
MCA takes big step! 'This' decision taken for women's cricket academy in Mumbai; CM Fadnavis hugs him
Women’s Cricket Academy in Mumbai : मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. एमसीएकडून महाराष्ट्र सरकारला मुंबई महानगर प्रदेशात निवासी महिला क्रिकेट अकादमी बांधण्यासाठी योग्य जमीन देण्याची विनंती करण्यात आली आहे. एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी शुक्रवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या संदर्भात औपचारिक पत्र देखील सादर केले आहे. भारतीय संघाने नुकताच आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकाचे जेतेपद नावावर केल्यानंतर लगेचच हे पाऊल उचलण्यात आले आहे.
एमसीएकडून ,लिहिण्यात आलेल्या आपल्या पत्रात राज्य सरकारला कळवण्यात आले आहे की, गेल्या काही वर्षांत असोसिएशनने तरुण प्रतिभेला जोपासण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. या उपक्रमांकडून मुंबई आणि आसपासच्या भागातील क्रिकेटपटूंना अत्याधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. महिला क्रिकेट अकादमी स्थापन करण्यामागे प्राथमिक उद्दिष्ट असे आहे की, महिला खेळाडूंना भेडसावणाऱ्या एका मोठ्या समस्येचे निराकरण करणे. एमसीएने म्हटले की सध्या महिला खेळाडूंना सराव सत्रांसाठी लांबचा प्रवास करावा लागत आहे.
एमसीएकडून असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे की, निवासी अकादमी स्थापन करून, खेळाडूंना एकाच ठिकाणी दर्जेदार प्रशिक्षण आणि निवास व्यवस्था उपलब्ध करून देऊन ही समस्या प्रभावीपणे सोडवता येणार. महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी आणि भविष्यासाठी प्रतिभेचे संगोपन करण्यासाठी ही अकादमी एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघाने अलीकडेच नवी मुंबईमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला ५२ धावांनी पराभूत करून पहिला ५० षटकांचा विश्वचषक जिंकून भारतीय महिला क्रिकेटसाठी इतिहास रचला आहे.
हेही वाचा : IPL 2026 : ‘किंग’ कोहलीमुळे RCB ला विकण्याची वेळ? ‘त्या’ अहवालाने उडवली मोठी खळबळ; नेमकं कारण काय?
या विजयाचे स्मरण करण्यासाठी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दक्षिण मुंबईतील त्यांच्या अधिकृत निवासस्थानी ‘वर्षा’ येथे एका सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. समारंभामध्ये सदस्य स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज आणि राधा यादव यांचा सन्मान करण्यात आला असून प्रत्येकी २.५ कोटी देण्यात आले. भारतीय महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांना २.२ लाख रुपयांचे बक्षिस देण्यात आले.