
इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान
एकदिवसीय क्रिकेटचा इतिहास पाहिला तर आजपर्यंत जगभरातील ३३ फलंदाजांनी ८,००० किंवा त्याहून अधिक जास्त रन्स करण्याचा रेकॉर्ड केला आहे. मात्र इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला आतापर्यंत हा रेकॉर्ड करणे शक्य झालेले नाही. त्यामुळे जो रूटकडे ही संधी असणार आहे. असे केल्यास तो हा रेकॉर्ड करणारा इंग्लंडचा पहिला फलंदाज ठरणार आहे.
ट्राय सिरिजमध्ये इंग्लंड अन् पाकिस्तान भिडणार आहेत. पाकिस्तानचा संघ विजयाच्या विश्वासाने मैदानात उतरणार आहे. तर दुसऱ्या बाजूला इंग्लंडचा संघही मजबूत आत्मविश्वासासह या मालिकेत दमदार खेळ करण्यासाठी सज्ज झाला आहे. पाकिस्तानचा संघ विजयाची विजयी लय कायम ठेवण्याच्या उद्देशाने उतरत आहे. पाकिस्तानने यापूर्वी आपल्या पहिल्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध ३७ धावांनी दणदणीत विजय मिळवला होता, ज्यामुळे संघाचा आत्मविश्वास उंचावलेला आहे.
Joe Root: 149 वर्षाच्या कसोटी इतिहासात पहिल्यांदाच घडले, फिल्डरची कमालीची फिल्डिंग