LSG vs CSK: लखनऊच्या मैदानावर गोलंदाज की फलंदाज कोण करणार कमाल? वाचा पिच रिपोर्ट
श्रेयस अय्यरने आयपीएलमध्ये आतापर्यंत अशा २० सामन्यात कर्णधारपद भूषवले आहे ज्यामध्ये २०० पेक्षा जास्त धावा करण्यात आल्या. २० पैकी १२ सामने अय्यरने जिंकले तर ७ सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. तर, PBKS पंजाब किंग्स संघाला २०० चा स्कोअर डिफेंड करताना दहाव्यांदा पराभव पत्कारावा लागला. गुरुवारी, मुंबई विरुद्ध सामना हरल्यानंतर अय्यरच्या नावे हा लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला.
कर्णधार श्रेयस अय्यरने २०२२ पासून मुंबई इंडियन्सविरुद्ध एकही सामना गमावला नव्हता. परंतु, गुरुवारी त्याचा हा विक्रम मोडला गेला. कर्णधार म्हणून अय्यरने MI एमआयविरुद्ध सात सामने जिंकले आहेत. आयपीएलमध्ये एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक सलग विजयांचा विक्रम गौतम गंभीरच्या नावावर आहे, त्याने कोलकाता नाईट रायडर्सचे कर्णधारपद भूषवताना पंजाब किंग्सविरुद्ध आठ सामने जिंकले आहेत.
सलग पाचव्या पराभवामुळे श्रेयस खूप निराश दिसत होता. या सामन्यातील पराभव पचवणे खूप कठीण असल्याचे त्याने कबूल केले. पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये श्रेयस म्हणाला की, ‘अर्थातच हा पराभव पचवणे खूप कठीण आहे, पण मला इथे कोणावरही पराभवाचे खापर फोडायचे नाही कारण पंजाब किंग्सने या सामन्यात शानदार झुंज दिली. हा एक उत्तम क्रिकेट सामना होता. तसेच, तिलकने शानदार खेळी केली. त्याचे शॉट्स सिलेक्शन चांगले होते. तिलकने फिल्डला चांगले समजले, म्हणून त्याचे श्रेय मिळायला हवे.’
हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्सने २० ओव्हरमध्ये आठ विकेट्स गमावून २०० धावा केल्या. प्रभसिमरन सिंगने ३२ चेंडूंमध्ये ५७ धावांची दमदार खेळी केली. तर, अझमतुल्लाने १७ चेंडूंमध्ये ३८ धावा केल्या. प्रत्युत्तरात, मुंबई इंडियन्सने १९.५ ओव्हरमध्ये चार विकेट्स गमावून २०१ धावांचे लक्ष्य पूर्ण केले. मुंबई इंडियन्सकडून तिलक वर्माने ३३ चेंडूंमध्ये ७५ धावांची दमदार खेळी करत शानदार फलंदाजी केली, तर रायन रिकल्टनने २३ चेंडूंमध्ये ४८ धावा केल्या. तिलकने आपल्या खेळीत सहा चौकार आणि सहा षटकार मारले. दरम्यान, विल जॅक्स १० चेंडूंमध्ये २५ धावांवर नाबाद राहिला आणि संघाला विजय मिळवून दिला.






