
"15 वर्षे झाली तरी..."; 2011 World Cup च्या विजयावर Sachin Tendulkar ने शेअर केला Video
2 एप्रिल 2011 मध्ये भारताने जिकलेला दुसऱ्यांदा विश्वचषक
महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात भारत विश्वविजेता
क्रिकेटच्या देवाने शेअर केला आठवणीचा व्हिडिओ
India Win 2011 World Cup Final: आज भारताने एकदिवसीय विश्वचषक जिंकून 15 वर्षे पूर्ण झाली आहेत. 2011 चा वर्ल्ड कप भारताने जिंकला होता. 2 एप्रिल 2011 रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारताने श्रीलंकेला पराभूत करून तब्बल 28 वर्षांनी वर्ल्डकपच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. भारताने 28 वर्षांनी ट्रॉफी जिंकली. हा वर्ल्ड कप मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरसाठी अत्यंत खास होता. त्या आठवणीत त्याने आज एक व्हिडिओ शेअर केला आहे.
भारतीय संघाचा हिस्सा असताना विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न सचिन तेंडुलकरसह अनेक खेळाडूंचे होते. ते अखेर कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वात भारताने वर्ल्डकप जिंकला होता. वर्ल्डकप जिंकल्याला 15 वर्षे पूर्ण झाल्याच्या आनंदात सचिन तेंडुलकरने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये क्रिकेटचा देव म्हणून ओळख असलेला सचिन तेंडुलकर नव्या जर्सीमध्ये दिसून येत आहे.
The first ball always makes your heart race… and that night, it never stopped. 15 years later, it still stays with us. We all grew up as a bunch of young cricketers, united by one dream. To win the World Cup for India. To everyone who was a part of the journey, and to all the… pic.twitter.com/rW141yJraF — Sachin Tendulkar (@sachin_rt) April 2, 2026
सचिन तेंडुलकरने आपल्या व्हीडिओत वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पहिला चेंडू खेळण्याचा अनुभव सांगितला आहे. पहिला चेंडू खेळताना कायम हृदय धडधड करते. तो क्षण 15 वर्षे झाली तरी अजूनही माझ्यासाठी खास आहे. एक संघ म्हणून सर्व खेळाडूंचे वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न होते.
“…नाहीतर माझी दाढी काढून टाकेन”, अर्जुन तेंडूलकरबाबत दाव्यानंतर ‘या’ दिग्गजाचं मोठं विधान
गांगुलीने अखेर ‘किंग’ कोण ते सांगूनच टाकलं
क्रिकेट विश्वात अनेक खेळाडू प्रसिद्ध आहे. भारतीय संघातील अनेक क्रिकेटपटू यांनी क्रिकेट जगतात अनेक मोठे रेकॉर्ड केले आहेत. दरम्यान भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्यात सर्वोत्तम खेळाडू कोण आहे याबाबत भाष्य केले आहे. सौरव गांगुली नेमके काय म्हणाला आहे ते जाणून घेऊयात.
Sachin की Virat? सौरव गांगुलीने अखेर ‘किंग’ कोण ते सांगूनच टाकलं! वाचा सविस्तर…
सचिन तेंडुलकर की विराट कोहली यांच्यात बेस्ट खेळाडू कोण आहे याबाबत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने भाष्य केले आहे. सचिन तेंडुलकर जगातील सर्वोत्तम खेळाडू असल्याचे त्याने म्हटले असल्याचे समोर येत आहे. त्याने सार्वजनिकरित्या दोघांमध्ये चांगले कोण असे सांगितले नाही. मात्र त्याने सचिन तेंडुलकरसोबत 14 वर्षे क्रिकेट खेळले आहे. त्याला जवळून खेळताना पाहिले आहे. त्यामुळे दोन्ही खेळाडूंची तुलना होऊ शकत नाही. मात्र सचिन हा मोठा खेळाडू आहे, असे सौरव गांगुली म्हणाला असल्याचे समोर आले आहे.