फोटो सौजन्य - IndianPremierLeague
जसप्रीत बुमराह : मुंबई इंडियन्सच्या संघाची या सीझनमध्ये फार काही चांगली सुरुवात नक्कीच झाली नव्हती पण मागील चार सामन्यांमध्ये विजय मिळवून संघाने दमदार कमबॅक केला आहे. मागील चार सामन्यात मुंबईने हैदराबादला दोन वेळा पराभूत केले आहे तर एक वेळा चेन्नईला वानखेडेवर पराभूत केले. त्याचबरोबर दिल्लीच्या संघाला देखील त्याला त्याच्या घरच्या मैदानावर हरवलं होत. यामध्ये फलंदाजांनी त्याचबरोबर गोलंदाजांनी देखील मुंबईच्या कमालीचा खेळ मागील काही सामन्यांमध्ये दाखवला आहे. सध्या कालच्या विजयानंतर मुंबई इंडियन्सचा संघ पॉईंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर विजारमान आहे. आता जगातला नंबर १ वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह लवकरच त्याच्या नावावर नवा विक्रम करणार आहे.
दुखापतीतून परतल्यानंतर, जसप्रीत बुमराह आयपीएल २०२५ मध्ये आतापर्यंत काही खास कामगिरी करू शकलेला नाही. जस्सी सध्या त्याची लाईन अँड लेंथ परत मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. तथापि, बुमराह त्याच्या कारकिर्दीत अशा टप्प्यावर पोहोचला आहे जिथे तो प्रत्येक सामन्यात आणि प्रत्येक विकेटसह नवीन विक्रम प्रस्थापित करत आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध, बुमराहने टी-२० क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वात जलद ३०० विकेट्स घेण्याचा विक्रम केला. आता बूम-बूम बुमराहला लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात त्याच्या कारकिर्दीत आणखी एक ऐतिहासिक क्षण जोडण्याची सुवर्णसंधी असेल.
Jasprit Bumrah enters the elite club of Indian bowlers with 300 wickets in T20s! 🇮🇳🔥
A true match-winner in every format. 👑#Cricket #Bumrah #India #IPL2025 pic.twitter.com/6t0LX9HeaG
— Sportskeeda (@Sportskeeda) April 24, 2025
खरं तर, बुमराह सध्या आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत मलिंगासोबत संयुक्तपणे अव्वल स्थानावर आहे. मलिंगा आणि बुमराह यांनी एमआय जर्सीमध्ये एकूण १७० विकेट्स घेतल्या आहेत. आता जर जस्सीने लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात विकेट घेतली तर तो या लीगमध्ये मुंबईकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनेल. बुमराह-मलिंगा नंतर, हरभजन सिंग या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे, ज्याने मुंबई इंडियन्सकडून खेळताना १२७ विकेट्स घेतल्या आहेत.
Jasprit Bumrah 🤝 Lasith Malinga #IPL2025 #IPL #CricketTwitter pic.twitter.com/37BOfYV4q2
— Cricbuzz (@cricbuzz) April 24, 2025
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात जसप्रीत बुमराहने हेनरिक क्लासेनचा एकमेव बळी घेतला. क्लासेनला बाद केल्यानंतर बुमराहने क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये ३०० विकेट्स पूर्ण केल्या. बुमराह हा भारतासाठी टी-२० क्रिकेटमध्ये ३०० बळी पूर्ण करणारा भुवनेश्वर कुमार नंतरचा दुसरा वेगवान गोलंदाज आहे. तथापि, हा टप्पा गाठण्यासाठी जस्सीने भारतासाठी सर्वात कमी सामने खेळले आहेत.