
Chess Tournament : मुंबई महापौर चषक बुद्धिबळ स्पर्धा : कार्तिकेय सावंत, साध्या जाधव गटविजेते
Chess Tournament : लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC) पुरस्कृत एलआयसी-मुंबई महापौर चषक शालेय बुद्धिबळ स्पर्धेत 12 वर्षांखालील गटात कार्तिकेय सावंत, तर 8 वर्षांखालील गटात साध्या जाधव यांनी गटविजेतेपद पटकावले. कार्तिकेयने 4.5 गुण मिळवत सरस सरासरीच्या आधारे बाजी मारली, तर साध्याने 5 गुणांसह अपराजित कामगिरी करत अव्वल स्थान मिळवले.
आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आणि आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने आरएमएमएसच्या वातानुकूलित सभागृहात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. निर्णायक पाचव्या साखळी फेरीत कार्तिकेयने मृण्मयी डावरेच्या बरोबरीच्या आव्हानावर सरस सरासरीच्या आधारे मात केली. दोघांनीही प्रत्येकी 4.5 गुण मिळवले; मात्र सरस सरासरीमुळे कार्तिकेयला पहिले स्थान मिळाले.
8 वर्षांखालील गटात साध्या जाधवने 5 गुण मिळवत निर्विवाद वर्चस्व गाजवले. त्याने अरिंजय भट्टाचार्जी, एकम बाघला आणि इथन पिकार्डो यांच्या कडव्या आव्हानांवर मात केली. या गटात अरिंजय भट्टाचार्जीने 4 गुणांसह दुसरे, एकम बाघलाने 4 गुणांसह तिसरे, इथन पिकार्डोने 4 गुणांसह चौथे, तर स्मित लोकेने 3.5 गुणांसह पाचवे स्थान मिळवले.
12 वर्षांखालील गटात कार्तिकेय सावंतने 4.5 गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. मृण्मयी डावरेनेही 4.5 गुण मिळवले; मात्र तिला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. आयांश पाटीलने 4 गुणांसह तिसरे, नैतिक पालकरने 4 गुणांसह चौथे, तर सार्थ लोकेने 4 गुणांसह पाचवे स्थान मिळवले.
विजेत्या कार्तिकेय सावंतचा आकर्षक चषक आणि भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. यावेळी क्रीडापटू गोविंदराव मोहिते, एलआयसी अधिकारी रमेश जोशी, क्रीडाप्रेमी निवृत्ती देसाई आणि अण्णा शिर्सेकर, प्रशिक्षक राजाबाबू गजेंगी तसेच शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण उपस्थित होते. स्पर्धेतील प्रत्येक गटातील पहिल्या 15 खेळाडूंना आकर्षक पुरस्कार देण्यात आले.
WPL Auction 2027 : सोफी मोलिनेक्ससाठी यूपी वॉरियर्सची १.१० कोटींची बोली; कमलिनी गुजरात जायंट्समध्ये
Ans: 12 वर्षांखालील गटात कार्तिकेय सावंत, तर 8 वर्षांखालील गटात साध्या जाधव गटविजेते ठरले.
Ans: कार्तिकेय सावंतने 4.5 गुण मिळवून सरस सरासरीच्या आधारे पहिले स्थान मिळवले.
Ans: आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आणि आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.