
उद्या भारत आणि पाकिस्तान येणार आमनेसामने
वर्ल्ड कप फायनलआधी रंगणार महामुकाबला
संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार सामना
ICC Women’s T 20 World Cup 2026: कालपासून आयसीसी टी २० महिला वर्ल्ड कप स्पर्धा सुरू झाली आहे. पहिल्या सामन्यात इंग्लंडने श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवला आहे. मात्र या वर्ल्डकपमधला सर्वात मोठा सामना उद्या होणार आहे. उद्या संध्याकाळी ७ वाजता भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. या सामन्याआधी वर्ल्डकप स्पर्धेत कोणता संघ वरचढ आहे, ते जाणून घेऊयात.
उद्या संध्याकाळी ७ वाजता भारत आणि पाकिस्तानचा संघ एकमेकांच्या विरुद्ध भिडणार आहेत. ग्रुप १ मध्ये भारत आणि पाकिस्तान खेळणार आहेत. आयसीसी एकदिवसीय वर्ल्ड कप जिंकल्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढलेला आहे. त्यामुळे उद्याच्या सामन्यात भारतीय संघ जिंकण्यासाठी मैदानात उतरेल यात शंका नाही.
सध्या भारतीय महिला क्रिकेट संघ आयसीसी टी २० रॅंकिंगमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. तर पाकिस्तान ८ व्या स्थानावर आहे. त्यामुळे सध्या आकडेवारीनुसार भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे. भारतीय संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौर करणार आहे. तर पाकिस्तानचे नेतृत्व फातीमा सना करत आहे. भारतीय संघाने सराव सामन्यात देखील चांगली कामगिरी केली आहे.
IND W vs PAK W: Women’s T20 World Cup 2026 मध्ये भिडणार भारत – पाकिस्तान, पिचवर कोण राहणार वरचढ
पाकिस्तानचा संघ वर्ल्डकप स्पर्धेत सध्या ८ व्या स्थानावर आहे. तसेच वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा रेकॉर्डस चांगले पाहायला मिळून येत नाहीये. पाकिस्तान महिला क्रिकेट संघ गेल्या पाच सामन्यांमध्ये केवळ एकच सामना जिंकू शकली आहे. भारताचा पाकिस्तानविरुद्ध रेकॉर्ड चांगला राहिला आहे. त्यामुळे उद्याच्या सामन्यात भारताचे पारडे जड दिसून येत आहे.
खेळपट्टी कशी असेल?
बर्मिंगहॅमच्या एडजबॅस्टन येथील खेळपट्टी साधारणपणे अनुकूल मानली जाते. खेळपट्टीवर चांगला बाऊन्स आणि वेग मिळतो, ज्यामुळे मोठे फटके मारणे सोपे होते. इंग्लंडमधील परिस्थितीमुळे, वेगवान गोलंदाजांना सुरुवातीला मूव्हमेंट आणि स्विंग मिळतो. येथे फिरकी गोलंदाजांची भूमिका फारशी महत्त्वाची नसते. तथापि, चेंडू जुना झाल्यावर त्याला काही प्रमाणात टर्न आणि ग्रिप मिळू शकते. महिला क्रिकेटमध्ये, प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाची सरासरी धावसंख्या १४५ आहे, जी लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघासाठी अनुकूल ठरू शकते.
ENG W vs SL W: महिला T20 विश्वचषकाची दणदणीत सुरुवात! इंग्लंडचा श्रीलंकेवर विजय; मोडले अनेक विक्रम
महिला टी-२० विश्वचषक २०२६ साठी दोन्ही संघ
भारत – हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, भारती फुलमाली, दीप्ती शर्मा, रिचा घोष (यष्टीरक्षक), श्री चरानी, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), नंदनी शर्मा, अरुंधती रेड्डी, रेणुका ठाकूर, क्रांती गौड, श्रेयंका पाटील, राधा यादव.
पाकिस्तान – फातिमा सना (कर्णधार), गुल फिरोजा, आयेशा जफर, इरम जावेद, इमान फातिमा, आलिया रियाझ, नतालिया परवेझ, सायरा जबीन, मुनीबा अली, तोबा हसन, रमीन शमीम, सादिया इक्बाल, नशरा संधू, डायना बेग, तस्मिया रुबाब