Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

LSG vs DC Pitch Report: लखनौच्या मैदानावर कोणाचे राहणार वर्चस्व? पावसाचे सावट, कसा रंगणार सामना

आयपीएल २०२६ चा पाचवा सामना लखनौ येथील एकाना क्रिकेट स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जाईल. या सामन्यात खेळपट्टीची परिस्थिती कशी आहे जाणून घ्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: Apr 01, 2026 | 02:41 PM
आजची खेळपट्टी कशी आहे (फोटो सौजन्य - Instagram)

आजची खेळपट्टी कशी आहे (फोटो सौजन्य - Instagram)

Follow Us
Close
Follow Us:
  • आज रंगणार लखनौ आणि दिल्ली संघात सामना 
  • कसा आहे पिच रिपोर्ट 
  • पावसाची आहे शक्यता 
IPL 2026 ची धुमधडाक्यात सुरूवात झाली आहे. पहिल्या ४ मॅचमध्ये वेगवेगळ्या संघानी लीड घेतलाय तर आज दिल्ली कॅपिटल्स इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १९व्या हंगामात बुधवारी लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. हा सामना लखनौ येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी एकाना स्टेडियमवर खेळला जाणार आहे. 

अक्षर पटेलच्या नेतृत्वाखालील दिल्ली संघ हंगामाची सुरुवात विजयाने करण्याचा प्रयत्न करेल. दरम्यान, एलएसजी संघही आपल्या घरच्या मैदानावर दमदार कामगिरी करण्याच्या प्रयत्नात असेल. दिल्ली आणि लखनौ या दोन्ही संघाने मागच्या हंगामात चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे यावेळी टॉप 4 मध्ये येत फायनल जिंकण्याचा नक्कीच दोन्ही संघाचा मनसुबा आहे. आजच्या खेळासाठी खेळपट्टी कशी असणार आहे याची आपण माहिती घेऊया. 

IPL 2026 मध्ये मोठा ड्रामा, स्वतःला रोहित शर्मा समजत होता राहुल तेवतिया; Umpire ने बदलायला लावली बॅट

लखनौ खेळपट्टी अहवाल

लखनौच्या एकाना स्टेडियमची खेळपट्टी साधारणपणे संथ आहे. फिरकी गोलंदाजांना या खेळपट्टीवर चांगले वळण मिळते आणि या मैदानावर मोठी धावसंख्या होत नाही हे या मैदानाचे वैशिष्ट्य . एकाना स्टेडियमवर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १५१ धावा, तर दुसऱ्या डावातील सरासरी धावसंख्या १२६ धावा आहे.

हवामान कसे असेल?

अ‍ॅक्युवेदरनुसार, बुधवारी लखनौमध्ये ढगाळ वातावरण राहील, परंतु पावसाची शक्यता कमी आहे. कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.

दिल्ली कॅपिटल्स आहे दमदार 

मागील हंगाम दिल्ली कॅपिटल्ससाठी संमिश्र स्वरूपाचा होता. संघाने सुरुवातीला जोरदार कामगिरी केली, परंतु उत्तरार्धात त्यांच्या विजयाची मालिका खंडित झाली. कागदावर, आयपीएल २०२६ मध्ये दिल्ली खूपच मजबूत दिसत आहे. संघात केएल राहुलसारखा अनुभवी सलामीवीर आहे, ज्याला पृथ्वी शॉची साथ मिळू शकते.

अभिषेक पोरेलने मागील हंगामात १४६ च्या स्ट्राइक रेटने ३०१ धावा करून आपल्या फलंदाजीने प्रभावित केले होते. करुण नायर, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल आणि नितीश राणा यांच्या उपस्थितीमुळे संघाची मधली फळीही संतुलित दिसते. डेव्हिड मिलरच्या आगमनाने संघाची फलंदाजी आणखी मजबूत झाली आहे.

