Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026: नेमका घोळ काय? अंगकृष रघुवंशी आउट की नॉट आउट? MCC ने दिले ‘हे’ स्पष्टीकरण

केकेआरचा तरुण फलंदाज अंगक्रिश रघुवंशी याला ‘ऑबस्ट्रक्टिंग द फील्ड’ (Obstructing the Field – OBS) म्हणजेच फिल्डिंगमध्ये अडथळा आणल्याच्या कारणावरून आउट देण्यात आले.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 30, 2026 | 08:25 PM
IPL 2026: नेमका घोळ काय? अंगकृष रघुवंशी आउट की नॉट आउट? MCC ने दिले ‘हे’ स्पष्टीकरण
Follow Us
Follow Us:

थर्ड अंपायरने अंगरीक्ष रघुवंशीला दिले आउट 
विचित्र पद्धतीने आउट झालेला रघुवंशी 
व्हिडिओ मोठ्या प्रमाणात झालेला व्हायरल 

Angriksh Raghuvanshi Wicket: कोलकाता नाइट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात अटीतटीचा सामना पार पडला. या सामन्यात केकेआरचा विजय झाला आहे. केकेआर जिंकला असला तरी देखील चर्चा (IPL 2026) अंगरीक्ष रघुवंशीची सुरू आहे. ओबीएस पद्धतीने दिलेली त्याची विकेट, त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. आता यावर एमसीसीने स्पष्टीकरण दिले आहे.

केकेआरचा तरुण फलंदाज अंगक्रिश रघुवंशी याला ‘ऑबस्ट्रक्टिंग द फील्ड’ (Obstructing the Field – OBS) म्हणजेच फिल्डिंगमध्ये अडथळा आणल्याच्या कारणावरून आउट देण्यात आले. आयपीएलच्या इतिहासात अशा प्रकारे बाद होणारा तो फार कमी फलंदाजांपैकी एक ठरला आहे. आयपीएल 2026 मधील अंगकृष रघुवंशीच्या वादग्रस्त विकेटमुळे सर्वत्र एकच चर्चा सुरू आहे. यावर आता एमसीसीने पडदा टाकला आहे. अखेर क्रिकेटचे नियम बनवणाऱ्या मॅरिलेबोन क्रिकेट क्लबने (MCC) यावर आपली अधिकृत प्रतिक्रिया देत सर्व संभ्रम दूर केला आहे. थर्ड अंपायरने दिलेला निर्णय नियमानुसार पूर्णपणे योग्य होता, असे एमसीसीने स्पष्ट केले आहे.

ANGKRISH RAGHUVANSHI ANGRY ON POOR UMPIRING 🤬 pic.twitter.com/DBJdg9HRP6 — Rohshh45 (@rohitfc58737) April 26, 2026

एमसीसीने क्रिकेट नियमावलीमधील 37.1.1 चा दाखला दिला आहे. या नियमानुसार, जर एखाद्या फलंदाजाने आपल्या हालचालीने किंवा कृतीने जाणूनबुजून  फिल्डिंग करणाऱ्या संघास अडथळा निर्माण केला तर त्याला ओबीएस अंतर्गत आउट ठरवले जाते. एमसीसीने म्हटले आहे की, फलंदाजाची ती कृती फिल्डिंगमध्ये अडथळा आणणारी होती, त्यामुळे त्याला आउट देणे हा निर्णय तांत्रिकदृष्ट्या अचूक आहे.

नेमकं काय घडलं?

कोलकाता नाईट रायडर्सच्या डावातील ५ व्या षटकात ही घटना घडली. अंगक्रिशने चेंडू खेळून एक धाव घेण्यासाठी धाव घेतली. फील्डरने चेंडू पकडून नॉन-स्ट्रायकर एंडच्या दिशेने वेगाने फेकला. यावेळी रन पूर्ण करताना अंगक्रिशने आपली दिशा बदलली आणि थ्रो करण्यात आलेला चेंडू थेट त्याच्या पॅडला लागला.

‘OBS’ चा विळखा! आयपीएलमध्ये Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली चर्चेचा विषय; पहा Video

लखनऊच्या खेळाडूंनी तात्काळ अपील केले. मैदानातील पंचांनी हा निर्णय थर्ड अंपायरकडे सोपवला. विविध प्रकारचे रिप्ले पाहिल्यानंतर, थर्ड अंपायरने असा निष्कर्ष काढला की, अंगक्रिशने जाणीवपूर्वक आपली ‘रनिंग लाईन’ बदलली. बॉल स्टंपला लागू नये म्हणून अंगक्रिशने जाणीवपूर्वक आपली ‘रनिंग लाईन’ बदलली. नियमानुसार हे ‘फिल्डिंगमध्ये अडथळा’ आणणे असे समजले जाते, त्यामुळे त्याला आउट करण्यात आले.

Web Title: Mcc gave explanation to angriksh raghuvanshi obs wicket ipl 2026 viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2026 | 08:13 PM

Topics:  

  • IPL 2026
  • KKR
  • viral video

संबंधित बातम्या

बालसुरक्षेला तिलांजली? उल्हासनगरमध्ये धक्कादायक प्रकार! नालेसफाईसाठी अल्पवयीन मुलांचा जीव धोक्यात
1

बालसुरक्षेला तिलांजली? उल्हासनगरमध्ये धक्कादायक प्रकार! नालेसफाईसाठी अल्पवयीन मुलांचा जीव धोक्यात

हातात सिगारेट, बाजूला दारुच्या बाटल्या…! नशेत तर्रर्र तरुणीचा रस्त्याच्या मधोमध धिंगाणा; VIDEO VIRAL
2

हातात सिगारेट, बाजूला दारुच्या बाटल्या…! नशेत तर्रर्र तरुणीचा रस्त्याच्या मधोमध धिंगाणा; VIDEO VIRAL

फक्त उड्या मारुन पोट भरत नाही! थेट सायकलचं पंक्चर काढायला बसलं माकड; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले…
3

फक्त उड्या मारुन पोट भरत नाही! थेट सायकलचं पंक्चर काढायला बसलं माकड; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले…

दिव्यांग असणं गुन्हा? महिलेला व्हिलचेअरवर पाहून Uber ड्रायव्हरचा राइड देण्यास नकार; VIDEO व्हायरल होताच नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त
4

दिव्यांग असणं गुन्हा? महिलेला व्हिलचेअरवर पाहून Uber ड्रायव्हरचा राइड देण्यास नकार; VIDEO व्हायरल होताच नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.