
LSG चा विजय, पण कर्णधार ऋषभ पंत अडचणीत; BCCI ने ठोठावला लाखोंचा दंड
ईडन गार्डन्सवरील खेळपट्टी फलंदाजांसाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते. मात्र, खेळपट्टीवर सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना मदत मिळू शकते. त्यानंतर, फिरकी गोलंदाज खेळपट्टीवर वर्चस्व गाजवू शकतात.पावसामुळे खेळपट्टीच्या स्थितीत बदल होऊ शकतो. यामुळे फलंदाजी करणे आव्हानात्मक होऊ शकते. या पिचवर दव हा सर्वात मोठा फॅक्टर ठरु शकतो. ज्यामुळे दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाला काही प्रमाणात फायदा मिळू शकतो. या पिचवर नाणेफेक जिंकून संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. येथे पहिल्या डावातील धावसंख्या ही १८०- २०० दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.
कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर आतापर्यंत आयपीएलचे १०४ सामने खेळले गेले आहेत. यापैकी ४३ सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी, तर ५९ सामने लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघांनी जिंकले आहेत. धावांचा पाठलाग करताना विजयाची टक्केवारी ४१.३५ टक्क्यांवरून ५६.७३ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. कोलकातामधील दोन सामने पावसामुळे अनिर्णितही राहिले आहेत. सामन्याच्या आदल्या दिवशी कोलकातामध्ये मुसळधार पाऊस पडल्यामुळे आजच्या सामन्यात देखील पावसाचे सावट असण्याची शक्यता आहे.
कोलकाता नाइट रायडर्स : अजिंक्य रहाणे (कर्णधार), फिन ऍलन, अंगकृष रघुवंशी (विकेटकिपर), कॅमेरून ग्रीन, रिंकू सिंग, रोवमन पॉवेल, मनीष पांडे, सुनील नरेन, अनुकुल रॉय, वैभव अरोरा, कार्तिक त्यागी
गुजरात टायटन्स : साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर (विकेटकिपर), निशांत सिंधू, वॉशिंग्टन सुंदर, जेसन होल्डर, राहुल तेवतिया, राशीद खान, अरशद खान, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज.
PBKS vs MI: पंजाब किंग्सचा सलग पाचवा पराभव; कर्णधार श्रेयसच्या नावावर लाजिरवाणा विक्रम