Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 18 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs NZ: वेगवान वारे, 15 मिलीमीटर हिरवे गवत अन्…; वेलिंगटनमध्ये Team India ची खडतर परीक्षा

IND Vs NZ: न्यूझीलंडच्या या दौऱ्यावर इथले हवामान आणि येथील खेळपट्टी भारतीय संघाची परीक्षा घेणार आहे. वेलिंगटनच्या वातावरणात भारतीय फलंदाज आणि गोलंदाज कशी कामगिरी करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 18, 2026 | 04:30 PM
शुभमन गिल करणार भारतीय संघाचे नेतृत्व 

शुभमन गिल करणार भारतीय संघाचे नेतृत्व 

Follow Us
Follow Us:
  • उद्या सुरू होणार भारत-न्यूझीलंड पहिली टेस्ट 
  • शुभमन गिल करणार भारतीय संघाचे नेतृत्व 
  • वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत होणार सिरीज 
IND Vs NZ: वनडे सिरीज आणि टी 20 सिरीज जिंकल्यावर भारतीय संघ आता टेस्ट सिरीज जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध टेस्ट सिरीज खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. उद्यापासून पहिला सामना सुरू होणार आहे. ही टेस्ट सिरीज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतर्गत खेळवली जाणार आहे. उद्या पहिला सामना हा वेलिंग्टन येथे होणार आहे. स्टेडियम आणि पीच रिपोर्ट जाणून घेऊयात.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दोन सामन्यांच्या टेस्ट सिरीजचा उद्यापासून शुभारंभ होणार आहे. सिरीजचा पहिला सामना वेलिंगटनच्या ऐतिहासिक बेसिन रिझर्व्ह मैदानावर खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार पहाटे 3.30 वाजता हा सामना सुरू होणार आहे. जसप्रीत बुमराह तब्बल वर्षभराने टीम इंडियाकडून खेळताना दिसणार आहे.

IND vs NZ Test: शुभमनचा प्लान तयार! ODI पेक्षा वेगळाच संघ उतरणार मैदानात, बुम बुम बुमराहचाही जलवा

न्यूझीलंडच्या या दौऱ्यावर इथले हवामान आणि येथील खेळपट्टी भारतीय संघाची परीक्षा घेणार आहे. वेलिंगटनच्या वातावरणात भारतीय फलंदाज आणि गोलंदाज कशी कामगिरी करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत ही सिरीज खेळवली जाणार असल्याने दोन्ही संघ ताकदीने मैदानात उतरणार आहेत.

काय सांगतो पीच रिपोर्ट?

आगामी सामन्याच्या सुरुवातीलाच खेळपट्टी कशी असेल याचा एक रिपोर्ट समोर आला आहे. पिच क्युरेटर टॉम डेवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सामन्याच्या पहिल्या दिवशी विकेटवर सुमारे १५ मिलीमीटर हिरवे गवत ठेवले जाण्याची शक्यता आहे. सामन्याच्या पहिल्या दोन दिवसांत वेगवान गोलंदाजांना प्रचंड सीम आणि स्विंग मूव्हमेंट मिळण्याची शक्यता आहे. अशा कठीण परिस्थितीत नवीन बॉलचा सामना करणे आणि क्रीजवर टिकून राहणे फलंदाजांसाठी खऱ्या अर्थाने कठीण असणार आहे.

या खेळपट्टीवर पहिल्या डावाचा सरासरी स्कोअर ३१३ रन्स इतका आहे. ज्यामुळे पहिल्या डावात या ठिकाणी मोठी धावसंख्या होऊ शकते. सामन्याच्या शेवटच्या दिवशी जुन्या आणि कोरड्या झालेल्या पिचवर फिरकीपटूंनाही टर्न मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सुरुवातीला वेगवान गोलंदाजांची कसोटी पाहणारी ही खेळपट्टी जसजशी जुनी होईल, तसतशी ती फलंदाजांना साथ देऊ शकते.

IND Vs NZ: राडा होणार, पोरं नाय ऐकणार! भारताविरुद्ध किवींचा कसोटी संघ जाहीर, ‘हा’ खेळाडू करणार नेतृत्व

वेलिंगटनच्या हवामानाबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. येथील वातावरण क्रिकेटपटूंसाठी मोठे आव्हान ठरण्याची शक्यता आहे. येथील तापमान १६° से. ते १७° से. दरम्यान राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वेलिंगटनची ओळख तिथल्या वेगवान वाऱ्यांसाठी आहे. या वाऱ्यांमुळे आणि ढगाळ वातावरणामुळे वेगवान गोलंदाजांना हवेत अतिरिक्त स्विंग मिळण्याची शक्यता आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना कुठे खेळवला जाणार आहे?

    Ans: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना न्यूझीलंडमधील वेलिंग्टन येथे होणार आहे.

  • Que: पहिला कसोटी सामना किती वाजता सुरू होणार आहे?

    Ans: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना भारतीय वेळेनुसार पहाटे 3:30 वाजता सुरू होणार आहे.

Web Title: Ind vs nz wellington stadium pitch report shubhman gill wtc test series tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2026 | 04:30 PM

Topics:  

  • IND vs NZ
  • Shubhman Gill
  • Test Series
  • WTC 2027

संबंधित बातम्या

IND vs NZ Test: शुभमनचा प्लान तयार! ODI पेक्षा वेगळाच संघ उतरणार मैदानात, बुम बुम बुमराहचाही जलवा
1

IND vs NZ Test: शुभमनचा प्लान तयार! ODI पेक्षा वेगळाच संघ उतरणार मैदानात, बुम बुम बुमराहचाही जलवा

Gurnoor Brar ला अति आक्रमकपणाचे सेलिब्रेशन नडले; ICC केली ‘ही’ मोठी कारवाई
2

Gurnoor Brar ला अति आक्रमकपणाचे सेलिब्रेशन नडले; ICC केली ‘ही’ मोठी कारवाई

IND Vs NZ: मोठा हादरा, मोठं नुकसान; टेस्ट सिरीज सुरू होण्याअगोदरच ‘हा’ खेळाडू झाला बाहेर, आता…
3

IND Vs NZ: मोठा हादरा, मोठं नुकसान; टेस्ट सिरीज सुरू होण्याअगोदरच ‘हा’ खेळाडू झाला बाहेर, आता…

India Record: 58 वर्षात 25 कसोटी सामने अन् केवळ 5 मध्ये यश, न्यूझीलंडमध्ये भयानक आहे भारतीय संघाचा रेकॉर्ड
4

India Record: 58 वर्षात 25 कसोटी सामने अन् केवळ 5 मध्ये यश, न्यूझीलंडमध्ये भयानक आहे भारतीय संघाचा रेकॉर्ड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.