Mahela Jayawardene : महेला जयवर्धने दिल्ली कॅपिटल्सचे नवे क्रिकेट डायरेक्टर; WPL सह तीन लीगची जबाबदारी, सौजन्य : आयएएनएस
Mahela Jayawardene : श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि दिग्गज क्रिकेटपटू महेला जयवर्धने याची जीएमआर स्पोर्ट्सच्या क्रिकेट डायरेक्टरपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नव्या जबाबदारीत तो महिला प्रीमियर लीग (WPL) मधील दिल्ली कॅपिटल्स, इंटरनॅशनल लीग टी-20 (ILT20) मधील दुबई कॅपिटल्स आणि इंग्लंडमधील द हंड्रेड स्पर्धेतील सदर्न ब्रेव्ह या संघांच्या क्रिकेटविषयक कामकाजाची जबाबदारी सांभाळणार आहे.
जीएमआर स्पोर्ट्सच्या क्रिकेट संघांच्या कामकाजाला धोरणात्मक दिशा देण्याचे काम जयवर्धनेकडे असेल. क्रिकेट ऑपरेशन्स, गुणवत्तापूर्ण खेळाडूंचा शोध, खेळाडूंचा विकास आणि कामगिरी व्यवस्थापन या महत्त्वाच्या क्षेत्रांवर तो लक्ष केंद्रित करणार आहे. तसेच प्रत्येक फ्रँचायझीचे नेतृत्व, मुख्य प्रशिक्षक आणि क्रिकेट व्यवस्थापन पथकासोबत समन्वय साधून काम करेल.
हॅम्पशायरचे क्रिकेट डायरेक्टर जाइल्स व्हाइट यांच्यासोबतही जयवर्धने काम करणार आहे. जीएमआर समूहातील विविध संघांमध्ये क्रिकेटविषयक अनुभव, कौशल्य आणि सर्वोत्तम कार्यपद्धतींची देवाणघेवाण करण्यावर त्याचा भर असेल.
महिला प्रीमियर लीगच्या 2023 मध्ये सुरू झालेल्या पहिल्या हंगामापासून दिल्ली कॅपिटल्स हा स्पर्धेतील महत्त्वाचा संघ राहिला आहे. आतापर्यंत झालेल्या चारही हंगामांत दिल्लीने अंतिम फेरी गाठली; मात्र प्रत्येक वेळी संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यामुळे आगामी हंगामात पहिल्यांदाच जेतेपद पटकावण्याच्या उद्देशाने जयवर्धनेची नियुक्ती दिल्लीसाठी महत्त्वाची मानली जात आहे.
नियुक्तीनंतर जयवर्धनेने आनंद व्यक्त केला. दिल्ली कॅपिटल्सची मजबूत ओळख आणि महिला क्रिकेटच्या भविष्यासाठी असलेले संघाचे धोरणात्मक व्हिजन आपल्याला प्रभावित करत असल्याचे त्याने सांगितले. संघातील सध्याच्या गुणवत्तेला आणखी धार देणे, कामगिरीत सातत्य आणणे आणि जेतेपदासाठी सातत्याने आव्हान निर्माण करणे हे आपले प्रमुख उद्दिष्ट असेल, असेही त्याने स्पष्ट केले.
IND vs NZ: किवींचं कंबरड मोडत राहुल-जैस्वालने ३२ वर्षांचा दुष्काळ संपवला; केला ‘हा’ भलामोठा रेकॉर्ड
जयवर्धने यापूर्वी मुंबई इंडियन्सचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यरत होता. त्याच्या मार्गदर्शनाखाली मुंबई इंडियन्सने तीन वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले. याशिवाय तो मुंबई इंडियन्सचा ग्लोबल हेड ऑफ परफॉर्मन्स म्हणूनही कार्यरत होता. विविध देशांतील लीगमध्ये सहभागी होणाऱ्या फ्रँचायझी संघांच्या क्रिकेटविषयक कामकाजाचा अनुभव त्याच्याकडे आहे.
विशेष म्हणजे, जयवर्धने यापूर्वी 2012 आणि 2013 मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स (सध्याची दिल्ली कॅपिटल्स) संघाकडून खेळला होता. आता खेळाडू म्हणून प्रतिनिधित्व केलेल्या याच फ्रँचायझीमध्ये तो नव्या भूमिकेत परतणार आहे.
IND Vs NZ: ‘त्याचे नाव सिराज म्हणून…’; कॉँग्रेस नेत्याचे ‘ते’ विधान अन् प्रकरणाला धार्मिक रंग?
जीएमआर स्पोर्ट्सचे अध्यक्ष आणि दिल्ली कॅपिटल्सचे सहमालक किरण कुमार गांधी यांनी या नियुक्तीचे स्वागत केले. जयवर्धनेचा आंतरराष्ट्रीय अनुभव, आधुनिक क्रिकेटची सखोल समज आणि स्पर्धात्मक संघ उभारण्याची क्षमता दिल्ली कॅपिटल्सच्या महिला संघासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, जयवर्धने दिल्ली कॅपिटल्समध्ये माजी भारतीय क्रिकेटपटू वेणुगोपाल राव यांची जागा घेणार आहे. चार वर्षांहून अधिक काळ जबाबदारी सांभाळल्यानंतर राव यांनी पद सोडले. त्यांच्या कार्यकाळात दुबई कॅपिटल्सने 2025 मध्ये आयएलटी-20 स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते.
Ans: जीएमआर स्पोर्ट्सने महेला जयवर्धनेची क्रिकेट डायरेक्टर म्हणून नियुक्ती केली आहे.
Ans: महिला प्रीमियर लीगमधील दिल्ली कॅपिटल्स, आयएलटी-20 मधील दुबई कॅपिटल्स आणि द हंड्रेडमधील सदर्न ब्रेव्ह या संघांच्या क्रिकेटविषयक कामकाजाची जबाबदारी त्याच्याकडे असेल.
Ans: मुख्य प्रशिक्षक म्हणून जयवर्धनेच्या मार्गदर्शनाखाली मुंबई इंडियन्सने तीन वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले.






