
MI vs GT, WPL Live Score: Gujarat Giants set a target of 193 runs for Mumbai Indians! A fighting innings from Georgia Wareham.
Mumbai Indians vs Gujarat Giants : आज महिला प्रीमियर लीग २०२६ मध्ये नवी मुंबईतील डॉ. डीवाय पाटील स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स यांच्यात सामना सुरू आहे. या सामन्यात नाणेफेक गमावणाऱ्या गुजरात जायंट्सने प्रथम फलंदाजी करत जॉर्जिया वेअरहॅमच्या संघर्षपूर्ण खेळीच्या जोरावर ५ गडी गमावून १९२ धावा केल्या आहेत. मुंबई इंडियन्सला विजयासाठी १९३ धावा कराव्या लागणार आहेत. मुंबई इंडियन्सकडून शबनिम इस्माईलने एक विकेट घेऊन फायदेशीर गोलंदाजी केली आहे.
नवी मुंबईतील डॉ. डीवाय पाटील स्टेडियमवर सुरू असलेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर गुजरात जायंट्स प्रथम फलंदाजीसाठी पाचारण करण्यात आले. गुजरात जायंट्सच्या डावाची सुरुवात बेथ मूनी आणि सोफी डिव्हाईन या सलामीवीरांनी केली. गुजरातची सुरुवात चांगली राहिली नाही. गुजरातला २२ धावांवर तिसऱ्याच षटकात २२ सोफी डिव्हाईनच्या रूपात पहिला धक्का बसला. सोफी डिव्हाईन ८ धावा करून बाद झाली तिला. शबनिम इस्माईलने बाद केले. डिव्हाईननंतर बेथ मूनी आणि कनिका आहुजा यांनी ४२ धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला.
बेथ मूनी २६ चेंडूत ३३ धावा करून माघारी परतली आहे. तिला अमेलिया केर बाद केले. नंतर आलेली कर्णधार ॲशले गार्डनर २० धावा करून बाद झाली. तर कनिका आहुजा १८ चेंडूत ३५ धावा करून माघारी गेली. या खेळीत तिने ४ चौकार आणि २ षटकार लगावले. तिला हेले मॅथ्यूजने बाद केले. त्यानंतर जॉर्जिया वेअरहॅमने सामन्याची सूत्रे हाती घेतले आणि भारती फुलमाळीसोबत ५९ धावांची भागीदारी रचत संघाला १९२ पर्यंत पोहचले. जॉर्जिया वेअरहॅमने ३३ चेंडूत नाबाद ४३ धावा केल्या. यामध्ये ४ चौकार मारले आणि १ षटकार लगावला. तर भारती फुलमाळीने १५ चेंडूत नाबाद ३६ धावा केल्या. यामध्ये तिने ३ चौकार आणि ३ षटकार मारले. तर आयूषी शिवानी ११ धावांवर रिटायर्ड हर्ट होऊन माघारी गेली. मुंबई इंडियन्सकडून हेले मॅथ्यूज, शबनिम इस्माईल, अमेलिया केर आणि निकोला केरी यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन : हेले मॅथ्यूज, जी कमलिनी(यष्टीरक्षक), अमेलिया केर, हरमनप्रीत कौर(कर्णधार), निकोला केरी, सजीवन सजना, अमनजोत कौर, संस्कृती गुप्ता, पूनम खेमनार, शबनिम इस्माईल, त्रिवेणी वसिष्ठ
गुजरात जायंट्स प्लेइंग इलेव्हन : बेथ मूनी(यष्टीरक्षक), सोफी डिव्हाईन, ॲशले गार्डनर(कर्णधार), जॉर्जिया वेअरहॅम, भारती फुलमाळी, आयुषी सोनी, कनिका आहुजा, काश्वी गौतम, तनुजा कंवर, राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंग ठाकूर