Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MI vs RR : धक्कादायक! Mumbai Indians वर फिक्सिंगचा आरोप! पंचांकडून Rohit Sharma ला मदत? नेमकं प्रकरण काय? पहा Video

आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामातील काल झालेल्या ५० व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सचा १०० धावांनी पराभव केला. या सामन्यात रोहित शर्माच्या एलबीडब्ल्यू आउट न देण्यावरून प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 02, 2025 | 10:44 AM
MI vs RR: Shocking! Mumbai Indians accused of fixing! Umpire helps Rohit Sharma? What is the real issue? Watch Video

MI vs RR: Shocking! Mumbai Indians accused of fixing! Umpire helps Rohit Sharma? What is the real issue? Watch Video

Follow Us
Close
Follow Us:

MI vs RR : आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामातील काल झालेल्या ५० व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने उभे  ठाकले होते. या सामन्यात मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सवर १०० धावांनी विजय मिळवला. या सामन्यात एक अनोखा प्रकार घडला आहे. रोहित शर्माला बाद न् देण्यावरून वाद निर्माण झाला आहे.  आयपीएलचा असा कोणताही हंगाम नाही जिथे वाद निर्माण होत नाहीत. अशा वेळी आता मुंबई इंडियन्सवर पुन्हा एकदा फिक्सिंगचा आरोप करण्यात आला आहे. आयपीएलच्या ५० व्या सामन्यात म्हणजेच राजस्थानविरुद्धच्या सामन्यात मुंबईवर हा आरोप करण्यात आला आहे.

वास्तविक या दोन्ही संघांवर या हंगामात फिक्सिंगचा आरोप झालेला आहे. अद्याप मात्र, हे आरोप ते सिद्ध झालेले नाहीत . १ मे, गुरुवार रोजी  झालेल्या सामन्यात, लोकांच्या मते पंचांकडून मुंबईचा माजी कर्णधार रोहित शर्माला मदत करण्यात आली आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरही तूफान व्हायरल होत आहे.

हेही वाचा : MI vs RR : मुंबई इंडियन्ससाठी रोहित शर्माने रचला इतिहास! असा भीम पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू

नेमकं प्रकरण काय?

राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात मुंबईचा स्टार सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने रिव्ह्यू घेतल्यावर आणि नंतर डीआरएसमध्ये नॉट आऊट घोषित केल्यावर प्रश्न निर्माण केले जात आहे. पंचांकडून मुंबईच्या माजी कर्णधाराला मदत करण्यात आल्याचे आरोप केले जात आहेत. रोहित शर्मा आणि रायन रिकेल्टन यांनी मुंबई इंडियन्सला शानदार सुरुवात करून दिली. या दोघांनी संघासाठी शतकी भागीदारी केली. जर रोहित शर्माला डीआरएसची साथ मिळाली नसती तर प्रत्यक्षात काही वेगळा परिणाम दिसून आला असता.

काय घडलं?

राजस्थानचा डावखुरा वेगवान गोलंदाज फजल हक फारुकी गोलंदाजी करत असताना डावाच्या दुसऱ्या षटकात हा प्रकार घडला. या षटकातील पाचवा चेंडू रोहितच्या पॅडवर आदळला आणि पंचांनी त्याला एलबीडब्ल्यू आउट असल्याचे जाहीर केले. रोहितला याबद्दल खात्री नव्हती. तो त्याचा पार्टनर रिकलटनसोबत बोलू लागला आणि त्याने शेवटच्या क्षणी रिव्ह्यू घेण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर तिसऱ्या पंचांनी  बॉल ट्रॅकिंगची मदत घेतली आणि सांगण्यात आले की, चेंडू लेग स्टंपच्या बाहेर पिच झाला होता, त्यामुळे रोहितला बाद देता येत नव्हते आणि म्हणून मैदानावरील पंचांना त्यांचा निर्णय बदलावा लागल. या निर्णयामुळे रोहित शर्मा बाद होता होता बचावला. त्यानंतर त्याने ५३ धावांची शानदार खेळी केली.

