Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CWG 2026: जादुमणिचा ‘पंच’ ठरला भारी; पाकिस्तानी बॉक्सरला नमवले, कारगिल शहिदांना समर्पित केला विजय

Jadumani Singh Defeats Pakistani Boxer in world 2026: भारतीय बॉक्सर जादुमणि सिंगने पाकिस्तानच्या सुमामा रहमानला ५-० ने हरवून क्वार्टरफायनलमध्ये आपली जागा निश्चित केली. यासह हा विजय कारगिलच्या वीर शहिदांना समर्पित केला.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 27, 2026 | 02:32 PM
CWG 2026: जादुमणिचा ‘पंच’ ठरला भारी; पाकिस्तानी बॉक्सरला नमवले, कारगिल शहिदांना समर्पित केला विजय
Follow Us
Follow Us:
  • जादुमणिचा ‘पंच’ ठरला भारी
  • पाकिस्तानी बॉक्सरला नमवले
  • कारगिल शहिदांना समर्पित केला विजय
राष्ट्रकुल क्रिडा २०२६ स्पर्धेत ( Commomwealth Games 2026) रविवारी २६ जुलै रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित बॉक्सिंग सामना खेळला गेला. या सामन्यात, भारतीय स्टार बॉक्सर जादुमणी सिंग मांडेंगबामने पाकिस्तानच्या सुमामा रहमानला ५-० ने पराभूत करुन एकतर्फी विजय मिळवला. या विजयसाह त्याने पुरुषांच्या ५५ ​​किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. जादुमणीने संपूर्ण सामन्यात आपले वर्चस्व कायम ठेवले आणि आपल्या प्रतिस्पर्ध्याला सावरण्याची संधी दिली नाही. हा सामना २६ जुलै रोजी, कारगिल विजय दिवशी खेळला गेला. या विजयानंतर जादुमणीने आपली ही प्रभावी कामगिरी कारगिल युद्धातील शूर सैनिकांना समर्पित केली.
पाकिस्तानी बॉक्सरने जादुमणिसमोर शरणागती पत्करली.

CWG 2026: राजा मुथुपांडीने वेटलिफ्टिंगमध्ये जिंकले रौप्य; भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची भर

जादुमणि सिंहचा पाकिस्तानी बॉक्सरला दमदार पंच

२२ वर्षीय जादुमणिने सामन्याच्या सुरुवातीपासूनच आपले वर्चस्व कायम ठेवले. आपल्या उत्कृष्ट बॉक्सिंग, जलद हालचाली आणि मजबूत डिफेन्सच्या जोरावर त्याने पाकिस्तानी बॉक्सरला तिन्ही फेऱ्यांमध्ये पुनरागमन करण्याची कोणतीही संधी दिली नाही. पाचही पंचांनी भारताच्या बाजूने एकमताने निकाल दिला, ज्यात तीन पंचांनी ३०-२७ तर दोन पंचांनी २९-२८ असे गुण दिले. यापूर्वी त्याने आपल्या सलामीच्या सामन्यात स्कॉटिश बॉक्सर कलनला ५-० ने पराभूत केले होते. सलग दुसऱ्यांदा मिळवलेल्या या प्रभावी ५-० विजयासह, जादुमानीने सिद्ध केले की तो सध्या आपल्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. दुसऱ्या एकतर्फी विजयासह, त्याने अंतिम ८ मध्ये आपले स्थान निश्चित केले.

Big Rivalry. Bigger Statement 👊 A fearless display sees Jadumani Singh defeat Pakistan’s Sumama Rehman and book his place in the Quarter-finals. 🌟 #SonySportsNetwork #SonyLIV #Glasgow2026 #GlasgowMeinTiranga #Cheer4Bharat pic.twitter.com/g9ObLZDQTt — Sony Sports Network (@SonySportsNetwk) July 26, 2026

हा विजय कारगिलच्या वीरांना समर्पित

सामन्यानंतर जादुमणि म्हणाला की, पाकिस्तानविरुद्धचा विजय त्याच्यासाठी विशेष होता आणि कारगिल युद्धात सर्वोच्च बलिदान देणाऱ्या देशाच्या शूर सैनिकांना तो समर्पित करू इच्छितो. तो म्हणाला की, ‘हा विजय मी कारगिलच्या वीरांना समर्पित करतो. पाकिस्तानविरुद्ध जिंकल्यानंतर मला खूप आनंद झाला. आता मी उपांत्यपूर्व फेरीत आणखी चांगली कामगिरी करून भारतासाठी सुवर्णपदक घेऊन परत येईन.’

उपांत्यपूर्व फेरीत जादुमणिचा सामना कोणाशी?

जादुमणि आता उपांत्यपूर्व फेरीत झांबिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याच्या विजेत्याशी भिडेल. हा सामना २८ जुलै रोजी स्थानिक वेळेनुसार सायंकाळी ७:४५ वाजता खेळला जाईल. हा सामना जिंकल्यास तो उपांत्य फेरीत पोहोचेल आणि पदकापासून फक्त एक पाऊल दूर राहील.

Commonwealth Games 2026: सुवर्ण हुकले, पण ऋषिकांता सिंहची ऐतिहासिक कामगिरी; भारताला मिळवून दिले पहिले रौप्यपदक

Web Title: Jadumani singh defeated pakistani boxer cwg 2026 boxing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 02:32 PM

Topics:  

  • Boxing
  • commonwealth games 2026
  • IND VS PAK

संबंधित बातम्या

जुन्नरचा डंका! समर्थ कॉलेजच्या आदित्य सूर्यवंशीची बॉक्सिंगमध्ये बाजी; अवनी औटीचा बुद्धिबळात पहिला क्रमांक
1

जुन्नरचा डंका! समर्थ कॉलेजच्या आदित्य सूर्यवंशीची बॉक्सिंगमध्ये बाजी; अवनी औटीचा बुद्धिबळात पहिला क्रमांक

IND Vs PAK: पाकड्यांची लाज पुन्हा जाणार! भारत-पाक पुन्हा भिडणार, ‘या’ स्पर्धेत पंजाबमध्ये लढत
2

IND Vs PAK: पाकड्यांची लाज पुन्हा जाणार! भारत-पाक पुन्हा भिडणार, ‘या’ स्पर्धेत पंजाबमध्ये लढत

WCL 2026 चे शेड्यूल जाहीर! भारत-पाकिस्तान महामुकाबल्याची तारीख ठरली; ‘या’ दिवशी रंगणार हाय-व्होल्टेज सामना
3

WCL 2026 चे शेड्यूल जाहीर! भारत-पाकिस्तान महामुकाबल्याची तारीख ठरली; ‘या’ दिवशी रंगणार हाय-व्होल्टेज सामना

Pune Festival: पुणेकरांसाठी क्रीडापर्व! पिकलबॉल, बॉक्सिंग अन्…; १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान रंगणार थरार
4

Pune Festival: पुणेकरांसाठी क्रीडापर्व! पिकलबॉल, बॉक्सिंग अन्…; १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान रंगणार थरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.