अक्षर पटेलचे कार कलेक्शन (फोटो सौजन्य - Instagram)
‘या’ आगामी Hybrid Cars वर लक्ष ठेवा! 28 किमीचा मायलेज आणि किंमत फक्त…
उत्कृष्ट गाड्या
आयपीएलनंतर भारतीय क्रिकेट संघात स्वतःचे स्थान निर्माण केलेल्या अक्षर पटेलकडे गाड्यांचा मोठा संग्रह नाही, पण त्यात काही निवडक गाड्या नक्कीच आहेत. तो चकचकीत सुपरकार्सपेक्षा आरामदायी आणि शक्तिशाली एसयूव्ही गाड्यांना प्राधान्य देतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अक्षरकडे अनेक आलिशान गाड्या आहेत. चला तर मग अक्षयच्या कार कलेक्शनमधील टॉप तीन गाड्यांबद्दल जाणून घेऊया.
लँड रोव्हर डिस्कव्हरी
ही अक्षर पटेल यांच्या सुरुवातीच्या लक्झरी कारपैकी एक आहे आणि आजही त्यांची आवडती आहे. तिची किंमत ₹१.२५ कोटी ते ₹१.३७ कोटी पर्यंत आहे. यामध्ये २९९७ सीसी, ४-सिलेंडर इंजिन आहे, जे २९६ बीएचपी आणि ६५० एनएम टॉर्क निर्माण करते. या कारमध्ये फ्रंट आणि रिअर एअर सस्पेंशन आहे, ज्यामुळे खराब रस्त्यांवर कमीत कमी धक्के बसतात. ही कार तिच्या मजबुती आणि ऑफ-रोडिंग क्षमतेसाठी ओळखली जाते. तिची प्रशस्त केबिन लांबच्या प्रवासासाठी अत्यंत आरामदायक आणि आलिशान आहे.
रेंज रोव्हर ऑटोबायोग्राफी
ही अक्षर पटेल यांच्या संग्रहातील सर्वात महागडी आणि आलिशान कार आहे. ही कार देशात आणि परदेशातही खूप लोकप्रिय आहे. अक्षय व्यतिरिक्त, अनेक क्रिकेटपटू आणि चित्रपट कलाकारांकडेही ही कार आहे. ही एक लक्झरी एसयूव्ही आहे, जी तिच्या उत्कृष्ट वैशिष्ट्यांसाठी आणि कामगिरीसाठी ओळखली जाते. तिची किंमत ₹३.५ कोटींहून अधिक असल्याचे म्हटले जाते. ही कार तिच्या उत्कृष्ट राइड क्वालिटी आणि आरामासाठी ओळखली जाते. रस्त्यावर गाडी चालवताना एखाद्या चालत्या राजवाड्यात असल्यासारखे वाटते.
Volkswagen Taigun Faelift च्या लाँच होण्याची तयारी सुरु? मिळाली ‘ही’ महत्वाची माहिती
मर्सिडीज-बेंझ एएमजी GLA35
इतर दोन गाड्या आराम आणि टिकाऊपणासाठी डिझाइन केलेल्या असताना, ही गाडी अक्षरच्या कार कलेक्शनमध्ये वेगाची भर घालते. ही उच्च वेगासाठी डिझाइन केलेली एक परफॉर्मन्स एसयूव्ही आहे. ती एका अत्यंत शक्तिशाली इंजिनने सुसज्ज आहे, ज्यामुळे ती खूप वेगवान बनते. ही गाडी स्पोर्टी लूकमध्ये येते आणि आकर्षक दिसते. तिचा पिकअप उत्कृष्ट आहे आणि ती क्षणात वाऱ्याशी संवाद साधू शकते. ती अक्षरच्या कलेक्शनला एक स्पोर्टी टच देते.






