Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND W vs PAK W: ‘कोणाकडूनही हरू, पण पाकिस्तानकडून नाही’ IND vs PAK सामन्यापूर्वी जेमिमा रॉड्रिग्जचे मोठं वक्तव्य

Do Not Lose Against Pak Jemimah rodrigues on IND vs Pak Match: भारत-पाकिस्तानच्या हायव्होटेज सामन्यापूर्वी टीम इंडियाची स्टार खेळाडू जेमिमा रॉड्रिग्जचे एक वकत्व्य चर्चेत आहे. तिने या सामन्यात असलेल्या दबावाबद्दल आणि उत्साहाबद्दल सांगितले.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 14, 2026 | 02:43 PM
IND W vs PAK W: ‘कोणाकडूनही हरू, पण पाकिस्तानकडून नाही’ IND vs PAK सामन्यापूर्वी जेमिमा रॉड्रिग्जचे मोठं वक्तव्य
Follow Us
Follow Us:
  • भारत- पाकिस्तान भिडणार
  • कोणाकडूनही हरू, पण पाकिस्तानकडून नाही
  • जेमिमा रॉड्रिग्जचे मोठं वक्तव्य
भारतीय संघ २०२६ च्या महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत (ICC Womens T20 World Cup ) आज, रविवारी पाकिस्तानविरुद्ध आपला पहिला सामना खेळेल. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामने नेहमीच रोमांचक आणि हायव्होल्टेज राहिले आहेत. दोन्ही देशांतील लोकांसाठी क्रिकेट हा केवळ एक खेळ नसून यामध्ये भावना आणि उत्साह नेहमीच प्रचंड असतो. यामुळे खेळाडूंवर देखील याचा दबाव असतो. सामन्यापूर्वी, भारतीय फलंदाज जेमिमा रॉड्रिग्जनेही याच उत्साहाबद्दल सांगितले आणि म्हटले की, तिचा वॉचमनसुद्धा म्हणतो की कोणाकडूनही हरू, पण पाकिस्तानकडून नाही.

क्रीजवर गोंधळानंतर Rohit Sharma रनआउट; हिटमॅन भडकला? मैदानात नेमकं काय घडलं, गिलचा खुलासा

जिओहॉटस्टारवर बोलताना जेमिमा रॉड्रिग्स म्हणाली, ‘ मला आठवतंय, मी माझा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळले होते. ड्रेसिंग रूममध्ये हरमनप्रीत कौरने आम्हाला सामन्याच्या दबावाकडे दुर्लक्ष करू नका असे सांगितले. ती म्हणाली की बाहेरून दबाव आहे, कारण आम्हाला भारत-पाकिस्तानचा इतिहास माहीत आहे. चाहत्यांना आमच्याकडून काय अपेक्षा आहेत हेदेखील आम्हाला माहीत आहे.’ ती पुढे म्हणाली, ‘माझ्या बिल्डिंगचा वॉचमनसुद्धा मला म्हणतो की, कोणाकडूनही हारा, पण पाकिस्तानकडून नाही.’ हा त्या प्रकारचा दबाव आहे, कारण लोकांना क्रिकेट आवडते. त्यांना ही स्पर्धा आवडते. भारतीय संघ एका मोठ्या ध्येयाने पुढे वाटचाल करत आहे, आणि ते ध्येय म्हणजे टी-२० विश्वचषक ट्रॉफी उंचावणे.’

भारतीय फलंदाजाने तयारीबद्दल काय सांगितले?

जेमिमा रॉड्रिग्स म्हणाली, ‘एक संघ म्हणून, आम्ही नेहमी ट्रॉफी जिंकण्याचा विचार करतो. हे आमच्या दैनंदिन कामाचा एक भाग आहे. आमचा विश्वास आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचा खूप विचार करता, तेव्हा तुम्ही त्या दिशेने वाटचाल करू लागता.ही आमच्या संघाची संकल्पना आहे. आम्ही २०२५ च्या विश्वचषकादरम्यान हेच ​​केले होते. अमोल सरांनी आम्हाला येथेही तेच करण्यास सांगितले आहे आणि आम्ही ते पुढेही करत राहू.’

दोन्ही संघांची संभाव्य ११

भारत: स्मृती मानधना, शफाली वर्मा, यास्तिका भाटिया, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, भारती फुलमाली, श्रेयंका पाटील, क्रांती गौड, रेणुका सिंग.

पाकिस्तान : मुनीबा अली (विकेटकीपर), गुल फिरोजा, आयेशा जफर, आलिया रियाझ, फातिमा सना (कर्णधार), इरम जावेद, नतालिया परवेझ, तुबा हसन, डायना बेग, नशरा संधू, सादिया इक्बाल.

Mumbai T20 League: मराठा रॉयल्स vs आर्क्स अंधेरी फायनलमध्ये तुफान ड्रामा; मैदानातच खेळाडूंचा राडा, VIDEO व्हायरल

Web Title: Jemimah rodrigues india vs pakistan statement building watchman says win against pakistan icc womens t20 world cup 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 02:43 PM

Topics:  

  • ICC T20 World Cup 2026
  • ICC Women's T20 World Cup
  • IND vs PAK Match
  • IND vs PAK Women
  • Jemimah Rodrigues
  • Jemimah Rodriguez

संबंधित बातम्या

IND W vs PAK W: पाकिस्तानी खेळाडूंशी हँडशेक करणार? कर्णधार हरमनप्रीत कौरचे मोठे वक्तव्य
1

IND W vs PAK W: पाकिस्तानी खेळाडूंशी हँडशेक करणार? कर्णधार हरमनप्रीत कौरचे मोठे वक्तव्य

IND W vs PAK W: इंग्लंडच्या मैदानावर रंगणार भारत-पाकिस्तानचा थरार; हायव्होल्टेज सामन्यात कशी असेल टीम इंडियाची प्लेइंग 11?
2

IND W vs PAK W: इंग्लंडच्या मैदानावर रंगणार भारत-पाकिस्तानचा थरार; हायव्होल्टेज सामन्यात कशी असेल टीम इंडियाची प्लेइंग 11?

IND W vs PAK W: फायनलआधीचा ‘महामुकाबला’! भारत अन् पाकिस्तान भिडणार, वर्ल्डकपचा इतिहास काय सांगतो?
3

IND W vs PAK W: फायनलआधीचा ‘महामुकाबला’! भारत अन् पाकिस्तान भिडणार, वर्ल्डकपचा इतिहास काय सांगतो?

IND W vs PAK W: Women’s T20 World Cup 2026 मध्ये भिडणार भारत – पाकिस्तान, पिचवर कोण राहणार वरचढ
4

IND W vs PAK W: Women’s T20 World Cup 2026 मध्ये भिडणार भारत – पाकिस्तान, पिचवर कोण राहणार वरचढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.