सुनील गावस्कर यांनी जेमिमा रॉड्रिग्जला गिटार भेट दिले आहे. (फोटो-सोशल मीडिया)
Sunil Gavaskar fulfilled his promise to Jemimah Rodrigues : भारताचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांनी स्टार महिला फलंदाज जेमिमा रॉड्रिग्जला वचन दिले होते ते आता त्यांनी पूर्ण केले आहे. २५ वर्षीय रॉड्रिग्ज या खेळाडूच्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक करण्यासाठी त्यांनी एक गाणे गायले आणि तिला शानदार अशी भेट देखील दिली आहे. माजी दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांनी भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू जेमिमा रॉड्रिग्जला गिटार भेट दिली आहे.
सुनील गावस्कर यांच्याकडून रॉड्रिग्जला वचन देण्यात आले होते की, जर भारतीय महिला संघाने प्रतिष्ठित आयसीसी विश्वचषक जेतेपद जिंकले तर ते तिच्यासोबत एक गाणे गातील. आता त्यांनी या वाचनाची पूर्ती एक खास भेट देऊन केली आहे. सुनील गावस्कर यांनी रॉड्रिग्जला बॅटच्या आकाराचा गिटार देखील भेट दिला आहे.
सुनील गावस्कर यांनी शुक्रवारी जेमिमा रॉड्रिग्जला बॅटच्या आकाराचा गिटार भेट दिला. जेव्हा जेमिमाकडून भेटवस्तू उघडण्यात आली. तेव्हा तिने खूप आनंद व्यक्त केला. तिने बॅटच्या आकाराच्या गिटारच्या कारागिरीचे कौतुक देखील केले. यावेळी गावस्कर आणि जेमीमा या दोघांनी एकत्र “ये दोस्ती” हे गाणे देखील गायले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
जेमिमाने आपल्या इंस्टाग्राम खात्यावर लिहिले की, “सुनील सरांनी त्यांचे वचन पाळले आणि आम्ही आतापर्यंतच्या सर्वात छान बॅटने धमाल केली. ते एक खास होते.” सुनील गावस्कर आणि जेमिमा हे दोघे देखील संगीत प्रेमी आहेत. जेमिमा अनेकदा गाताना दिसत असते.
गावस्कर यांनी जेमिमाला बॅटच्या आकाराचा गिटार भेट दिल्याने त्याची चर्चा होताना दिसत आहे. ही कहाणी आयसीसी महिला विश्वचषक २०२५ शी संबंधित आहे. जेमिमा रॉड्रिग्जने सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक ऐतिहासिक शतक झळकावून भारताला विक्रमी विजय मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली होती. या विजयानंतर, गावस्करने तिला सांगितले की जर भारतीय संघाने विश्वचषकाचे विजेतेपद जिंकले तर ते तिच्यासोबत एक गाणे गातील. सुनील गावस्कर यांनी त्यांचे वचन आता पूर्ण केले आहे.
हेही वाचा : कुंडलीतच क्रिकेट कारकिर्द लिहिलेली! भारतीय खेळाडू वैष्णवीच्या वडिलांनी केली होती भविष्यवाणी; वाचा सविस्तर
गावस्कर यांच्या वचनावर जेमिमा हसली आणि म्हणाली की ती सुनील सरांची वाट पाहत आहे. त्यांच्या प्रतिष्ठेनुसार, त्यांनी तिला निराश केले नाही. तरुण क्रिकेटपटूने गावस्कर यांना विचारले की बॅटच्या आकाराचा गिटार खेळण्यासाठी आहे की फलंदाजीसाठी? गावस्कर यांनी उत्तर दिले की तू दोन्ही गोष्टी करू शकते.






