IND vs AUS: 'I was hitting, wasn't I..'; KL Rahul angry at Virat for not completing a century; He reacted on the field that..; Watch the video
IND vs AUS : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 4 विकेट्स राखून धुव्वा उडवला आहे. विजयाने भारताने अंतिम फेरीत धडक मारली. विराट कोहलीच्या अर्धशतकीय खेळीने भारताने 265 धावांचे आव्हान पूर्ण केले. एका बाजूने विकेट्स पडत असताना दुसऱ्या बाजूने विराट कोहली शड्डु ठोकून उभा होता. सार भार त्याने तोलून धरला होता. विराटने धावांचा पाठलाग करताना 98 चेंडूमध्ये 84 धावा केल्या मात्र, मोठा फटका मारण्याच्या नादात तो झेलबाद झाला. कोहली बाद झाल्याचे बघून केएल राहुल खूपच निराश झाल्याचे दिसून आला.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या सेमी फायनलच्या सामन्यात विराट कोहली या स्पर्धेतील त्याच्या दुसऱ्या शतकाच्या उंबरठ्यावर होता. पण, हवेत फटका खेळल्यामुळे तो 84 धावांवर लाँग ऑनवर झेलबाद झाला. झंपाच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसला आणि कोहली 43व्या षटकात बाद झाला. बेन द्वारशियसने त्याचा झेल पकडला.
धावांचा पाठलाग करताना आणि शतक पूर्ण करण्यापासून दूर राहावं लागल्यामुळे कोहलीच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती. त्याचवेळी जोडीदार फलंदाज केएल राहुल मैदानावर होता. तेव्हा केएल राहुलच्या चेहऱ्यावरही विराट आऊट होण्याची निराशा झळकत होती. निराश झालेला कोहली जेव्हा राहुल जवळून जाऊ लागला, तेव्हा राहुलने आपल्या सहकाऱ्याला सांगितले की ‘मी आहे ना, मी मारतोय ना, तू जोखीम घेत मोठा शॉट खेळण्याची गरज नाही.’ तेव्हाची केएल राहुलची प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरली आहे.
हेही वाचा : IND vs AUS : अय्यरचा मिसाईल थ्रो पाहिलात का? अॅलेक्स कॅरीला काही कळण्याआधीच क्षणात खेळ उध्वस्त..; पहा Video
शतक पूर्ण न करू शकलेला कोहली बाद झाल्यानंतर मैदानतून भारतीय ड्रेसिंग रूमकडे जात असताना राहुल म्हणाला की , “मी मारत आहे ना!” त्यावेळी केएल राहुलची प्रतिक्रिया बघण्यासारखी होती. विराट कोहलीने महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा ICC एकदिवसीय स्पर्धेत सर्वाधिक 50 पेक्षा जास्त धावा करण्याचा विक्रम मोडीत काढला आहे. विराटच्या नावावर आता 24 अर्धशतके असून ती तेंडुलकरच्या आधीच्या विक्रमापेक्षा एकने जास्त आहेत.
5 मार्चला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने बाजी मारली. ऑस्ट्रेलियाचा डाव 49.3 षटकांत सर्वबाद 264 धावांवर आटोपला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक 73 धावांची खेळी केली तर ॲलेक्स कॅरीने 61 धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले. भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक तीन तर रवींद्र जडेजा आणि वरुण चक्रवर्तीने प्रत्येकी दोन विकेट मिळवल्या.
भारतीय संघाने 265 धावांचा पाठलाग करत हा सामना 4 गडी राखून जिंकला. भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक 84 धावा केल्या. यासह तो चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. त्याशिवाय केएल राहुलने नाबाद 42, श्रेयस अय्यरने 45, हार्दिक पांड्याने 28, अक्षर पटेलने 27 आणि रोहित शर्माने 28 धावा करून सामना आपल्या नावे केला. ऑस्ट्रेलियातर्फे झाम्पाने दोन आणि नॅथन एलिसने दोन विकेट्स घेतल्या.
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, श्रेयस अय्यर , विराट कोहली , अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकिपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शामी आणि वरुण चक्रवर्ती
ट्रॅव्हिस हेड, कूपर क्रोनाली, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), जोश इंग्लिश (विकेटकिपर), मार्नस लाबुशेन, अॅलेक्स केरी, ग्लेन मॅक्सवेल, बेन द्वारशियस, नॅथन एलिस, अॅडम झांपा, तनवीर संघा