
Team India (Photo Credit- X)
आशिया कपच्या नियमानुसार, सुपर फोरमध्ये प्रत्येक संघाला तीन सामने खेळावे लागतील. भारताचे सामने २१, २४ आणि २६ सप्टेंबर रोजी आहेत. जर संघ अंतिम फेरीत पोहोचला, तर त्यांना २८ सप्टेंबर रोजीही खेळावे लागेल. याचा अर्थ, भारताला सात दिवसांत चार सामने खेळावे लागू शकतात. अशा परिस्थितीत, खेळाडू ताजेतवाने राहावेत यासाठी संघ व्यवस्थापन काही खेळाडूंना विश्रांती देऊ शकते.
Match 12 ⚔️ With the Super 4 spots sealed and closed, unbeaten India will take on Oman and put the final pieces of their puzzle in place.#INDvOMAN #DPWorldAsiaCup2025 #ACC pic.twitter.com/LmJFkdkCUS — AsianCricketCouncil (@ACCMedia1) September 19, 2025
संघाचे महत्त्वाचे खेळाडू असलेल्या जसप्रीत बुमराह, अष्टपैलू शिवम दुबे आणि हार्दिक पंड्या यांना या सामन्यात विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे.
जर बुमराह, दुबे आणि हार्दिकला विश्रांती दिली, तर त्यांच्या जागी काही खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली जाऊ शकते. यामध्ये गेल्या दोन सामन्यांमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये असलेला वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगचा समावेश असेल. शिवम दुबेच्या जागी फिनिशर रिंकू सिंगला संधी मिळू शकते, तर हार्दिक पंड्याच्या जागी हर्षित राणा प्लेइंग इलेव्हनमध्ये येऊ शकतो.
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सॅमसन, रिंकू सिंग, अक्षर पटेल, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती.
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन, हर्षित राणा, आर.