RCB fans, forget it, Umpire Indians are fully prepared to win the final with the help of the umpires. BCCI is sitting silently while open fixing is happening. Shame on Mumbai Indians and their team.#MIvsRR #RohitSharma pic.twitter.com/Csf4J0k746

— Priyanshu Verma (@iPriyanshVerma) May 1, 2025

या प्रकारानंतर चांगलाच गोंधळ उडाला.  पंचांनी रोहित शर्माला मदत केली का? अशा शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत. डीआरएस नियमांनुसार, पुनरावलोकन घेण्यासाठी १५ सेकंदांचा वेळ देण्यात आलेला असतो.परंतु, जेव्हा रोहितने रिव्ह्यूसाठी सिग्नल केला तेव्हा टायमर ० सेकंद वेळ दाखवत होता. लोकांचा असा विश्वास आहे की १५ सेकंद हा वेळ पूर्ण झाला होता. म्हणून रोहितचे अपील नाकारण्यात यायला हवे होते. असे बोलले जाता आहे.

हेही वाचा : IPL २०२५ : ‘मी ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी आधीच तयार, पण..’, दुर्लक्ष केलेल्या Suryakumar Yadav ची झळकून आली खंत..

तसेच दुसरा प्रश्न पंचांच्या निर्णयाबद्दलचा पुढे आला होता. बॉल ट्रॅकिंग रिप्लेमध्ये चेंडूचा एक भाग स्टंपच्या रेषेवर असल्याचे दिसत होते. अशा परिस्थितीत, अनेक युजर्संनी प्रश्न उपस्थित केला की लेग स्टंपच्या बाहेरची खेळपट्टी का मानण्यात आली. खर तर, कोणताही वाद नव्हता परंतु नियमाची समज नसणे हे एक कारण होते. समालोचक दीप दासगुप्ता यांनी यावर स्पष्टीकरण देताना म्हटले की,   जेव्हा जेव्हा चेंडू स्टंपच्या अर्ध्या रेषेत दिसतो तेव्हा तो स्टंपवर टाकला गेला असे मानले जात आले आहे. या प्रकरणात तिसऱ्या पंचाचा निर्णय महत्वाचा आणि योग्य होता.

Web Title: Mi vs rr mumbai indians accused of fixing help for rohit sharma from umpires

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2025 | 10:44 AM

Topics:  

  • IPL 2025
  • MI vs RR
  • mumbai indians
  • Rohit Sharma

संबंधित बातम्या

Rohit Sharma: ‘रोज १० किमी धाव…’ रोहित शर्माच्या वनडे निवृत्तीच्या चर्चांवरून ‘हिटमॅन’ला मिळाला फिटनेसचा कडक संदेश
1

Rohit Sharma: ‘रोज १० किमी धाव…’ रोहित शर्माच्या वनडे निवृत्तीच्या चर्चांवरून ‘हिटमॅन’ला मिळाला फिटनेसचा कडक संदेश

विराट कोहली नाही… या 5 कर्णधारांच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकला आशिया कप; पहा संपूर्ण यादी
2

विराट कोहली नाही… या 5 कर्णधारांच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकला आशिया कप; पहा संपूर्ण यादी

देवाल्ड ब्रेविसच्या अश्विनच्या ‘त्या’ विधानामुळे उडाला होता गोंधळ: CSK ला द्यावे लागले स्पष्टीकरण
3

देवाल्ड ब्रेविसच्या अश्विनच्या ‘त्या’ विधानामुळे उडाला होता गोंधळ: CSK ला द्यावे लागले स्पष्टीकरण

रोहित – विराटवर टिका टिपणी केल्यामुळे इरफान पठाणला कॉमेंट्री पॅनलमधून काढलं? स्वतः खेळाडूने सांगितलं सत्य
4

रोहित – विराटवर टिका टिपणी केल्यामुळे इरफान पठाणला कॉमेंट्री पॅनलमधून काढलं? स्वतः खेळाडूने सांगितलं सत्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.