Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kavita Devi: भारताच्या लेकीने रचला इतिहास; WWE रिंगमध्ये भगव्या सलवार सूटमध्ये घातला धुमाकूळ, कोण आहे कविता देवी?

WWE Wrestler Kavita Devi Created History: कविता देवीने WWE च्या रिंगमध्ये भगव्या सलवार सूटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत इतिहास रचला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 14, 2026 | 03:06 PM
Photo-social media

Photo-social media

Follow Us
Follow Us:
  • WWE रिंगमध्ये भगव्या सलवार सूटमध्ये घातला धुमाकूळ
  • कविताची देसी स्टाइलमध्ये एन्ट्री
  • कोण आहे कविता देवी?
भारतात WWE चे लाखो फॅन्स आहेत. गेल्या काही वर्षांत, अनेक भारतीय कुस्तीपटूंनी WWE रिंगमध्ये आपले कौशल्य दाखवून दिले आहे. त्यापैकी एक म्हणजे भारताची पहिली महिला WWE रेसलर कविता देवी. कविता WWE रिंगमध्ये प्रवेश करणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू आहे. कविताने देसी स्टाइलमध्ये सलवार सूट घालून अनेक दिग्गज कुस्तीपटूंना पराभूत केले आणि जागतिक स्तरावर आपल्या कौशल्याची छाप सोडली.

IPL 2026: प्लेऑफची शर्यत रंगली, RCB च्या विजयाने बदलले पॉईंट्स टेबलचे समीकरण; कोणते संघ करणार टॉप-4 मध्ये एन्ट्री

WWE च्या रिंगमध्ये कविताची देसी स्टाइलमध्ये एन्ट्री

कविताने WWE रिंगमध्ये प्रवेश करणारी पहिली भारतीय महिला रेसलर म्हणून इतिहास रचला आहे. तिने २०१७ मध्ये WWE मध्ये पदार्पण केले. तिने WWE च्या रिंगमध्ये भगव्या रंगाचा सलवार सूट परिधान करुन अनेक सामने खेळले आणि आपली भारतीय ओळख जागतिक स्तरावर अधोरेखित केली. कविताने आपल्या मेहनतीने असंख्य पदके जिंकली आणि आपल्या देशाला गौरव मिळवून दिला. २०१७ मध्ये, (Mae Young Classic) ‘मे यंग क्लासिक’मध्ये सहभागी होऊन तिने जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण केली. (Wrestle Mania 34) रेसलमेनिया ३४ मधील कविताच्या दमदार कामगिरीने प्रेक्षक आणि अनेक कुस्तीपटूंना प्रभावित केले. तिची ताकद आणि आत्मविश्वास पाहून काही चाहत्यांनी तिला ‘लेडी खली’ असे नावही दिले.

कोण आहे कविता देवी?

कविताचे पूर्ण नाव कविता दलाल असे आहे. तिला कविता देवी या नावानेही ओळखले जाते. कविताचा जन्म २० सप्टेंबर १९८७ रोजी हरियाणा राज्यात झाला. WWE मध्ये सामील होण्यापूर्वी, कविताने कुस्ती आणि वेटलिफ्टिंगमध्ये यश संपादन केले होते. तिची उंची अंदाजे ५ फूट ९ इंच आहे आणि वजन ७० किलोग्रॅमपेक्षा जास्त आहे. तिची तुलना अनेकदा ‘द ग्रेट खली’शी केली जात असे. कविताने ‘द ग्रेट खली’च्या ‘कॉन्टिनेन्टल रेसलिंग एंटरटेनमेंट अकादमी’मध्ये कुस्तीचे प्रशिक्षणही घेतले आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर, २००९ मध्ये ती लग्नबंधनात अडकली आणि एका वर्षानंतर आई झाली. आई झाल्यानंतर, तिने या खेळातून निवृत्त होण्याचा विचार केला, परंतु तिच्या पतीने तिला पाठिंबा दिला आणि तिची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन दिले.

WWE चा ऐतिहासिक प्रवास

कविता २०१७ ते २०२१ पर्यंत WWE चा भाग होती. त्यानंतर WWE ने तिला रिलीज केले. कविताने २७ जुलै २०१९ रोजी WWE मध्ये आपला शेवटचा सामना खेळला. त्यानंतर ती खेळापासून दूर झाली.

IPL 2026: चेन्नई सुपर किंग्सचा मोठा निर्णय; रामकृष्ण घोष बाहेर, संघात नव्या खेळाडूची एन्ट्री!

Web Title: Kavita devi first indian female wwe wrestler latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 03:06 PM

Topics:  

  • Sports News
  • World Wrestling Federation
  • WWE

संबंधित बातम्या

आता भारत थांबणार नाही! Asian Games मध्ये खेळाडूंचा जलवा; 3 ‘सुवर्ण’ अन्…, 27 पदकांची कमाई
1

आता भारत थांबणार नाही! Asian Games मध्ये खेळाडूंचा जलवा; 3 ‘सुवर्ण’ अन्…, 27 पदकांची कमाई

थेट वृद्धाश्रमात! सचिनचा सखा Vinod Kambli चा भावूक Video Viral; म्हणाला, ‘मी या ठिकाणी…’
2

थेट वृद्धाश्रमात! सचिनचा सखा Vinod Kambli चा भावूक Video Viral; म्हणाला, ‘मी या ठिकाणी…’

Sports News: धावपटूंचा जोश, जिंकण्याची जिद्द! पुणे विद्यापीठाची क्रॉस-कंट्री स्पर्धा उत्साहात
3

Sports News: धावपटूंचा जोश, जिंकण्याची जिद्द! पुणे विद्यापीठाची क्रॉस-कंट्री स्पर्धा उत्साहात

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल
4

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.