्रकारची संधी देतो, जेणेकरून विश्वचषक २०२७ आधी तो आपली लय कायम राखू शकेल.

पठाणकडून एक्सवर व्हिडीओ शेअर

पठाणने स्टार स्पोर्ट्सद्वारे आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तो म्हणतो की, या मालिकेत एका खेळाडूवर माझे लक्ष असेल. तो खेळाडू म्हणजे यशस्वी जयस्वाल. मी हे पाहण्यास उत्सुक आहे की, त्याला किती संधी मिळतात, खासकरून वेस्ट इंडिजविरुद्धच्या या वनडे मालिकेत. पठाण पुढे म्हणतो की, बघा, एक गोष्ट तर निश्चित आहे, ती म्हणजे जयस्वाल हा बॅकअप ओपनर आहे. तो सध्या आपला तिसरा ओपनर आहे. जोपर्यंत आपण साऊथ आफ्रिकेला (वनडे विश्वचषक) पोहचाल, तोपर्यंत असे होऊ नये की, आपल्या बॅकअप ओपनरला योग्य संधी मिळालेली नसेल. त्यामुळे जेव्हा देखील संधी मिळेल, त्याला खेळताना पाहणे माझ्यासाठी गरजेचे आहे.

Asian Games 2026: ‘भारतीय खेळाडूंची कामगिरी…’; Rishabh Pant चा व्हिडिओ Viral

मालिकेत नव्या क्रिकेटपटूंना संधी

आशियाई स्पर्धेत भारताने आपला बळकट संघ पाठवला आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत काही नव्या क्रिकेटपटूंना खेळण्याची संधी मिळणार आहे. याच नमन धीर (ज्याला पहिल्यांदा भारतीय संघात निवडण्यात आले), आकिब नबी (ज्याला पहिल्यांदा वनडेसाठी निवडण्यात आले) आणि नितीश कुमार रेड्डीचा समावेश आहे. पठाणच्या मते, वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका या खेळाडूंसाठी एक संधी असेल. श्रेयस, अक्षर आणि वॉशिंग्टन सुंदर हे आशियाई स्पर्धेसाठी गेलेत, त्यामुळे ते संघात नाहीत. त्यामुळे इतर खेळाडूंसाठी ही एक मोठी संधी आहे. हा एकप्रकारे वेगळा संघ आहे, ज्यात अनेक खेळाडूंना आजमावले जात आहे. नितीश कुमार रेड्डीला संधी मिळेल, जुरेलला संधी मिळेल. त्याचसोबत आकिब नबीला संधी मिळेल आणि गुरनूर बरारला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपल्या करिअरला पुढे नेण्याची ही नामी संधी असेल असेही पठाणला वाटते.

KKR ने टाकला डाव, Abhishek Nayar ने थेट दिली ऑफर, Rohit Sharma ने एका शब्दात केला गेम ओव्हर! VIDEO तुफान व्हायरल

Web Title: Irfan pathan on yashshvi jaiswal opening bating statement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2026 | 04:56 PM

Topics:  

  • 2027 World Cup
  • irfan pathan
  • Yashasvi Jaiswal

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.