
प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या राजस्थान रॉयल्सची सुरुवात खराब झाली. यशस्वी जैस्वालने वैभव सूर्यवंशीसोबत पहिल्या विकेटसाठी ३३ धावांची भागीदारी केली. यशस्वीने एक चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने १७ चेंडूंमध्ये २७ धावा केल्या. चौथ्या ओव्हरमध्ये विल जॅक्सने त्याला तंबूत परत पाठवले. सूर्यवंशीने सहा चेंडूंमध्ये केवळ चार धावा केल्या. पाचव्या ओव्हरमध्ये दीपक चहरने त्याला एलबीडब्लू बाद केले. कर्णधार रियान परागलाही मोठी खेळी करता आली नाही. त्याने ८ चेंडूंमध्ये दोन चौकार आणि एका षटकारासह १४ धावा केल्या. अल्लाह गझनफरने परागला बाद केले. दासुन शनाकाने १५ चेंडूंमध्ये २९ धावा केल्या परंतु ११व्या ओव्हरमध्ये तो रनआऊट झाला.
दासुन आणि ध्रुव जुरेलने चौथ्या विकेटसाठी ४५ धावांची भागीदारी केली. जुरेलने २६ चेंडूंमध्ये तीन चौकार आणि दोन षटकारांसह ३८ धावा केल्या. १३व्या ओव्हरमध्ये कॉर्बिन बॉशने जुरेलला बोल्ड करत पव्हेलियनचा रस्ता दाखवला. डोनोव्हान फरेराने १५ चेंडूंमध्ये १८ धावा केल्या. १६व्या ओव्हरमध्ये चहरने त्याला बाद केले. शार्दुल ठाकूरने १८ व्या षटकात शुभम दुबेआणि जोफ्रा आर्चर यांना बाद केले. दुबेने ६ चेंडूंत ५ धावा केल्या तर, आर्चरचने १५ चेंडूंत ३२ धावा केल्या. रवींद्र जडेजा ११ चेंडूंत १९ धावांवर नाबाद राहिला आणि नांद्रे बर्गर ३ चेंडूंत १० धावांवर नाबाद राहिला.
नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी निर्णय घेतलेल्या मुंबई इंडियन्सने राजस्थानच्या सलामीवीर फंलदाजांना स्वस्तात बाद केले. दिपक चाहरने वैभव सूर्यवंशीला ६ धावांवर पव्हेलियनचा रस्ता दाखवला. तर विल जॅक्सने २७ धावांवर जैस्वालला बाद केले. यामुळे राजस्थान पावरप्लेमध्ये मोठा स्कोअर करु शकला नाही. मुंबईकडून दीपक चाहर आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी दोन आणि महत्वाचे विकेट्स विकेट घेतले. यामुळे राजस्थानची धावगती रोखली गेली. तर विल जॅक्स, ए.एम. गझनफर आणि कॉर्बिन बॉश यांनी प्रत्येकी एक विकेट घेतले.
मुंबई इंडियन्स: रायन रिकेल्टन (विकेटकीपर), नमन धीर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (क), विल जॅक्स, कॉर्बिन बॉश, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, एएम गझनफर, रघु शर्मा.
इम्पॅक्ट सबस्टिट्यूट: रोहित शर्मा, मयंक रावत, रॉबिन मिंज, क्रिश भगत, ट्रेंट बोल्ट.
राजस्थान रॉयल्स: यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रियान पराग (क), डोनोवन फरेरा, शुभम दुबे, दासून शनाका, जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर, यशराज पुंजा, ब्रिजेश शर्मा.
इम्पॅक्ट सबस्टिट्यूट: रवींद्र जडेजा, सुशांत मिश्रा, अमन राव पेराला, रवी बिश्नोई, तुषार देशपांडे.