सराव सामन्यात अजिंक्य रहाणेची मोठी खेळी
28 मार्चपासून सुरू होणार आयपीएल स्पर्धा
20 चेंडूत ठोकले अर्धशतक
IPL 2026: या आठवड्यापासून क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी आहे. 28 मार्चपासून आयपीएलचा हंगाम सुरू होणार आहे. त्याआधी प्रत्येक संघ सराव करताना दिसून येत आहे. कोलकाता नाइट रायडर्सचा संघ देखील इडन गार्डन स्टेडियमवर सराव सामने खेळत आहे. सराव सामन्यात अजिंक्य रहाणेने जबरदस्त खेळी केल्याचे समोर आले आहे.
अजिंक्य रहाणे कोलकाता नाइट रायडर्स संघाचा कर्णधार आहे. सराव सामन्यात त्याने आपला क्लास दाखवला आहे. वेगवान गोलंदाज नवदीप सैनीच्या चेंडूवर गगनचुंबी षटकार मारला आहे. त्यामुळे त्याच्या फलंदाजीमधील आक्रमकपणा दिसून आला. याचा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
अजिंक्य रहाणेची अर्धशतकी खेळी
केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने सराव सामन्यात जोरदार खेळी केली आहे. त्याने 20 चेंडूत अर्धशतकी खेळी केली आहे. नवदीप सैनीच्या चेंडूवर गगनचुंबी षटकार मारल्याचा त्याचा व्हिडिओ समोर आला आहे. गेल्या सीझनमध्ये अजिंक्य रहाणेने केकेआरकडून सर्वाधिक धावा केल्या होत्या.
Ajinkya Rahane and KKR management made a blunder last year by not changing his position from No.3 to opening but this time he gonna smash 500 run for KKR as opener 🚀🔥 You can save this tweet!! pic.twitter.com/hBFdZ7DkHv — कट्टर KKR समर्थक 🦁🇮🇳 ™ (@KKRWeRule) March 23, 2026
कर्णधारपदाबाबत काय म्हणाला अजिंक्य रहाणे?
मी मागील वर्षापासून संघाचे नेतृत्व करत आहे. या जबाबदारीसाठी मी संघ व्यवस्थापनाचे आभार मानतो. समोर येणाऱ्या अडचणींना मी सकारात्मकपणे घेण्याचा प्रयत्न करतो. कठीण काळ असला तरी कर्णधार म्हणून मी नेहमी माझे श्रेष्ठ देण्याचे प्रयत्न करतो.






