IND vs AUS : अय्यरचा मिसाईल थ्रो पाहिलात का? अॅलेक्स कॅरीला काही कळण्याआधीच क्षणात खेळ उध्वस्त..;(फोटो सौजन्य- @Rkc1511165)
IND vs AUS : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या सेमी फायनलमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया समोर समोर उभे ठाकले आहेत. ऑस्ट्रेलियाने फलंदाजी करून भारतासमोर 265 धावांचे आव्हान ठेवले आहे. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजी दरम्यान भारतीय खेळाडूंचे दमदार क्षेत्ररक्षण बघयाला मिळाले. भारतीय संघात फलंदाजीसह गोलंदाजी तसेच क्षेत्ररक्षण या तिन्ही प्रकारात सर्वोच्च दर्जाचे खेळाडू आहेत. अशातच अॅलेक्स कॅरी फलंदाजी करत असताना चोरटी धाव घेण्याचा त्याचा डाव अंगलट आला. श्रेयस अय्यरच्या सुसाट आलेल्या थ्रोने त्याला थेट तंबूचा रस्ता धरावा लागला. अॅलेक्स कॅरी धाव बाद होऊन माघारी परतला.
अॅलेक्स कॅरी भारतीय गोलंदाजांसाठी अडचणीचा ठरू लागला होता. तो आक्रमक होऊन खेळत होता. आशात त्याला अखेरच्या षटकामध्ये कोण ब्रेक लावणार? हा प्रश्न या वासून उभा असताना श्रेयस अय्यरने मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षण करत कॅरीची महत्त्वपूर्ण विकेट मिळवून दिली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत श्रेयस अय्यरने उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा नजारा पेश केला आहे. त्याची सध्या जोरदार चर्चा रंगू लागली आहे. ऑस्ट्रेलियाच्या डावातील 48 व्या षटकात श्रेयस अय्यरने सुसाट थ्रो फेकत कॅरीला माघारी पाठवले. या षटकातील हार्दिक पांड्याच्या पहिल्या चेंडूवर दुहेरी धाव घेण्याच्या नादात कॅरीला आपली विकेट गमवावी लागली. कॅरी बाद झाल्यामुळे अय्यरने संघाच्या 20-25 धावा वाचवल्याचे बोलले जाता आहे.
What a direct hit from shreyas Iyer to get Alex carey run out.
He is pumped up🥵pic.twitter.com/iUmxljsg7t— Radha (@Rkc1511165) March 4, 2025
हेही वाचा : VIDEO : स्टीव्ह स्मिथ आऊट होताच गौतम गंभीरचा जल्लोष, शिवीही दिली? सोशल मीडियावर धुमाकूळ
ऑस्ट्रेलियाचे आघाडीचे फलंदाज स्वस्तात माघारी परतल्यानंतर अॅलेक्स केरीने एक बाजू लावून धरली. त्याने स्मिथसोबत अर्धशतकी भागीदारी रचत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. केरीने भारतीय संघातील गोलंदाजांना चांगलेच जेरीस आणले होते. कॅरीने सेमी फायनलमधील महत्त्वपूर्ण लढतीत 57 चेंडूमध्ये 8 चौकार आणि 1 षटकार लगावत ६१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलिया टीम इंडियासमोर आव्हानात्मक धावसंख्या उभारू शकली. श्रेयस अय्यरने तीच्या खेळीला उध्वस्त करत भारताला मॅचमध्ये परत आणले आहे.
टीम इंडियाच्या डावाची सुरुवात कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार शुभमन गिल या सलामीवीरांनी केली. परंतु, भारताची सुरवात खराब झाली. गिल 8 धावा करून बाद झाला. त्यानंतर लयीत असणारा रोहित शर्मा 29 चेंडूंत 3 चौकार आणि एका षटकारासह 28 धावा करून कूपर कॉनलीकहा शिकार ठरला. गिलनंतर आलेला विराट कोहली 84 धावां करून बाद झाला आहे. तर श्रेयस अय्यर 62 चेंडूमध्ये 45 धावा करून बाद झाला. त्याला अॅडम झांपाने तंबूत पाठवले. भारताने 247 धावा केल्या असून हार्दिक पंड्या आणि केएल राहुल खेळत आहेत.
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, श्रेयस अय्यर , विराट कोहली , अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकिपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शामी आणि वरुण चक्रवर्ती
ट्रॅव्हिस हेड, कूपर क्रोनाली, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), जोश इंग्लिश (विकेटकिपर), मार्नस लाबुशेन, अॅलेक्स केरी, ग्लेन मॅक्सवेल, बेन द्वारशियस, नॅथन एलिस, अॅडम झांपा, तनवीर संघा