Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026 : KKR मोठा दणका; Harshit Rana नंतर, आणखी एक वेगवान गोलंदाज IPL मधून बाहेर

तीन वेळा जेतेपदावर नाव कोरणाऱ्या या संघाला हंगामाच्या सुरुवातीलाच एकामागून एक धक्के बसत असून, खेळाडूंच्या दुखापतींनी संघाचे गणित बिघडवले आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 21, 2026 | 05:09 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • KKR संघाला हंगामाच्या सुरुवातीलाच एकामागून एक धक्के
  • आणखी एक वेगवान गोलंदाज बाहेर
  • गोलंदाजांची फळी कमकुवत वाटू लागली
Another Fast Bowler Ruled Out of the IPL : IPL 2026 चा मोठा रणसंग्राम सुरु होणार आहेत. या सीझनच्या तोंडावर कोलकाता नाईट रायडर्स टीमला दणक्यावर दणके लागत आहेत. तीन वेळा जेतेपदावर नाव कोरणाऱ्या या संघाला हंगामाच्या सुरुवातीलाच एकामागून एक धक्के बसत असून, खेळाडूंच्या दुखापतींनी संघाचे गणित बिघडवले आहे. संघातील खेळाडूंचे वाईट परफॉर्म्स सोबतच आता खेळाडूंच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

IPL 2026 पूर्वी ईडन गार्डन्सवर तुफान; KKR चे दिग्गज ठरले फ्लॉप, पण ‘या’ खेळाडूने 55 चेंडूंत ठोकलं शतक

आणखी एक वेगवान गोलंदाज बाहेर

केकेआरसाठी सर्वात मोठी डोकेदुखी ठरत आहे ती म्हणजे त्यांच्या प्रमुख वेगवान गोलंदाजांची अनुपस्थिती. युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणा दुखापतीमुळे आधीच या हंगामातून बाहेर पडला असताना आता, आणखी एक वेगवान गोलंदाज IPL 2026 मधून बाहेर पडला आहे. लिलावादरम्यान, KKR ने बंगालच्या या वेगवान गोलंदाजाला १ कोटी रुपयांना आपल्या संघात सामील करून घेतले होते. पण फिटनेसबाबत तक्रार असल्याने आता संघासमोर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

संघासमोर मोठे प्रश्नचिन्ह

कोलकाता नाईट रायडर्सने लिलावादरम्यान आकाश दीपच्या अनुभवावर विश्वास दाखवत त्याला १ कोटी रुपयांच्या बोलीवर आपल्या ताफ्यात सामील करून घेतले होते. मात्र, प्रत्यक्ष मैदानात उतरण्यापूर्वीच त्याच्या फिटनेसबाबतच्या तक्रारींमुळे संघासमोर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एका वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, कोलकाता नाईट रायडर्स संघाचा आकाश दीप IPL 2026 मधून बाहेर झाला असल्याचं म्हटले आहे. कोलकाता नाईट रायडर्सचे सराव शिबीर (कॅम्प) १८ मार्चपासून सुरू आहे; मात्र, २९ वर्षीय आकाश दीप यात सहभागी झालेला नसल्याचं समोर येत आहे. त्याच्या दुखापतीचे नेमके स्वरूप अद्याप अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आलेले नाही, परंतु तो या संपूर्ण हंगामात खेळू शकणार नाही हे आता जवळपास निश्चित मानले जात आहे.

गोलंदाजांची फळी कमकुवत वाटू लागली

या दुखापतींमुळे केकेआरच्या वेगवान गोलंदाजीच्या आक्रमणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेषतः भारतीय वेगवान गोलंदाजांची फळी आता कमकुवत वाटू लागली आहे. तीन वेळा IPL विजेत्या ठरलेल्या KKR संघाचा, २०२६ हंगामातील पहिला सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध होणार आहे. हे दोन्ही संघ २९ मार्च रोजी वानखेडे स्टेडियमवर आमनेसामने येणार आहे. त्यानंतर, २ एप्रिल रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर त्यांचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. ६ एप्रिल रोजी KKR पंजाब किंग्जचा सामना करेल हा सामना देखील कोलकाता येथेच खेळला जाणार आहे. घरच्या मैदानावर सामने खेळण्यापूर्वीच प्रमुख गोलंदाज बाहेर पडल्याने प्लेइंग इलेव्हन निवडण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत कोलकाता नाईट रायडर्सचा संघ या संकटांवर मात करून कशी कामगिरी करतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

RCB विजेतेपदाचा प्रमुख दावेदार, ‘पुढच्या 2 वर्षांत आणखी 2 ट्रॉफी!’, CSK च्या माजी खेळाडूचं विधान

Web Title: Major blow for kkr after harshit rana another fast bowler ruled out of the ipl

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2026 | 05:09 PM

Topics:  

  • Harshit Rana
  • IPL
  • IPL 2026. Cricket
  • KKR

संबंधित बातम्या

IND Vs IRE Live: आयर्लंडला दुबळं समजणं पडलं महागात! ‘या’ फलंदाजांनी धू-धू धुतले, भारताला 183 रन्सची गरज
1

IND Vs IRE Live: आयर्लंडला दुबळं समजणं पडलं महागात! ‘या’ फलंदाजांनी धू-धू धुतले, भारताला 183 रन्सची गरज

फाटलं! लखनौचा संघ सोडताच Rishabh Pant ची पोस्ट व्हायरल; केवळ 3 शब्दांमध्ये दिली प्रतिक्रिया
2

फाटलं! लखनौचा संघ सोडताच Rishabh Pant ची पोस्ट व्हायरल; केवळ 3 शब्दांमध्ये दिली प्रतिक्रिया

अति नखरे नडणार! Hardik Pandya ची हकालपट्टी होणार? राजस्थानच्या ‘या’ खेळाडूसाठी मेगा ट्रेड?
3

अति नखरे नडणार! Hardik Pandya ची हकालपट्टी होणार? राजस्थानच्या ‘या’ खेळाडूसाठी मेगा ट्रेड?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.