फोटो सौजन्य - सोशल मिडिया
India U19 vs South Africa U19 : विश्वचषकाआधी भारतीय संघाची महत्वाची मालिका खेळवली जाणार आहे. यासाठी भारताचा अंडर 19 संघ हा दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. यासाठी भारतीय संघाचे कर्णधारपद हे युवा वैभव सुर्यवंशीकडे सोपवण्यात आले आहे. आजपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये तीन सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. २०२६ मध्ये होणाऱ्या आयसीसी १९ वर्षांखालील पुरुष एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी तयारी करत आहे.
भारतीय संघ या स्पर्धेपूर्वी आपली तयारी अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. परिणामी, युवा भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या युवा संघांमधील एकदिवसीय मालिका सुरू होणार आहे. वर्षाच्या सुरुवातीला वैभव सूर्यवंशी खेळताना दिसणार आहे. शिवाय, तो भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. चला तर मग जाणून घेऊया हा सामना कधी आणि कुठे खेळला जाईल.
भारताच्या १९ वर्षांखालील आणि दक्षिण आफ्रिकेच्या १९ वर्षांखालील संघांमधील पहिला युवा एकदिवसीय सामना ३ जानेवारी रोजी खेळला जाईल. हा सामना बेनोनी येथील विलोमूर पार्क येथे खेळला जाईल. या सामन्याची सुरुवात भारतीय वेळेनुसार दुपारी १:३० वाजता सुरू होईल आणि नाणेफेक दुपारी १ वाजता होईल. हा सामना भारतामध्ये जिओहाॅटस्टारवर क्रिकेट चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. तर टेलिव्हिजनवर या सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्सवर होणार आहे.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर, भारत १५ जानेवारी ते ६ फेब्रुवारी दरम्यान झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे होणाऱ्या १९ वर्षांखालील विश्वचषकात सहभागी होईल. आगामी आयसीसी पुरुष १९ वर्षांखालील विश्वचषकात १६ संघ विजेतेपदासाठी स्पर्धा करतील. सर्व संघांना चार गटात विभागण्यात आले आहे.
A new chapter begins 🇮🇳✨
Team India U19 head to South Africa for a 3-match Youth ODI series, with Vaibhav Sooryavanshi leading the side and young guns ready to step up on the big stage 👀 Future stars. Fresh challenges. Game on. 💪#INDvSA U19 – Youth ODI series 👉 Starts SAT,… pic.twitter.com/KdVDOefHlp — Star Sports (@StarSportsIndia) January 2, 2026
पाच वेळा विजेता राहिलेला भारत (२०००, २००८, २०१२, २०१८ आणि २०२२) न्यूझीलंड, अमेरिका आणि बांगलादेशसह गट ब मध्ये स्थान देण्यात आले आहे. भारत १५ जानेवारी रोजी बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लब येथे अमेरिकेविरुद्ध आपला मोहीम सुरू करेल. त्यानंतर १७ जानेवारी रोजी बांगलादेश आणि २४ जानेवारी रोजी न्यूझीलंडविरुद्ध सामने होतील.
वैभव सूर्यवंशी (कर्णधार), आरोन जॉर्ज, हरवंश पंगालिया, वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडू (यष्टीरक्षक), कनिष्क चौहान, आरएस अम्ब्रिस, खिलन पटेल, हेनिल पटेल, दीपेश देवेंद्रन, किशन कुमार सिंग, मोहम्मद एनान, राहुल कुमार, उद्धव मोहन, युवराज गोहिल.
झोरिच व्हॅन शाल्क्विक, अदनान लगाडियन, मुहम्मद बुलबुलिया (विकेटकीपर/कर्णधार), जेसन रोलेस, अरमान मॅनॅक, पॉल जेम्स, डॅनियल बोसमन, बॅन्डिले म्बाथा, एनटांडो सोनी, जेजे बासन, बायंडा माजोला, कॉर्नी बोथा, मायकेल क्रुइस्कॅम्प, लेथाबो फाहलामोहलाहत्का.






