Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जाणून घ्या ऋषभ पंतबद्दल तुम्हाला माहित नसलेल्या 3 गोष्टी

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऋषभ पंतचा उदय हा अनेक महत्त्वाकांक्षी क्रिकेट स्टार्सना प्रेरणा देणारा ठरतोय. अवघ्या 24 व्या वर्षी ऋषभने स्टार खेळाडूंनी जडलेल्या भारतीय संघात आपलं एक वेगळं स्थान बनवलंय. ऋषभच्या दमदार खेळीमुळे तो सध्या भारतीय संघातील पहिल्या पसंतीचा खेळाडू बनला असून त्याच्या कामगिरीमुळे अनेकदा भारतीय संघाला विजय मिळवून दिलेला आहे.

  • By Payal Hargode
Updated On: Sep 18, 2022 | 04:19 PM
जाणून घ्या ऋषभ पंतबद्दल तुम्हाला माहित नसलेल्या 3 गोष्टी
Follow Us
Close
Follow Us:

सध्या सोशल मीडियामुळे क्रिकेटस्टारच्या कोणत्याच गोष्टी आपल्यापासून लपून राहत नाहीत. मात्र आज आम्ही तुम्हाला क्रिकेटस्टार ऋषभ पंत बद्दल माहित नसलेल्या तीन गोष्टी सांगणार आहोत.

१. ऋषभची गाड्यांची आवड :

तुम्हाला कदाचित माहित नसेल परंतु क्रिकेटपटू ऋषभ पंत याला गाड्यांची फार आवड आहे. ऋषभच्या गॅरेजमध्ये अनेक आकर्षक आणि आलिशान गाड्या पार्क केलेल्या आहेत. एका मुलाखतीत ऋषभने सांगितले होते की, त्याला नेहमीच i20 ही त्याची पहिली कार बनवायची होती. तो म्हणाला माझ्याकडे 100 कोटी रुपये असले तरीही मी तीच कार खरेदी करेन. अखेर जेव्हा क्रिकेट खेळून त्याने पैसे कमावले तेव्हा तो प्रशिक्षक देवेंद्र शर्मा यांच्यासोबत त्याची आवडती कार खरेदी करण्यासाठी गेला होता. ऋषभ आपल्या आवडत्या कारबद्दल बोलताना म्हणतो, “माहित नाही का पण मला ती कार फार आवडते, मी कदाचित त्यातून कधीकाळी प्रवास केला असेल तर आठवत नाही, पण मला एवढेच माहित होते की i20 हीच माझी पहिली कार असेल”. I २० सह ऋषभ पंतच्या ताफ्यात सध्या ऑडी ए8, मर्सिडीज बेंझ सी-क्लास, फोर्ड मुस्टँग आणि मर्सिडीज जीएलई या गाड्यांचा समावेश आहे.

2. उत्तराखंडचा ब्रँड अॅम्बेसेडर

ऋषभ पंत हा युवा क्रिकेट स्टार उत्तराखंड राज्याचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे. ऐकून आश्चर्य वाटलं ना ! खरतर उत्तराखंड मधील रुरकी हे ऋषभ पंतचे मूळ गाव आहे. मागच्या यावर्षी डिसेंबर महिन्यात उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी ऋषभची उत्तराखंडच्या ब्रँड अँबॅसिडर म्हणून घोषणा केली. उत्तराखंडातील युवकांना क्रीडा आणि सार्वजनिक आरोग्यासाठी प्रोत्साहित करण्याची जबाबदारी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून ऋषभच्या खांद्यावर देण्यात आली आहे.

३. ऋषभ पंत पूर्वी राजस्थान संघातून खेळायचा

होय, ऋषभ सध्या देशांतर्गत क्रिकेट दिल्ली येथून खेळत असला तरी तो कधी काळी देशांतर्गत क्रिकेट मध्ये खेळण्याची संधी मिळावी यासाठी राजस्थानला गेला होता . ऋषभ पंतचे बालपणीचे प्रशिक्षक तारक सिन्हा यांनी त्याला क्रिकेटच्या चांगल्या संधींसाठी आपला तळ राजस्थानला हलवण्याचा सल्ला दिला होता. प्रतिभावान ग्लोव्हजमनने असेच केले आणि अंडर-14 आणि अंडर-16 स्तरांवर राजस्थानचे प्रतिनिधित्व केले होते. मात्र ऋषभ पंतला बाहेरचा खेळाडू असल्याने राजस्थान कॅम्पमध्ये भेदभावाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे त्याची कारकीर्द पुन्हा रुळावर आणण्यासाठी तो पुन्हा लवकरच दिल्लीला परतला होता. त्यानंतर त्याने ऑक्टोबर 2015 मध्ये दिल्लीसाठी रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केले. या डायनॅमिक फलंदाजाने देशांतर्गत क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये संघासाठी प्रभावी कामगिरी केली आहे. 2016-17 च्या विजय हजारे ट्रॉफीसाठी त्याने गौतम गंभीरच्या जागी संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती केली होती.

Web Title: Know 3 things you didnt know about rishabh pant

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2022 | 04:19 PM

Topics:  

  • cricket news
  • Rishabh Pant
  • Sport News

संबंधित बातम्या

IND vs SA : कसोटी क्रिकेटमध्ये ऋषभ पंत बनला भारताचा नवा ‘सिक्सर किंग’, वीरेंद्र सेहवागला मागे टाकत रचला इतिहास
1

IND vs SA : कसोटी क्रिकेटमध्ये ऋषभ पंत बनला भारताचा नवा ‘सिक्सर किंग’, वीरेंद्र सेहवागला मागे टाकत रचला इतिहास

IND vs SA Test series : ‘तो नेहमीच दयाळू राहिला…’ दुखापतीतून सावरल्यानंतर ऋषभ पंतने कुणाचे मानले आभार? 
2

IND vs SA Test series : ‘तो नेहमीच दयाळू राहिला…’ दुखापतीतून सावरल्यानंतर ऋषभ पंतने कुणाचे मानले आभार? 

IND vs SA : पंत करणार संघात कमबॅक, जुरेलला मिळणार संघात संधी! कोणाचा होणार पत्ता कट? कशी असु शकते भारतीय संघाची Playing 11
3

IND vs SA : पंत करणार संघात कमबॅक, जुरेलला मिळणार संघात संधी! कोणाचा होणार पत्ता कट? कशी असु शकते भारतीय संघाची Playing 11

दक्षिण आफ्रिका मालिकेपूर्वी टीम इंडियासाठी वाईट बातमी, ऋषभ पंत पुन्हा जखमी! सोडावे लागले मैदान
4

दक्षिण आफ्रिका मालिकेपूर्वी टीम इंडियासाठी वाईट बातमी, ऋषभ पंत पुन्हा जखमी! सोडावे लागले मैदान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.