आयपीएल 2026 मध्ये कोणते चार संघ प्लेऑफमध्ये जाणार? (फोटो- ट्विटर)
आयपीएलच्या प्लेऑफबद्दल पीटरसनची भविष्यवाणी
28 मार्चपासून सुरू झाला क्रिकेटचा महाउत्सव
आज चेन्नई विरुद्ध पंजाब आमनेसामने
Tata IPL 2026 Play Off Updates: गेल्या आठवड्यात म्हणजेच 28 मार्चपासून आयपीएलचा थरार सुरू झाला आहे. आज चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात सामना सुरू आहे. हा आयपीएलचा 7 वा सामना सुरू आहे. दरम्यान आयपीएलचा पहिला टप्पा सुरू झाला असतानाच इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसनने प्लेऑफमध्ये जाणाऱ्या संघांची भविष्यवाणी केली आहे.
केविन पीटरसन दिल्ली कॅपिटल्सचा मेंटर देखील राहिलेला आहे. तसेच तो इंग्लंडचा क्रिकेटपटू आहे. त्याने यंदाच्या म्हणजेच आयपीएल 2026 मध्ये कोणते चार संघ प्लेऑफमध्ये जाऊ शकतात याबाबत भविष्यवाणी केली आहे. केविन पीटरसनच्या मते, आयपीएल 2026 मध्ये मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज हे चार संघ प्ले ऑफमध्ये प्रवेश करतील. कदाचित यामध्ये बदल देखील झालेला पाहायला मिळू शकतो.
Having watched the first round of matches in the IPL this season, as it stands, just on observations, this could be the top 4. MI, DC, RR, PUNJAB This can all change with injuries etc, but that’s how I see it atm. — Kevin Pietersen🦏 (@KP24) April 3, 2026
‘एक्स’वर पोस्ट काय?
केविन पीटरसनने आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवर पोस्ट केली आहे. आतापर्यंत झालेले सामने पाहता आणि सध्याच्या स्थितीनुसार मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज हे चार संघ प्ले ऑफमध्ये प्रवेश करतील. काही कारणांमुळे यामध्ये बदल होऊ शकतो.
पॉईंट्स टेबलमध्ये खळबळ
गेल्या आठवड्यापासून आयपीएलचा थरार सुरू झाला आहे. आयपीएलचा महासंग्राम सुरू होऊन जवळपास एक आठवडा पूर्ण होत आला आहे. आतापर्यंत 6 सामने या स्पर्धेत खेळले गेले आहेत. काल एसआरएच आणि केकेआर यांच्यात सामना पार पडला. यामध्ये केकेआरचा पराभव झाला. कालच्या सामन्यानंतर पॉईंट्स टेबलमध्ये बदल झाले आहेत. त्याबाबत जाणून घेऊयात.
IPL 2026 Points Table: ‘हे’ संघ अजूनही शून्यच! SRH Vs KKR सामन्यानंतर पॉईंट्स टेबलमध्ये खळबळ
काल ईडन गार्डन्स स्टेडियमवर केकेआर विरुद्ध एसआरएच यांच्यात सामना झाला. कालच्या सामन्यात हैद्राबादच्या फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला. केकेआरला 227 धावांचे लक्ष्य दिले. हे आव्हान केकेआर पूर्ण करू शकली नाही. केकेआरचा 65 धावांनी पराभव झाला. त्यानंतर आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत.
CSK Vs PBKS Pitch Report: आजच्या सामन्यात टॉस करणार ‘गेम’; ‘हा’ निर्णय घेतल्यास विजय निश्चित
दोन पॉईंट्ससह सध्या राजस्थान रॉयल्स प्रथम स्थानी असल्याचे दिसून येत आहे. दुसऱ्या नंबरवर आरसीबीचा संघ आहे. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्ज आणि 6 व्या स्थानी सनरायजर्स हैदराबादचा संघ आहे. तर आयपीएलमध्ये 4 संघांचे खाते अजूनही उघडलेले नाही. चेन्नई सुपर किंग्ज, लखनौचा संघ आणि केकेआर आणि गुजरात टायटन्सला विजयाचे खाते उघडता आलेले नाही. कोलकाताचा संघ सोडल्यास अन्य संघांनी अद्याप एकच सामना खेळला आहे.






