
MI vs DC, WPL live score: A storm of Sciver-Brunt and Kaur in Navi Mumbai! Mumbai Indians set a target of 195 runs against DC.
MI vs DC, WPL live score: महिला प्रीमियर लीग २०२६ च्या या हंगामातील तिसऱ्या सामन्यात आज शनिवारी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमनेसामने आले आहेत. नवी मुंबईतील डॉ. डीवाय पाटील स्टेडियमवर खेळवण्यात येत असलेल्या या सामन्यात नाणेफेक गमावणाऱ्या मुंबई इंडियन्सने नॅट सायव्हर-ब्रंट आणि हरमनप्रीत कौरच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर ४ बाद १९५ धावा उभ्या केल्या आहेत. दिल्लीला विजयी सुरुवात करायची असेल तर १९६ धावांचा टप्पा गाठावा लागणार आहे. दिल्ली कॅपिटल्सकडून नंदनी शर्माने २ विकेट्स घेतल्या.
नवी मुंबईतील डॉ. डीवाय पाटील स्टेडियमवर खेळवण्यात येणाऱ्या या सामन्यात दिल्लीची कर्णधार जेमिमाह रॉड्रिग्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करत मुंबईला प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले. मागील सामना गमावणाऱ्या मुंबई संघाची सुरुवात या सामन्यात देखील खराबच राहिली. मुंबईची सलामी जोडी अमेलिया केर आणि जी कमलिनी केवळ १ धावच जोडू शकले. अमेलिया केर भोपळा न फोडताच पव्हेलियनमध्ये परतली. तिला चिनेल हेन्रीने बाद केले. त्यानंतर १६ धावा करून जी कमलिनीही माघारी परतली. वन डाउनला आलेली नॅट सायव्हर-ब्रंटने मागील सामन्याची कमी भरून काढत शानदार फलंदाजी केली. तिने कर्णधार हरमनप्रीत कौरसोबत ६६ धावांची भागीदारी केली. सायव्हर-ब्रंटने आपले अर्धशतक पूर्ण केले आणि त्यानंतर २० धावा जोडून ती बाद झाली. तिने ४६ चेंडूत ७० धावा केल्या. यामध्ये तिने १३ चौकार लगावले.
सायव्हर-ब्रंटनंतर सारी सूत्रे कौरने आपल्या हातात गहटले आणि अर्धशतक ठोकले. तिने निकोला केरीसोबत संघाचा डाव पुढे नेला. निकोला केरी १२ चेंडूत २१ धावा करून ती बाद झाली. कर्णधार हरमनप्रीत कौर ४२ चेंडूत नाबाद ७४ धावा केल्या. तिने या खेळीत ८ चौकार आणि ३ षटकार ठोकले. तर सजीवन सजना ५ धावांवर नाबाद राहिली. दिल्लीकडून नंदनी शर्माने सर्वाधिक २ तर श्री चरणी आणि चिनेल हेन्री यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. दिल्लीला विजय मिळवायचा असेल तर १९६ धावा कराव्या लागणार आहेत.
हेही वाचा : ICC Women World Cup 2025 : सुनील गावस्कर यांनी केली वचनपूर्ती! जेमिमा रॉड्रिग्जला दिली ‘खास’ भेट; पहा VIDEO
दिल्ली कॅपिटल्स महिला (प्लेइंग इलेव्हन): शफाली वर्मा, लिझेल ली (डब्ल्यू), लॉरा वोल्वार्ड, जेमिमाह रॉड्रिग्स (क), मारिझान कॅप, निकी प्रसाद, चिनेल हेन्री, स्नेह राणा, मिन्नू मणी, श्री चरणी, नंदनी शर्मा
मुंबई इंडियन्स महिला (प्लेइंग इलेव्हन): अमेलिया केर, जी कमलिनी (डब्ल्यू), नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (क), निकोला केरी, सजीवन सजना, अमनजोत कौर, पूनम खेमनार, त्रिवेणी वसिष्ठ, शबनीम इस्माईल, संस्कृती गुप्ता