MI vs GT: Mumbai Indians' innings will be a disaster, Gujarat has a golden opportunity in the eliminator match, read in detail...
MI vs GT : आज आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामात महामुकाबला बघायला मिळणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जविरुद्ध पहिला क्वालिफायर सामना जिंकून अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. ९ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आरसीबीने अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. त्यानंतर आज ३० मे रोजी शुक्रवारी मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात ‘करो या मरो’ चा सामना असणार आहे. तथापि, या सामन्यापूर्वी मुंबईच्या गोटात छावणीत तणावाचे वातावरण असणार आहे.
पाच वेळा चॅम्पियन राहिलेल्या मुंबई इंडियन्सचा सामना आज ३० मे रोजी आयपीएल २०२५ च्या एलिमिनेटर सामन्यात गुजरात टायटन्ससोबत होणार आहे. हा रोमांचक सामना चंदीगडच्या मुल्लानपूर येथे खेळवण्यात येणार आहे. मुंबई संघाची सुरुवात खूपच वाईट झाली होती, हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने यावेळी स्पर्धेत जबरदस्त पुनरागमन केले आहे.
हेही वाचा : IND Vs END : भारतीय ‘अ’ संघाची आता खरी कसोटी, इंग्लंड लायन्स विरुद्ध करणार दोन हात..
मुंबईचा प्रवास यावर्षी एलिमिनेटरपर्यंतच असण्याची शक्यता आहे. एमआयचे सहाव्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न अपूर्ण राहण्याची शक्यता आहे.कारण, त्यांचा सामना आज गुजरात टायटन्सशी होणार आहे आणि आकडेवारीनुसार ही वास्तव समोर येत आहे.
आयपीएलच्या इतिहासात मुंबई आणि गुजरात ही संघ आतापर्यंत ७ सामने खेळले आहेत. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या सातपैकी मुंबईला २ वेळा विजय मिळवण्यात यश आले आहे. म्हणजेच गुजरात टायटन्सने ५ सामन्यांमध्ये विजय मिळवले आहे. या वर्षीही खेळलेल्या दोन सामन्यांमध्ये शुभमन गिल मुंबईवर भारी पडला आहे.
आकडेवारी पाहिली तरी एलिमिनेटर सामन्यात मुंबईसाठी एमआयचा मार्ग सोपा असणार नाही. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबईला गुजरातवर विजय मिळवायचा असेल तर त्यांना काहीतरी खास करावे लागणार आहे. आयपीएल २०२५ मध्ये पहिल्या सामन्यात गुजरातने मुंबईला ३६ धावांनी पराभूत केले होते. तर दुसऱ्या सामन्यात गुजरातने ३ गडी राखून विजय प्राप्त केला होता.
आयपीएल २०२५ मध्ये गुजरात टायटन्सच्या फलंदाजांची कामगिरी शानदार राहिली आहे. साई सुदर्शन आणि शुभमन गिल या जोडीने फलंदाजीत कमाल दाखवत चांगली कामगिरी केली आहे. सुदर्शन या हंगामात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज असून त्याने आतापर्यंत १४ सामन्यांमध्ये ५२ च्या सरासरीने आणि १५५ च्या स्ट्राईक रेटने ६७९ धावा काढल्या आहेत. त्याच वेळी, गिलने ५४ च्या सरासरीने आणि १५६ च्या स्ट्राईक रेटने ६४९ धावा केल्या आहेत.