वैभव सूर्यवंशीची एकूण संपत्ती किती? (फोटो- सोशल मीडिया)
14 व्या वर्षी वैभव सूर्यवंशी आहे करोडपती
वैभव सूर्यवंशी राजस्थान रॉयल्सकडून खेळणार
28 मार्चपासून सुरू होणार आयपीएल
IPL 2026: यंदाचा आयपीएलचा हंगाम 28 मार्चपासून सुरू होणार आहे. 28 तारखेला बंगलोर विरुद्ध हैद्राबाद यांच्यात पहिला सामना होणार आहे. दरम्यान यंदाचे आयपीएल सुरू होण्याआधीच 14 वर्षीय वैभव सूर्यवंशी या खेळाडूची चर्चा सुरू झाली आहे. 2025 चा हंगाम वैभव सूर्यवंशीसाठी चांगला राहिला होता. गुजरातविरुद्ध त्याने शतकी खेळी केली होती. दरम्यान आज वैभव सूर्यवंशीची एकूण संपत्ती किती आहे ते जाणून घेऊयात.
वैभव सूर्यवंशी
2026 मधील आयपीएलच्या हंगामासाठी वैभव सूर्यवंशीची सॅलरी 1.10 कोटी इतकी आहे. राजस्थान रॉयल्सने त्याच्या मूळ लिलावाच्या किंमतीत कायम ठेवले. २०२५ च्या मेगा-लिलावात, वैभवला राजस्थान रॉयल्सने ₹३० लाख च्या मूळ किमतीवरून ₹१.१० कोटी मध्ये खरेदी केले.
बीसीसीआय देखील देते सॅलरी
आयपीएलसोबतच वैभव सूर्यवंशीला बीसीसीआय देखील पगार देते. अंडर 19 संघाचा सदस्य असल्यामुळे त्याला प्रत्येक संन्याला 20 हजार रुपये दिले जातात. राखीव खेळाडू असल्यास त्याला 10 हजार दिले जातात. अंडर 19 स्पर्धा जिंकल्यामुळे बीसीसीआयने 7.5 कोटीचे बक्षीस दिले होते. ज्यामध्ये प्रत्येक खेळाडूला 40 लाखांचे बक्षीस मिळाले. रणजी सामना खेळल्यास वैभव सूर्यवंशीला 1.60 लाख रुपये मिळतात,






