फोटो सौजन्य - X
Rajeev Shukla : भारतामध्ये सध्या देशवासियांमध्ये तीव्र प्रतिक्रियांचे लाट येत आहे. भारतीयाच्या घरातला एक एक व्यक्ती झालेल्या हल्ल्यामुळे प्रचंड संतापलेला आहे. कालच्या सामन्यातही सर्व खेळाडूंनी मैदानावर १ मिनिटाचे मौन पळून हल्ल्यामध्ये जीव गमावलेल्या सर्वाना श्रद्धांजली वाहिली. त्याचबरोबर सामान्यांच्या वेळी होणारी आतिषबाजी आणि चिअरलीडर देखील नव्हत्या. राजकीय नेते त्यांच्या अनेक खेळाडूं कडून सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया त्याचबरोबर शोक व्यक्त केला जात आहे.
भारतीय क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींनी पहलगाममधील प्राणघातक दहशतवादी हल्ल्याबद्दल शोक व्यक्त केला आहे आणि तीव्र निषेध केला आहे. २०१३ पासून थांबलेल्या भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय मालिकेबाबत बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी मोठे विधान केले आहे. मंगळवारी (२२ एप्रिल) जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, भारत भविष्यात पाकिस्तानविरुद्ध कोणतीही द्विपक्षीय मालिका खेळणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. मंगळवारी दक्षिण काश्मीरमधील पहलगाम येथील एका प्रमुख पर्यटन स्थळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात किमान २६ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले.
गुरुवारी मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील आयपीएल सामन्यादरम्यान खेळाडू आणि अधिकाऱ्यांनी शांतता पाळून दहशतवादी हल्ल्यातील बळींना श्रद्धांजली वाहिली. सरकारच्या भूमिकेमुळे बीसीसीआय पाकिस्तानसोबत द्विपक्षीय मालिका खेळत नाही आणि भविष्यातही पाकिस्तानसोबत द्विपक्षीय मालिका होणार नाही, असे शुक्ला म्हणाले. तथापि, त्याने आयसीसी स्पर्धेत पाकिस्तानशी सामना होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
शुक्ला म्हणाले, “आम्ही पीडितांसोबत आहोत आणि आम्ही याचा निषेध करतो. आमचे सरकार जे काही म्हणेल ते आम्ही करू. सरकारच्या वृत्तीमुळे आम्ही पाकिस्तानसोबत द्विपक्षीय मालिका खेळत नाही आणि भविष्यातही आम्ही पाकिस्तानसोबत द्विपक्षीय मालिका खेळणार नाही. पण जेव्हा आयसीसीच्या स्पर्धांचा विचार केला जातो तेव्हा आम्ही आयसीसीच्या सहभागामुळे खेळतो.”
BCCI Vice-President Rajeev Shukla said “We are with the victims & we condemn it – Whatever our government will say, we will do. We don’t play with Pakistan in bilateral series because of the government stand & we will not play with Pakistan in bilaterals going forward but when it… pic.twitter.com/qTHFjQUE97
— Johns. (@CricCrazyJohns) April 24, 2025
२०१२-१३ पासून भारत आणि पाकिस्तानमध्ये द्विपक्षीय मालिका झालेली नाही. टीम इंडिया २००८ मध्ये पाकिस्तानला सामना खेळण्यासाठी गेली होती. नुकत्याच झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीही भारताने पाकिस्तानला भेट दिली नव्हती. पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन केले होते. २०२३ मध्ये आयसीसी स्पर्धेदरम्यान पाकिस्तान संघ भारतात खेळण्यासाठी आला होता.