Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mitchell Starc चा भेदक मारा! बांग्लादेशची ‘हवा टाईट’; ६ विकेटसह WTC मध्ये केला ‘हा’ महारिकॉर्ड

Mitchell Starc becomes highest wicket taker in WTC: मिचेल स्टार्कने बांग्लादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत अवघ्या २२ चेंडूंमध्ये पाच विकेट्स घेत इतिहास रचला. तो आता डब्ल्यूटीसीमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 22, 2026 | 03:13 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • मिचेल स्टार्कचा भेदक मारा
  • ६ विकेट घेत WTCमध्ये बनला नंबर-१ गोलंदाज
  • नॅथन लायनला टाकला मागे
ऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना मॅके येथे खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजांनी कर्णधार कमिन्सचा निर्णय योग्य ठरवला. वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, त्याने एकट्याने बांग्लादेशच्या सहा फलंदाजांना पव्हेलियनचा रस्ता दाखवला. स्टार्कने या डावात त्याने सहा विकेट्स घेऊन इतिहास रचला आहे. तो आता जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये (WTC) सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज बनला आहे.

Neeraj Chopra चं जबरदस्त कमबॅक! सीझन बेस्ट थ्रोसह Lausanne Diamond League मध्ये दुसऱ्या स्थानावर

WTC मध्ये मिचेल स्टार्कने कामगिरी

मिचेल स्टार्कने आतापर्यंत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये ५६ सामने खेळले आहे. यामध्ये त्याने २३० विकेट्स घेतले आहेत. या बाबतीत स्टार्कने नॅथन लायनला मागे टाकले आहे. लायनने आतापर्यंत डब्ल्यूटीसीमध्ये ५७ सामन्यांत २२५ विकेट्स घेतले आहेत. याच सामन्यात, पहिल्या डावात ३ विकेट्स घेऊन कर्णधार पॅट कमिन्सने सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत नॅथन लायनसोबत संयुक्तपणे दुसरे स्थान पटकावले आहे. हे ते तीन गोलंदाज आहेत ज्यांनी आतापर्यंत डब्ल्यूटीसीमध्ये २०० किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतले आहेत. भारताचा माजी दिग्गज फिरकी गोलंदाज आर अश्विन १९५ विकेटसह चौथ्या क्रमांकावर आहे.

स्टार्कने २२ चेंडूंमध्ये घेतले ५ विकेट्स

मॅके येथे खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्यात अवघ्या २२ चेंडूंमध्ये ५ विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या विशेष यादीत मिचेल स्टार्कने पुन्हा एकदा आपले नाव नोंदवले आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ५ विकेट्स घेण्याचा विश्वविक्रमही त्याच्या नावावर आहे. त्याने २०२५ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध अवघ्या १५ चेंडूंमध्ये हा पराक्रम केला होता. कसोटी सामन्यांमध्ये सर्वात जलद ५ विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या या यादीत ऑस्ट्रेलियाचा अर्नी टॉशक दुसऱ्या, तर इंग्लंडचा स्टुअर्ट ब्रॉड तिसऱ्या स्थानावर आहे. या खेळीनंतर स्टार्कचे नाव पाचव्या क्रमांकावर नोंदवले गेले आहे.

बांग्लादेश ६४ धावांवर सर्वबाद

ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांग्लादेश कसोटी सामन्यात, बांग्लादेशचा संघ पहिल्या डावात केवळ ६४ धावांवर सर्वबाद झाला. शरीफुल इस्लाम संघासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने १९ चेंडूंमध्ये १४ धावा केल्या. या डावात चार फलंदाज शून्यावर बाद झाले. ऑस्ट्रेलियाकडून स्टार्कने सहा, पॅट कमिन्सने तीन आणि जोश हेझलवूडने एक विकेट घेतला. मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात बांग्लादेशने ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवला होता.

भारताच्या लेकीचा कुस्तीत डंका! काजल पुन्हा विश्वविजेती; U20 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सलग दुसरे ‘सुवर्ण’

Web Title: Mitchell starc wtc highest wicket taker 6 wickets australia vs bangladesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2026 | 03:13 PM

Topics:  

  • australia vs bangladesh
  • Mitchell Starc
  • WTC 2027
  • WTC Points Table

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.