
The last chance for changes in the Indian team! Who will be in the final playing XI for the T20 World Cup 2026 tournament?
T20 World Cup 2026 : टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. त्यासाठी कसून तयारी देखील होताना दिसत आहे. या मोठ्या स्पर्धेसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा देखील केलेली आहे. जेतेपद आपल्याकडे कायम राखण्यासाठी कर्णधार सूर्यकुमार यादव प्रयत्नशील असणार आहे. या स्पर्धेआधी भारतीय संघ पाच सामन्याची टी20 मालिका न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे. या मालिकेतून भारतीय संघाला आपली संघ बांधणी मजबूत करण्यासाठी मदत होणार आहे. सोबत संघात बदल करण्याची संधी देखील मिळणार आहे.
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेआधी मुख्य निवडकर्ते अजित आगरकर आणि भारतीय संघाचे व्यवस्थापकांकडे चूक दुरूस्त करण्यासाठी वेळ असणार आहे. त्यामुळे भारतीय संघात बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वास्तविक पाहता, एक महिन्याआधीच टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भाग घेणाऱ्या संघ जाहीर करावा लागतो. परंतु, या संघात आयसीसी टी20 स्पर्धेसाठी 31 जानेवारीपर्यंत अंतिम संघ निवडता येतो. सर्व संघ 31 जानेवारीपर्यंत आपापल्या संघात बदल करू शकतात. त्यामुळे भारतीय संघात देखील बदल संभवतो.
हेही वाचा : उस्मान ख्वाजा का घेतोय निवृती? माजी खेळाडूवर साधला निशाणा… ऑस्ट्रेलियन प्लेयरच्या विधानाने खळबळ
यावेळी मात्र संघ व्यवस्थापनाला कर्णधार सूर्यकुमार यादवच्या फॉर्मबाबत चिंता वाटत आहे. आगामी न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यामध्ये सूर्याचा फॉर्म खराब राहिला तरी त्याला संघातून बाहेर काढणे शक्य असणार नाही. सूर्या सोडला तर इतर खेळाडू मात्र चांगल्या लयीत दिसत आहेत. कारण दक्षिण अफ्रिकेविरूद्धच्या टी20 मालिकेनंतरच संघाची चांगली निवड करण्यात आली आहे. त्यामुळेच शुबमन गिलला टी20 संघातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत जर एक दोन खेळाडू अपयशी ठरले तरी त्यांचे स्थान अबाधित राहील, केवळ दुखापत वगैरे झाली तर संघात बदल करण्यात येऊ शकतो.
आयसीसीच्या नियमांबाबत बोलायच झालं, तर स्पर्धेतील सहभागी संघांना स्पर्धा सुरू होण्याच्या सुमारे एक महिना आधी त्यांचा प्रारंभिक संघ जाहीर करावा लागतो. 31 जानेवारीपर्यंत संघात बदल करता येणार आहे. निवडकर्त्यांना फॉर्म, फिटनेसची चिंता असल्यास बदल करण्याबाबतची लवचिकता मिळणार आहे. 31 जानेवारीच्या कटऑफपूर्वी आयसीसीच्या मंजुरीशिवाय सर्व संघ त्यांच्या संघात बदल करू शकतात.
सूर्यकुमार यादव (कर्णधार),रिंकु सिंह,अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, अक्षर पटेल, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, इशान किशन, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, हार्षित राणा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरूण चक्रवर्ती