आयपीएल २०२६ मध्ये आज शेवटचे २ लीग स्टेज सामने खेळले जाणार आहेत. हा हंगामातील हा शेवटचा डबलहेडर आहे. पहिल्या सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला जात आहे. हा सामना मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर काही वेळातच ३.३० वाजता खेळला जाईल. त्याआधी, ३ वाजता दोन्ही संघाचे कर्णधार, हार्दिक पांड्या आणि रियान पराग नाणेफेकीसाठी मैदानात उतरले आहेत. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, राजस्थानला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले आहे. मुंबई इंडियन्सने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल केला, तर राजस्थान रॉयल्सने तीन बदल केले.
या सामन्यात राजस्थानचा नियमित कर्णधार रियान पराग पुन्हा मैदानात उतरला आहे. तो दुखापतीमुळे लखनौविरुद्धच्या सामन्यात संघाबाहेर होता. मुंबई या स्पर्धेतून आधीच अधिकृतपणे बाहेर पडली आहे. परंतु, राजस्थानसाठी हा सामना ‘करो या मरो’ असा असणार आहे. राजस्थानने हा सामना जिंकल्यास ते थेट प्लेऑफसाठी क्वालिफाय करतील. रॉयल्स संघ सध्या १४ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्सविरुद्ध विजय मिळवल्यास त्यांचे १६ गुण होतील.
IPL 2026: ‘शाब्बास अर्जुन!’ मुलाच्या शानदार पदार्पणानंतर सचिन तेंडुलकर भावुक; पोस्ट करत म्हणाला…
हार्दिकने सांगितले की, या सामन्यासाठी जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली असून दीपक चहरला संधी देण्यात आली आहे. रवींद्र जडेजाचे राजस्थान संघात पुनरागमन झाले आहे. या महत्त्वाच्या सामन्यासाठी राजस्थानने प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन बदल केले आहेत. जडेजासोबतच नांद्रे बर्गरचाही संघात समावेश करण्यात आला आहे.
मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स हा सामना वानखेडे स्टेडियमवरील खेळपट्टी क्रमांक ६ वर खेळला जाईल. यापूर्वी, या हंगामात या खेळपट्टीवर दोन सामने खेळले गेले आहेत. हा दुपारचा सामना असल्याने, प्रथम फलंदाजी करणे चांगला पर्याय ठरु शकतो. या मैदानावर हाय- स्कोअरिंग सामने पाहायला मिळाले आहेत. या खेळपट्टीवर २०० पेक्षा जास्त धावा करता येतील असा अंदाज आहे. खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल असेल, परंतु जोरदार वाऱ्याच्या शक्यतेमुळे वेगवान गोलंदाजांना फायदा होऊ शकतो. रविवारी दुपारी मुंबईत काही प्रमाणात पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे कर्णधार प्रथम गोलंदाजी करण्याचा पर्याय निवडू शकतात. तसेच, या मैदानावर दव मोठी भूमिका बजावू शकतो, म्हणून नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणे फायदेशीर ठरेल.
मुंबई इंडियन्स: रायन रिकेल्टन (विकेटकीपर), नमन धीर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (क), विल जॅक्स, कॉर्बिन बॉश, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, एएम गझनफर, रघु शर्मा.
इम्पॅक्ट सबस्टिट्यूट: रोहित शर्मा, मयंक रावत, रॉबिन मिंज, क्रिश भगत, ट्रेंट बोल्ट.
राजस्थान रॉयल्स: यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रियान पराग (क), डोनोवन फरेरा, शुभम दुबे, दासून शनाका, जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर, यशराज पुंजा, ब्रिजेश शर्मा.
इम्पॅक्ट सबस्टिट्यूट: रवींद्र जडेजा, सुशांत मिश्रा, अमन राव पेराला, रवी बिश्नोई, तुषार देशपांडे.
IPL 2026: RCB ची चिंता वाढली; प्लेऑफपूर्वी ‘हा’ स्टार फलंदाज स्पर्धेतून बाहेर, संघासमोर मोठं आव्हान






