Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोर्टवर उलट्या, शरीर थकलं पण शेवटपर्यंत लढला! Navone ने Djokovic ला US Open मधून बाहेर काढलं; २४ ग्रँडस्लॅमचा चॅम्पियन ढसाढसा रडला

Mariano Navone beat Novak Djokovic in US Open 2026: यूएस ओपनमध्ये पहिल्याच फेरीत सर्बियन खेळाडूला मारियानो नॅव्होनने नोव्हाक जोकोविचला पराभूत केले.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 31, 2026 | 04:58 PM
Mariano Navone beat Novak Djokovic

Mariano Navone beat Novak Djokovic

Follow Us
Follow Us:
  • जोकोविचला पहिल्याच फेरीत धक्का
  • US Open मधून बाहेर
  • अर्जेंटिनाच्या मरियानो नावोनकडून पराभव
ग्रँड स्लॅम स्पर्धेतील सर्वात यशस्वी पुरुष खेळाडू नोव्हाक जोकोविचसाठी यूएस ओपन २०२६ (US Open 2026) ची सुरुवात अत्यंत निराशाजनक ठरली. न्यूयॉर्कमध्ये स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी सर्बियन खेळाडू मारियानो नवोनेने जोकोविचला पराभूत करून एक मोठा धक्का दिला. या पराभवामुळे जोकोविच यूएस ओपनमधून बाहेर पडला आहे. २५ वर्षीय नवोनेने ३९ वर्षीय जोकोविचला ७-६, ५-७, ६-४, २-६, ६-१ असे हरवून एक मोठा उलटफेर घडवला. या मोठ्या पराभवामुळे नोव्हाक जोकोविचचे २५ वे ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकण्याचे स्वप्न पहिल्याच सामन्यात भंगले.

IND vs THA: ७ चेंडू, ३ विकेट्स, एकही रन नाही! Deepti sharma च्या फिरकीसमोर थायलंडची ‘बत्ती गुल’; T20I मध्ये केला ‘हा’ महारिकॉर्ड

जोकोविचला उष्णता आणि आजारपणाचा त्रास

आर्थर ॲश स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्याच्या सुरुवातीपासूनच, जोकोविच न्यूयॉर्कमधील तीव्र उष्णता आणि दमटपणामुळे त्रस्त असल्याचे दिसत होते. हवामानामुळे स्टेडियमचे छत बंद होईपर्यंत, तो आराम मिळवण्यासाठी वारंवार डोक्यावर बर्फाच्या पिशव्या ठेवताना दिसला. तिसऱ्या सेटच्या सहाव्या गेमदरम्यान कोर्टवर अनेक वेळा उलट्या झाल्यामुळे त्याचा त्रास अधिकच वाढला. यानंतर, डॉक्टर आणि वैद्यकीय पथकाने औषधोपचार केले, ज्यामुळे त्याला सामन्यात टिकून राहण्यास मदत झाली.

जोकोविचनचे दुसऱ्या -तिसऱ्या सेटमध्ये शानदार पुनरागमन

शरीरातील पाण्याची कमतरता आणि प्रकृती अस्वस्थ असूनही, जोकोविचने दमदार खेळ केला. टायब्रेकमध्ये पहिला सेट गमावल्यानंतर, त्याने शानदार पुनरागमन करत दुसरा सेट ७-५ आणि तिसरा सेट ६-४ ने जिंकून आघाडी घेतली. पण अर्जेंटिनाच्या मारियानो नावॉनने सहजासहजी हार मानली नाही. त्याने उत्कृष्ट खेळ करत चौथा सेट ६-२ ने जिंकला आणि सामना पाचव्या व अंतिम सेटपर्यंत नेला.

Mariano’s moment 👇 pic.twitter.com/1EIuZ9v8u0 — US Open Tennis (@usopen) August 31, 2026

शेवटच्या सेटमध्ये जोकोविचला अश्रू अनावर

नवोनेने चौथ्या सेटमध्ये जोरदार पुनरागमन करत तो ६-२ ने जिंकला आणि सामना निर्णायक सेटमध्ये नेला. पाचव्या सेटमध्ये जोकोविच पूर्णपणे थकून गेलेला दिसत होता. जेव्हा नवोनेने ४-१ अशी आघाडी घेतली, तेव्हा त्या सर्बियन खेळाडूची ऊर्जा स्पष्टपणे दिसून येत होती. याचदरम्यान, जोकोविच कोर्टवर रडू लागला. २४-वेळच्या ग्रँड स्लॅम विजेत्यासाठी हा एक अत्यंत भावनिक क्षण होता. प्रेक्षक गॅलरीमध्ये त्याची पत्नी येलेनादेखील व्यथित झालेली दिसली. दुसरीकडे, नवोनेने आपला संयम राखला आणि निर्णायक सेट ६-१ ने जिंकून जोकोविचला स्पर्धेतून बाहेर काढले. यापूर्वी, जोकोविच विम्बल्डनच्या उपांत्य फेरीतून बाहेर पडला होता .

Novak Djokovic looks very emotional down 1-3 in the 5th set against Navone at the US Open. Definitely in pain physically, but these also look like emotional tears. 4+ hours at 39 years old. The New York crowd is trying to give him a push for another heroic comeback. 🥹 pic.twitter.com/QsZqF0Z04o — The Tennis Letter (@TheTennisLetter) August 31, 2026

जोकोविच आपल्या २५व्या ग्रँड स्लॅम एकेरी विजेतेपदाच्या शोधात होता. हा सामना जिंकला असता, तर तो पुरुष एकेरीमध्ये सर्वाधिक ग्रँड स्लॅम विजेतेपदे पटकावणारा खेळाडू ठरला असता. तो यूएस ओपनमधील जिमी कॉनर्सचा ९८ सामन्यांचा विक्रम मोडण्यापासून केवळ चार विजय दूर होता, परंतु पहिल्याच फेरीत झालेल्या पराभवामुळे त्याची यूएस ओपनमधील वाटचाल संपुष्टात आली.

IND vs THA: भारताची आशिया कपमध्ये दणक्यात सुरुवात! शफालीची वादळी खेळी अन् दीप्तीचा फिरकीचा कहर; टीम इंडियाने थायलंडला लोळवलं

Web Title: Mariano navone beat novak djokovic us open 2026 first round exit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 04:58 PM

Topics:  

  • International Tennis Tournament
  • Novak Djokovic
  • USA

संबंधित बातम्या

पैसाच-पैसा! ना 100, ना 200 कोटी… US Open 2026 मध्ये टेनिसपटूंवर होणार तब्बल ‘इतक्या’ कोटींची बरसात
1

पैसाच-पैसा! ना 100, ना 200 कोटी… US Open 2026 मध्ये टेनिसपटूंवर होणार तब्बल ‘इतक्या’ कोटींची बरसात

US Open 2026 मध्ये दिग्गजांना मोठा धक्का! सेरेना-अल्काराझचा पराभव; जोकोविच-सबालेन्काही पहिल्याच फेरीत गारद
2

US Open 2026 मध्ये दिग्गजांना मोठा धक्का! सेरेना-अल्काराझचा पराभव; जोकोविच-सबालेन्काही पहिल्याच फेरीत गारद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.