एशियन गेम्सला पंतच्या शुभेच्छा
IND W vs BAN W: फायनलच्या तिकिटासाठी भारत-बांग्लादेश आमनेसामने; कधी, कुठे पाहाल LIVE सामना ?
काय म्हणाला ऋषभ पंत?
आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पंतने एशियन गेम्सबद्दलचा आपला उत्साह व्यक्त केला. तो म्हणाला, “मी आगामी एशियन गेम्स पाहण्यासाठी आणि भारतीय खेळाडूंची कामगिरी अनुभवण्यासाठी प्रचंड उत्सुक आहे. आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रत्येक खेळाडूने कठोर परिश्रम घेतले आहेत. त्यामुळे या संपूर्ण स्पर्धेत आपण सर्वांनी एकत्र येऊन आपल्या ॲथलीट्सच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे आणि त्यांचा पाठींबा अन् उत्साह वाढवला पाहिजे.”
❤️Rishabh Pant has wished the Indian team all the best for the Asian Games. pic.twitter.com/J505FXU4F3 — FANRISHU (@ARJUNkaPANT) September 18, 2026
एशियन गेम्ससारख्या भव्य व्यासपीठावर भारत विविध क्रीडा प्रकारांत खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. ऋषभ पंतच्या या आवाहनानंतर सोशल मीडियावर चाहत्यांचा उदंड प्रतिसाद पाहायला मिळत आहे. भारतीय चमूला देशभरातून प्रचंड पाठिंबा आणि शुभेच्छा दिल्या जात आहे.
यंदा जपानमध्ये 20 वी एशियन गेम्स स्पर्धा खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत एकूण ४३ विविध क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला असून, आशियातील हजारो अव्वल खेळाडू मेडल्स जिंकण्यासाठी खेळणार आहेत. त्यामुळे यंदाची स्पर्धा रंगतदार होणार आहे.
Asian Games 2026: सेमीफायनलसाठी ‘हे’ 4 संघ सज्ज; पदकासाठी ‘आरपार’ची लढाई! कोण कोणाशी भिडणार?
फायनलच्या तिकिटासाठी भारत-बांग्लादेश भिडणार
आशियाई क्रीडा २०२६ स्पर्धेत महिला क्रिकेटचे सामने सुरु आहेत. या स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरी पूर्ण झाली आहे. चार संघांनी शानदार कामगिरी करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. आता उपांत्य फेरीचे सामने रंगणार आहे. उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात भारत आणि बांग्लादेश भिडणार आहेत. दोन्ही संघ या सामन्यासाठी सज्ज आहेत. नुकतेच आशिया कपच्या उपांत्य फेरीत हे दोन संघ आमनेसामने आले होते, ज्यात भारतीय संघाने दणदणीत विजय मिळवला होता.






