Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs WI: सिरीजमध्ये पहिल्यांदाच केली बॅटिंग अन् बनवला रेकॉर्ड, KL Rahul ने 80 चेंडूत झळवले शतक, 10 हजार धावा पूर्ण

IND vs WI: KL Rahul ला या सिरीजमध्ये खेळण्याची संधी मिळाली नव्हती. आज अडचणीच्या काळात शतक झळकवत भारताला ३०० च्या पार राहुलने आणून ठेवले. राहुलने या सामन्यात रेकॉर्ड बनवला.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Oct 03, 2026 | 07:30 PM
KL राहुलचा रेकॉर्ड (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

KL राहुलचा रेकॉर्ड (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • लोकेश राहुलचा अप्रतिम खेळ, ठोकले नाबाद शतक 
  • केएल राहुलने भारताला चांगली खेळी करून देत योग्य स्कोअर मिळवून दिला
  • ९ वे शतक झळकावत राहुलने १० हजार धावांचा टप्पाही पूर्ण केलाय
IND vs WI: भारत आणि वेस्ट इंडिज सिरीजमधील तिसरा सामना आज केएल राहुलने गाजवला असून त्याने आपले ९ वे एकदिवसीय शतक पूर्ण केले आहे. केवळ ८० धावांमध्ये शतक पूर्ण करत गरजेच्या वेळी कमालीची संयमी खेळी केली आहे. अत्यंत गरजेच्या काळात फिल्डवर खंबीरपणे उभं राहत त्याने भारताला ३०० धावांचा टप्पा पार करून दिला.  शतक पूर्ण झाल्यानंतर अधिक आक्रमक फलंदाजी करत त्याने ३५१ धावांचा डोंगर उभा केला. तसंच त्याने आपल्या एकदिवसीय करिअरमधील सर्वात मोठी धावसंख्याही केली आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०००० धावांचा टप्पाही पार केला.

लोकेश राहुल ८७ चेंडूमध्ये १२९ धावा करत नाबाद राहिला. यादरम्यान त्याने १० चौकार आणि ६ छक्के मारले आहेत. पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करायला आलेल्या राहुलने कमालीची फलंदाजी करत चाहत्यांचे मन जिंकून घेतले आहे. राहुल जेव्हा फलंदाजीसाठी मैदानात आला तेव्हा भारताची अवस्था १४१ धावा करून ३ विकेट्स अशी होती. केवळ २५ ओव्हर्सचा खेळ बाकी होता. राहुलने अत्यंत सावधगिरीने खेळ सुरू केला. दुसऱ्या बाजूने विकेट्स गेल्या असल्या तरीही राहुल भक्कमरित्या उभा राहिला आणि शेवटच्या ५ षटकांमध्ये ३५० धावांचा टप्पा भारतीय संघाला पार करून दिला. राहुलने आठव्या विकेट्ससाठी ६१ धावांची भागीदारी केली, दरम्यान यात गुरनुर ब्रारचा वाटा केवळ ८ धावांचा होता. 

IND vs WI 3rd ODI: चंदीगडच्या मैदानात धावांचा पाऊस की गोलंदाजांचा कहर? खेळपट्टी कोणाला देणार साथ; पाहा Pitch Report

पाचव्या क्रमांकावर अधिक धावा करणारे भारतीय फलंदाज 

139: युवराज सिंह विरूद्ध सिडनी ऑस्ट्रेलिया 2004 

134: एम एस धोनी विरूद्ध इंग्लंड कटक 2017

129*: केएल राहुल विरुद्ध वेस्ट इंडिज न्यू चंदीगढ 2026

124: एम एस धोनी विरूद्ध ऑस्ट्रेलिया नागपूर 2009

राहुलच्या करिअरमधील दुसरे सर्वात जलद शतक 

राहुलने हे शतक केवळ ८० धावांमध्ये पूर्ण केले आहे. एकदिवसीय करिअरमधील राहुलचे दुसरे सर्वात जलद शतक आहे. याआधी त्याने २०२३ मध्ये एकदिवसीय विश्वचषकात नेदरलँड्सविरुद्ध ६२ चेंडूमध्ये शतक केले होते. लोकेश राहुलची ही खेळी अधिक खास आहे कारण दुसऱ्या बाजूने मात्र भारतीय संघाच्या खेळाडूंच्या विकेट्स पडत असताना त्याने अत्यंत संयमी खेळी केली. दुसऱ्या बाजूला नक्की काय होत आहे याचा त्याने स्वतःच्या मनावर कोणताही परिणाम होऊ दिला नाही. ४२ चेंडूमध्ये त्याने अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर त्याने ८० चेंडूत शतक पूर्ण केले आणि धडाका चालू ठेवत केवळ ८७ चेंडूमध्ये त्याने नाबाद १२९ धावा पूर्ण केल्या.

IND vs WI Playing XI: रविंद्र जडेजा Out, सिराज In, तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ करणार का बदल?

Web Title: Ind vs wi kl rahul completed 10000 runs and 9th odi century dn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2026 | 07:30 PM

Topics:  

  • cricket news
  • Ind vs WI
  • IND vs WI ODI Series
  • k l rahul

संबंधित बातम्या

IND vs WI 3rd ODI Live: आधी हिटमॅनची वादळी खेळी, मग राहुलचं झंझावाती शतक! टीम इंडियाने वेस्टइंडिजसमोर ठेवलं ३५२ धावांचं टार्गेट
1

IND vs WI 3rd ODI Live: आधी हिटमॅनची वादळी खेळी, मग राहुलचं झंझावाती शतक! टीम इंडियाने वेस्टइंडिजसमोर ठेवलं ३५२ धावांचं टार्गेट

Cricket: क्रिकेटविश्वात धावांचं महावादळ! ‘या’ फलंदाजाने उद्ध्वस्त केला Chris Gayle चा 175 धावांचा रेकॉर्ड; बनला T20 चा नवा King
2

Cricket: क्रिकेटविश्वात धावांचं महावादळ! ‘या’ फलंदाजाने उद्ध्वस्त केला Chris Gayle चा 175 धावांचा रेकॉर्ड; बनला T20 चा नवा King

IND vs WI 3rd ODI Live: हिटमॅनचा ‘विराट’ पराक्रम! Rohit Sharma ने सचिन तेंडुलकरचा २२ वर्षांचा ‘हा’ विक्रम केला उद्ध्वस्त
3

IND vs WI 3rd ODI Live: हिटमॅनचा ‘विराट’ पराक्रम! Rohit Sharma ने सचिन तेंडुलकरचा २२ वर्षांचा ‘हा’ विक्रम केला उद्ध्वस्त

IND vs WI 3rd ODI Live: गेमप्लॅन ठरला! भारताने टॉस जिंकून घेतला ‘हा’ मोठा निर्णय; अंशूल कंबोजला पदार्पणाची संधी
4

IND vs WI 3rd ODI Live: गेमप्लॅन ठरला! भारताने टॉस जिंकून घेतला ‘हा’ मोठा निर्णय; अंशूल कंबोजला पदार्पणाची संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.