Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MI Vs DC: दिल्ली कॅपिटल्सचे घामटे निघाले, मुंबई इंडियन्सच्या बॉलर्सचा कहर; Playoff मध्ये दिमाखात एंट्री

आयपीएल २०२५ चा ६३ वा सामना बुधवारी (२१ मे) मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झाला. मुंबई इंडियन्सने दिमाखात हा सामना जिंकत आपल्या खिशात घातला असून चौथे स्थान पटकावले आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: May 21, 2025 | 11:15 PM
Mumbai Indians चा दिमाखात प्लेओफमध्ये प्रवेश (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Mumbai Indians चा दिमाखात प्लेओफमध्ये प्रवेश (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

पावसाचे सावट असतानाही मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आयपीएल २०२५ चा ६३ वा सामना बुधवारी (२१ मे) मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झाला आणि दोन्ही संघाचे पारडे जड होते. मात्र अगदी सहजपणे आपले वर्चस्व राखत मुंबई इंडियन्सने ही मॅच आपल्या खिशात घातली आहे आणि इतकेच नाही तर Playoff मध्ये चौथे स्थान पटकवत आपली पुढली वाट मोकळी केली आहे. 

वानखेडे स्टेडियमवरील हा सामना दिल्लीसाठी खूप महत्त्वाचा होता. त्यांचा कार्यवाहक कर्णधार फाफ डु प्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नियमित कर्णधार अक्षर पटेल दुखापतीमुळे या सामन्यात खेळू शकला नाही. मुंबई इंडियन्सने २० षटकांत ५ बाद १८० धावा केल्या आणि १८१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र दिल्लीच्या समीर रिझवी व्यतिरिक्त संघातील इतरांनी चांगली कामगिरी दाखवली नाही. 

MI Vs DC: 90% पडणार पाऊस, मुंबईत ‘यलो अलर्ट’, रद्द होणार आजचा सामना? दिल्लीच्या मालकांचा BCCI कडे धावा

सूर्या तळपला

मुंबईकडून सूर्यकुमार यादव आणि नमन धीर यांनी शेवटच्या दोन षटकांत जोरदार धावा केल्या. सूर्यकुमारने ४३ चेंडूत ७३ धावा केल्या आणि नमन धीरने ८ चेंडूत २४ धावा केल्या आणि नाबाद राहिला. सूर्यकुमारने ७ चौकार आणि ४ षटकार मारले. नमनच्या बॅटमधून २ चौकार आणि २ षटकार आले. दोघांनीही २१ चेंडूत ५७ धावांची भागीदारी केली. तिलक वर्माच्या बॅटमधून २७ धावा आल्या. त्याच्याशिवाय मुंबईकडून रायन रिकेल्टनने २५ आणि विल जॅक्सने २१ धावा केल्या. रोहित शर्मा ५ धावा काढून बाद झाला आणि हार्दिक पंड्या ३ धावा काढून बाद झाला. दिल्लीकडून मुकेश कुमारने २ विकेट घेतल्या. दुष्मंथ चामीरा, मुस्तफिजुर रहमान आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी १ यश मिळाले.

दिल्लीची अवस्था वाईट

दिल्ली कॅपिटल्सची अवस्था वाईट होती. काही षटकातच आपले पाच विकेट त्यांनी गमावले. संघाचा स्कोअर १० षटकांत ५ बाद ६५ धावा असा झाला होता. १० व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर जसप्रीत बुमराहने ट्रिस्टन स्टब्सला एलबीडब्ल्यू बाद केले. स्टब्सने ४ चेंडूत २ धावा केल्या. समीर रिझवी आणि आशुतोष शर्मा यांनी दिल्लीला वाचविण्याचा बऱ्यापैकी प्रयत्न केला मात्र संघाला जिंकण्यासाठी लागणाऱ्या १८१ धावांचा टप्पा कोणीही गाठू शकले नाही. १६.३ ओव्हरमध्ये ११२ वर ८ विकेट इतकी बिकट अवस्था झाली होती. 

CSK Vs RR: यशस्वी जयस्वालचा IPL मध्ये बोलबाला! बनवला महारेकॉर्ड; ठरला जगातील पहिला फलंदाज

अखेर विजय मिळवला

मुंबई इंडियन्सने ही मॅच आपल्या खिशात घातली आणि दिमाखात प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला आहे. करण शर्माने कुलदीप यादवची ९ वी विकेट काढली आणि मुंबईचा रस्ता अगदीच मोकळा झाला. तर बुमराहने विकेट घेत १२१ मध्ये संपूर्ण संघ गारद करत शेवटची विकेट मिळवली. ५९ रन्सने मुंबई इंडियन्सने विजय मिळवला आहे.

Web Title: Mi vs dc mumbai indians won against delhi capitals and enter in playoff taken 4th position

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2025 | 11:15 PM

Topics:  

  • IPL 2025
  • MI vs DC
  • Suryakumar Yadav

संबंधित बातम्या

RCB ला नवा मालक मिळाला? अदर पूनावालाचे नाव समोर; एक्सवरील ‘त्या’ पोस्टने उडाला गोंधळ 
1

RCB ला नवा मालक मिळाला? अदर पूनावालाचे नाव समोर; एक्सवरील ‘त्या’ पोस्टने उडाला गोंधळ 

IND VS PAK : ‘आधी नक्वीसोबत हस्तांदोलन, पण ट्रॉफीस नकार? कर्णधार सूर्या अडचणीत? वाचा सविस्तर…
2

IND VS PAK : ‘आधी नक्वीसोबत हस्तांदोलन, पण ट्रॉफीस नकार? कर्णधार सूर्या अडचणीत? वाचा सविस्तर…

पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर भारताच्या खेळाडूंचे मायदेशात जंगी स्वागत! चाहत्यांनी तिलक आणि सूर्याच्या नावाच्या दिल्या घोषणा
3

पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर भारताच्या खेळाडूंचे मायदेशात जंगी स्वागत! चाहत्यांनी तिलक आणि सूर्याच्या नावाच्या दिल्या घोषणा

सूर्यकुमार यादवने सांगितला आशिया कप फायनलमधील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट, म्हणाला – पाकिस्तानचा स्कोअर आणि…
4

सूर्यकुमार यादवने सांगितला आशिया कप फायनलमधील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट, म्हणाला – पाकिस्तानचा स्कोअर आणि…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.