समीर रिझवी, आशुतोष शर्मा आणि विपराज निगम दिल्लीसाठी फिनिशिंगची भूमिका बजावू शकतात. तथापि, मिचेल स्टार्कची अनुपस्थिती सुरुवातीच्या सामन्यांमध्ये संघाला निश्चितपणे त्रासदायक ठरू शकते. स्टार्कच्या अनुपस्थितीत, वेगवान गोलंदाजीची जबाबदारी लुंगी एनगिडी किंवा दुशमंथा चमीरा यांच्यावर सोपवली जाऊ शकते, ज्यांना मुकेश कुमार आणि टी. नटराजन यांची साथ मिळेल. कुलदीप यादव आणि अक्षर पटेल फिरकी गोलंदाजी विभागाचे नेतृत्व करतील.

IPL 2026: जिंकल्यानंतरही श्रेयस अय्यरला BCCI ने ठोठावला दंड, 12 लाखाचे नुकसान; काय आहे कारण

लखनौचा संघही मजबूत 

दुसरीकडे, मिचेल मार्श, निकोलस पूरन आणि एडन मार्कराम यांच्या उपस्थितीमुळे लखनौ सुपर जायंट्सची आघाडीची फळी मजबूत दिसत आहे. मधल्या फळीची जबाबदारी कर्णधार ऋषभ पंत, आयुष बडोनी, शहबाज अहमद आणि अब्दुल समद यांच्यावर असेल. वानिंदू हसरंगाच्या तंदुरुस्तीबद्दल प्रश्नचिन्ह असून, त्याला श्रीलंका क्रिकेट बोर्डाकडून परवानगी मिळालेली नाही. तथापि, लखनौचा गोलंदाजीचा मारा या हंगामात आश्वासक दिसत आहे. मयंक यादव किंवा ॲनरिच नॉर्टजे मोहम्मद शमीसोबत नव्या चेंडूने डावाची सुरुवात करू शकतात. संघात आवेश खान, प्रिन्स यादव आणि अर्जुन तेंडुलकर यांच्या रूपातही अनेक चांगले पर्याय आहेत.

Web Title: Lsg vs dc aka lucknow super giants vs delhi capitals who will win the match stadium pitch report

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 02:41 PM

Topics:  

  • IPL
  • IPL 2026
  • LSG vs DC

संबंधित बातम्या

IPL 2026 मध्ये Mumbai Indians चे हालच हाल! 16 वर्षानंतर सोडली ‘या’ दिग्गज खेळाडूने साथ
1

IPL 2026 मध्ये Mumbai Indians चे हालच हाल! 16 वर्षानंतर सोडली ‘या’ दिग्गज खेळाडूने साथ

IPL 2026 Qualification Chances : Dhoni च्या CSK चं टेन्शन वाढलं! RCB आणि GT च्या प्लेऑफच्या शक्यता 99%, कोणाचा पगडा किती भारी?
2

IPL 2026 Qualification Chances : Dhoni च्या CSK चं टेन्शन वाढलं! RCB आणि GT च्या प्लेऑफच्या शक्यता 99%, कोणाचा पगडा किती भारी?

LSG Vs CSK Live: मार्शने मारलं अन् निकोलसने संपवलं; चेन्नईचा ‘सुपर’ पराभव, ‘किंग्ज’ प्ले ऑफ बाहेर?
3

LSG Vs CSK Live: मार्शने मारलं अन् निकोलसने संपवलं; चेन्नईचा ‘सुपर’ पराभव, ‘किंग्ज’ प्ले ऑफ बाहेर?

IPL 2026: 31 मॅच, 1000+ धावा, मराठमोळ्या Ruturaj Gaikwad चा ‘असा’ रेकॉर्ड, जडेजा-रैनालाही तोडणे अशक्य
4

IPL 2026: 31 मॅच, 1000+ धावा, मराठमोळ्या Ruturaj Gaikwad चा ‘असा’ रेकॉर्ड, जडेजा-रैनालाही तोडणे अशक्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.