Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lionel Messi चा फुटबॉलमधून अनिश्चित काळासाठी ब्रेक; नेमकं कारण काय? मैदानावर कधी परतणार?

Lionel Messi indefinite leave From International Football: अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीचने फुटबॉलमधून अनिश्चित काळासाठी विश्रांती घेतली आहे. तो मैदानावर पुन्हा कधी परतणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 12, 2026 | 02:15 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • लिओनेल मेसीचा फुटबॉलमधून अनिश्चित काळासाठी ब्रेक
  • वडिलांच्या निधनानंतर घेतला मोठा निर्णय
  • इंटर मियामीने मेस्सीला दिला पूर्ण पाठिंबा
अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज मेस्सी यांचे वयाच्या ६८ व्या वर्षी निधन झाले आहे. ते काही काळापासून आजारी होते आणि रोझारियो येथील एका रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जॉर्ज मेस्सी यांच्या निधनानंतर मेस्सीने फुटबॉलमधून तात्पुरती आणि आपल्या कारकिर्दीतून अनिश्चित काळासाठी विश्रांती घेतली आहे. मेस्सी आपल्या कुटुंबासोबत राहण्यासाठी अर्जेंटिनाच्या रोझारियो शहरात परतला आहे. इंटर मियामीने त्याला पूर्ण पाठिंबा दिला असला तरी, त्याच्या पुनरागमनाची कोणतीही निश्चित वेळ सांगितलेली नाही. त्यामुळे, ३९ वर्षीय मेस्सी मैदानावर कधी परत येईल हे अद्याप अस्पष्ट आहे.

King Kohli चा रेकॉर्ड धोक्यात! Shubman Gill रचणार WTC मध्ये इतिहास; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कर्णधार ठरणार

मेस्सी रोझारियोला परतला

मेस्सीचे वडील, जॉर्ज मेस्सी, यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यानंतर तो एका खाजगी विमानाने आपल्या मूळ गावी रोझारियोला गेला. त्याने आपल्या कुटुंबासोबत अंत्यविधी पूर्ण केली. मेस्सी दक्षिण फ्लोरिडामध्ये इंटर मियामीच्या आगामी लीग्स कप सामन्यासाठी तयारी करत होता. अचानक वडिलांच्या निधनाची बातमी मिळताच, त्याने तात्काळ अर्जेंटिनाला परतण्याचा निर्णय घेतला.

इंटर मियामीने मेस्सीला दिला पूर्ण पाठिंबा

स्पॅनिश प्रकाशन ‘मार्का’च्या वृत्तानुसार, इंटर मियामीने मेस्सीला पूर्ण पाठिंबा दिला असून त्याला बिनशर्त रजा मंजूर केली आहे. क्लबने अद्याप मेस्सीच्या परतण्याची तारीख निश्चित केलेली नाही. याचा अर्थ असा की, जोपर्यंत त्याला फुटबॉलसाठी परतण्याची इच्छा नाही, तोपर्यंत मेस्सी आपल्या कुटुंबासोबत अर्जेंटिनामध्ये राहू शकतो. त्याचे संघात परतणे आणि निवड ही पूर्णपणे त्याच्या वैयक्तिक परिस्थितीवर आणि तयारीवर अवलंबून असेल.

मुलाच्या कारकिर्दीत वडिलांची मोठी भूमिका

जॉर्ज मेस्सी यांनी आपल्या मुलाच्या कारकिर्दीत खूप महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी त्याच्या सुरुवातीच्या दिवसांपासून त्याचे व्यवस्थापक, प्रतिनिधी आणि सल्लागार म्हणून काम केले. रोझारियोमधील त्याच्या युवा कारकिर्दीच्या सुरुवातीपासून ते जागतिक फुटबॉलच्या शिखरापर्यंतच्या प्रवासात जॉर्ज मेस्सीसोबत होते. त्यामुळे, त्यांचे निधन मेस्सीसाठी वैयक्तिक आणि प्रोफेशनल अशा दोन्ही स्तरांवर एक मोठे नुकसान आहे.

मेस्सी उत्कृष्ट फॉर्ममध्ये परतला होता

मेस्सीने फुटबॉलमधून घेतलेली विश्रांती अशा वेळी आली आहे, जेव्हा तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये परतत होता. त्याने नुकतेच लीग कपमध्ये ॲटलेटिको सॅन लुईस विरुद्ध दोन गोल केले होते. पण वडिलांच्या निधनानंतर, मेस्सीने कुटुंबासोबत वेळ घालवण्याला प्राधान्य दिले आहे.

Canadian Open 2026 मध्ये मोठा उलटफेर! अलेक्झांड्रोव्हाचा ‘गेमचेंजर’ विजय; सबालेन्काला नमवत क्वार्टर फायनलमध्ये धडक

Web Title: Lionel messi indefinite football break father jorge messi death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2026 | 02:15 PM

Topics:  

  • Football
  • Football Tournament
  • Lionel Messi

संबंधित बातम्या

Football : फुटबॉलच्या मैदानात एकमेकांवर असे धडकले, की एकाला मृत्यूनेच गाठले!
1

Football : फुटबॉलच्या मैदानात एकमेकांवर असे धडकले, की एकाला मृत्यूनेच गाठले!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.