KKR vs MI: कोलकाता नाईट रायडर्सने रोमहर्षक सामन्यात मुंबई इंडियन्सचा ५ विकेट्सने पराभव पराभव केला. केकेआरच्या विजयानंतर सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल होत आहेत. हा सामना बहुतांशी मुंबईच्या बाजूने गेला, मात्र पॅट कमिन्सने कर्णधार रोहित शर्माची सर्व समीकरणे बिघडवली. त्याने १५ चेंडूत नाबाद ५६ धावा केल्या. केकेआरच्या या विजयानंतर सोशल मीडियावर अनेक मनोरंजक मीम्स व्हायरल होत आहेत.
एका चाहत्याने ट्विटरवर लिहिले की, पॅट कमिन्स हा मुंबईसाठी ‘आऊट ऑफ सिलॅबस’ आहे. केकेआरचा सर्वोत्तम खेळाडू कमिन्सने आयपीएलमधील सर्वात जलद अर्धशतक झळकावले. त्याने अवघ्या १४ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते. कमिन्सपूर्वी केएल राहुलनेही १४ चेंडूत अर्धशतक झळकावले आहे. कमिन्सबद्दल बोलायचे तर मुंबईविरुद्धच्या या सामन्यात त्याने १५ चेंडूंचा सामना केला आणि ६ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने नाबाद ५६ धावा केल्या. केकेआरच्या विजयात कमिन्सची ही खेळी सर्वात महत्त्वाची ठरली.
कोलकात्याच्या विजयानंतर सोशल मीडियावर अनेक प्रकारचे मीम्स व्हायरल होत आहेत. एका चाहत्याने कमिन्सला मुंबईचा अभ्यासक्रम सांगितला. त्याचवेळी एका यूजरने राहुल गांधींची जीआयएफ फाईल शेअर करत मजेशीर कमेंट केली आहे.
After watch Baby AB’s inning AB’s fans be like:#KKRvMI #IPL #ABDevilliers #dewaldbrevis #ViratKohli pic.twitter.com/5Bw31cnt4p — N K (@Nkkahanhain) April 7, 2022
Pat Cummins meme thread!?
Send us your best @patcummins30 memes in the replies!#KKRHaiTaiyaar #KKRvMI #IPL2022 pic.twitter.com/92hFZ429pM — KolkataKnightRiders (@KKRiders) April 6, 2022
After loosing their third consecutive match
CSK to mi : #KKRvMI pic.twitter.com/TLYEEwf4v4 — ✯sk_twts✯ (@sk_twts) April 7, 2022