आजच्या सामन्याची स्थिती काय (फोटो सौजन्य - Instagram)
आयपीएल २०२५ मध्ये आज (२१ मे) मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील हंगामातील ६३ व्या सामन्यावर पावसाचे जोरदार सावट असल्याचे दिसून येत आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे आणि हवामान खात्याने पुढील चार दिवसांसाठी मुंबईसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.
प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी दोन्ही संघांसाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. अशा परिस्थितीत, जर सामना रद्द झाला किंवा पावसामुळे व्यत्यय आला तर त्याचा प्लेऑफ समीकरणांवर मोठा परिणाम होईल. या सामन्यात पावसाचा धोका लक्षात घेता, दिल्ली कॅपिटल्सचे मालक पार्थ जिंदाल यांनी बीसीसीआयकडे अपील केले आहे (फोटो सौजन्य – Instagram)
Playoff ची लढाई
कोण मारणार बाजी?
एकच जागा आणि दोन स्पर्धक अशी सध्या स्थिती आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज संघ आयपीएल २०२५ च्या प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स आता चौथ्या रिकाम्या जागेसाठी शर्यतीत आहेत. तथापि, समीकरण इतके सोपे नाही.
आजचा एमआय आणि डीसी यांच्यातील सामना एक प्रकारचा वर्च्युअल नॉकआउट असू शकतो. पण या सामन्याचे गणित वेगळे चित्र दर्शवते. जर आज मुंबई इंडियन्सची टीम जिंकली तर टॉप-४ मधील त्यांचे स्थान निश्चित होईल आणि दिल्ली कॅपिटल्सचा संघ बाहेर पडेल. पण जर दिल्लीची टीम जिंकली, तर चौथे स्थान अजूनही रिक्त राहील आणि त्यानंतर उर्वरित सामन्यांचे निकाल दोन्ही संघांचे भवितव्य ठरवतील. दिल्ली आणि मुंबई यांच्यातील सामना पावसाच्या सावलीत असल्याने ही शर्यत अधिकच रंजक होताना दिसून येत आहे.
CSK Vs RR: यशस्वी जयस्वालचा IPL मध्ये बोलबाला! बनवला महारेकॉर्ड; ठरला जगातील पहिला फलंदाज
मुंबईत यलो अलर्ट
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, सामन्यादरम्यान पावसाची शक्यता जास्त आहे. काही अहवालांनुसार, संध्याकाळी ७ वाजता टॉसच्या वेळी पावसाची ५०% शक्यता आहे, जी रात्री १० पर्यंत ८०-९०% पर्यंत वाढू शकते. अॅक्यूवेदर सारख्या हवामान वेबसाइटनेही पावसाची शक्यता ९०% असल्याचे भाकित केले आहे, किमान दोन तास पाऊस पडण्याची शक्यता आहे. जर हवामान असेच राहिले तर सामन्यावर परिणाम होणे निश्चित आहे, ज्यामुळे प्लेऑफची शर्यत आणखी रोमांचक होईल.
पार्थ जिंदालचे अपील
पावसाची शक्यता लक्षात घेता, दिल्ली कॅपिटल्सचे सह-मालक पार्थ जिंदाल यांनी BCCI ला सामना दुसऱ्या शहरात हलवण्याची विनंती केली आहे जेणेकरून सामना कोणत्याही व्यत्ययाशिवाय खेळवता येईल. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, जिंदालने बीसीसीआयला लिहिलेल्या पत्रात लिहिले आहे की, ‘मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज आहे आणि सामना वाया जाण्याची दाट शक्यता आहे.’ त्यांनी पुढे लिहिले. ‘ज्याप्रमाणे आरसीबी आणि एसआरएच यांच्यातील सामना बेंगळुरूबाहेर हलवण्यात आला आहे, त्याचप्रमाणे मी विनंती करतो की हा सामनाही दुसऱ्या ठिकाणी हलवावा, कारण गेल्या ६ दिवसांपासून २१ तारखेला मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज आहे.’ याची आपल्याला कल्पना आहे.
सामना रद्द झाला तर काय होईल?
मॅच रद्द झाल्यास काय होऊ शकते
जर पावसामुळे सामना रद्द झाला तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल. सध्या, मुंबई इंडियन्स १४ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे, तर दिल्ली कॅपिटल्स १३ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. जर सामना रद्द झाला तर मुंबईचे १५ गुण होतील आणि दिल्लीचे १४ गुण होतील. अशा परिस्थितीत, दोन्ही संघांना प्लेऑफसाठी त्यांच्या शेवटच्या उर्वरित सामन्यावर (जो पंजाब किंग्ज विरुद्ध आहे) अवलंबून राहावे लागेल.
कोणाचे जास्त नुकसान?
जर सामना रद्द झाला तर दिल्ली कॅपिटल्सला सर्वात जास्त नुकसान सहन करावे लागण्याची शक्यता आहे. मुंबईला त्यांचा शेवटचा सामना जिंकून थेट प्लेऑफमध्ये पोहोचण्याची आणखी एक संधी असेल, तर दिल्लीला त्यांचा शेवटचा सामना जिंकूनही इतर संघांच्या निकालांवर अवलंबून राहावे लागू शकते.
बीसीसीआयने अलीकडेच एक नियम बनवला आहे, ज्यानुसार उर्वरित लीग सामन्यांमध्ये १२० मिनिटांचा अतिरिक्त वेळ दिला जाईल, जेणेकरून पावसाच्या व्यत्ययानंतरही सामना पूर्ण ४० षटकांसाठी खेळवता येईल. मुंबईतील हवामानाचा या महत्त्वाच्या सामन्यावर किती परिणाम होतो हे पाहणे मनोरंजक ठरेल.