Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोहलीची ‘विराट’ कामगिरी! एवढा मोठा विक्रम करणारा पहिला आशियाई व्यक्ती; रोनाल्डो, मेस्सीच्या क्लबमध्ये सामील

 भारताचा दिग्गज क्रिकेटर विराट कोहली इंस्टाग्रामवर 250 दशलक्ष फॉलोअर्स पार करणारा पहिला आशियाई व्यक्ती बनला आहे. त्याने हा विक्रम करून सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी यांनासुद्धा मागे टाकले आहे.

  • By युवराज भगत
Updated On: May 25, 2023 | 03:46 PM
कोहलीची ‘विराट’ कामगिरी! एवढा मोठा विक्रम करणारा पहिला आशियाई व्यक्ती; रोनाल्डो, मेस्सीच्या क्लबमध्ये सामील
Follow Us
Close
Follow Us:

Virat Kohli : भारतीय क्रिकेटपटू (Indian Cricketer) आणि टीम इंडियाचा (Team India) माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याच्या नावावर मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. विराट कोहली इंस्टाग्रामवर 250 दशलक्ष फॉलोअर्स पार करणारा पहिला आशियाई व्यक्ती (First Asian to Reach 250 Millions Followers) बनला आहे. इतकंच नाही तर फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी (Lionel Messi) आणि ख्रिस्तियानो रोनाल्डोनंतर (Cristiano Ronaldo) हा विक्रम करणारा विराट कोहली तिसरा खेळाडू आहे. ‘किंग’ कोहलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. कोहलीचे भारतातच नाही तर, जगभरात असंख्य चाहते आहेत.
विराट कोहली ‘हा’ विक्रम करणारा पहिला आशियाई
विराट कोहली हे नाव फक्त भारतीय क्रिकेटशी जोडलेलं नसून जगभरात प्रसिद्ध आहे. मैदानावरील ‘अँग्री यंग मॅन’ विराट कोहली त्याची दमदार खेळी पॉवर हिटिंगसाठी प्रसिद्ध आहे. विराट कोहली सध्या 34 वर्षांचा आहे. कोहलीनं यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये हंगामात म्हणजेच आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये दोन शतकं ठोकली. यंदाच्या मोसमातून आरसीबी संघाचं आव्हान संपलं आहे. त्यामुळे सध्या कोहली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या तयारीसाठी इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे.
कोहलीच्या इंस्टाग्राम फॉलोअर्समध्ये झपाट्याने वाढ
इंडियन प्रीमियर लीगच्या यंदाच्या सोळाव्या हंगामात आरसीबी संघासाठी विराट कोहलीने चमकदार कामगिरी केली आहे. कोहलीनं आयपीएलमध्ये सर्वाधिक आठ शतकं ठोकण्याचा विक्रमही स्वत:च्या नावे केला आहे. विराटनं सलग दोन सामन्यात शतकं ठोकली मात्र, संघाचा पराभव झाला. आयपीएल 2023 मधून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नाही. आतापर्यंत आरसीबी संघाला एकदाही आयपीएलचं विजेतेपद मिळवता आलेलं नाही. त्यामुळे आरसीबी संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीची लोकप्रियता कमी होतेय की काय असे तर्कवितर्क लावले जात होते. मात्र, कोहलीच्या इंस्टाग्राम फॉलोअर्समध्ये झपाट्याने वाढ झाली आहे.
कोहलीचे इंस्टाग्रामवर 250 दशलक्ष फॉलोअर्स
विराट कोहली इंस्टाग्रामवर 250 दशलक्ष फॉलोअर्सचा टप्पा गाठणारा पहिला भारतीय आणि आशियाई बनला आहे. मेटा कंपनीची मालकी असलेला सोशल मीडिया प्लॅटफर्म इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्या आशियाई व्यक्तींच्या यादीत विराट कोहली अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर भारताचा माजी कर्णधार आणि सध्याचा चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघाचा कर्णधार एमएस धोनी 42.2 दशलक्ष फॉलोअर्ससह दुसऱ्या स्थानावर आहे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर क्रिकेटचा देव भारतरत्न सचिन तेंडुलकर आहे. सचिन तेंडुलकरचे इंस्टाग्रामवर 40.3 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.
कोहली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या तयारीसाठी लंडनमध्ये
विराट कोहली भारतीय संघाच्या पहिल्या बॅचसह इंग्लंडमध्ये पोहोचला आहे. लंडनमध्ये पार पडणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याआधी विराट कोहली दोन आठवडे सराव करणार आहे. यासाठी टीम इंडियाच्या पहिल्या बॅचमध्ये विराट कोहलीसह मोहम्मद सिराज पोहोचला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बहुप्रतिक्षित वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 7 जून, 2023 पासून लंडनच्या ‘द ओव्हल’ येथे खेळवला जाणार आहे.

Web Title: Kohlis virat performance first asian to achieve such a feat ronaldo joins messis club nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2023 | 03:45 PM

Topics:  

  • Cristiano Ronaldo

संबंधित बातम्या

Ronaldo engaged : अखेर तो क्षण आलाच…पाच पोरांचा बाप झाल्यानंतर रोनाल्डोने घेतला लग्नाचा निर्णय
1

Ronaldo engaged : अखेर तो क्षण आलाच…पाच पोरांचा बाप झाल्यानंतर रोनाल्डोने घेतला लग्नाचा निर्णय

World Football Day: आईला बाळंतपण नको होते, वडील मद्यपी, आज जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात श्रीमंत फुटबॉलपटू आहे ‘Ronaldo’
2

World Football Day: आईला बाळंतपण नको होते, वडील मद्यपी, आज जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात श्रीमंत फुटबॉलपटू आहे ‘Ronaldo’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.