फोटो सौजन्य – X (Sony Sports Network)
मोहम्मद सिराज कॅच : भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये काल मालिकेचा दुसरा सामना पार पडला त्यानंतर भारताच्या संघाने पहिल्या सामन्यामध्ये केलेल्या चुका या सामन्यात सुधारल्या आणि त्यांना या सामन्यात विजय हाती लागला. या विजयासह भारताच्या संघाने मालिकेमध्ये 1-1 अशी बरोबरी केली आहे. दुसऱ्या मॅचमध्ये भारताच्या फलंदाजांनी धुव्वादार कामगिरी केली त्यामुळे भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभी करण्यात यश मिळाले, त्याचबरोबर गोलंदाजीदेखील चांगली केली होती. पण पहिल्या सामन्यामध्ये अनेक फिल्डरकडून कॅच सुटले होते आणि त्यामुळे भारताच्या संघाचं पराभवाचे कारण देखील असु शकते.
आता पाच दिवस झालेल्या सामन्यात भारताची चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. मागील सामन्यामध्ये भारताचा फलंदाज यशस्वी जयस्वाल याने अनेक कॅच सोडले होते. आता मोहम्मद सिराज याचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. भारताकडून शुभमन गिल, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज यांनी शानदार कामगिरी केली. या खेळाडूंच्या बळावरच संघ विजय नोंदवण्यात यशस्वी झाला. सिराजने सामन्यात एक अतिशय शानदार झेल घेतला, ज्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रवींद्र जडेजाने इंग्लंडविरुद्धच्या डावातील ६४ वे षटक टाकले. त्याने या षटकातील पाचवा चेंडू जोस टंगला टाकला. टंगला हा चेंडू फ्लिक करायचा होता. पण चेंडू त्याच्या बॅटच्या कडेला लागला आणि मोहम्मद सिराजकडे गेला, जिथे त्याने तो पकडण्यात कोणतीही चूक केली नाही. सिराजने हवेत उडी मारली आणि दोन्ही हात पुढे केले आणि चेंडू त्याच्या एका हातात अडकला. तो जमिनीवर पडला, पण चेंडू त्याच्या हातातून निसटला नाही आणि सिराजने तो झेल सुपरमॅन सारखा घेतला आणि त्याने चेंडू पकडला.
WHAT. A. GRAB. 🥵
First with the ball…now in the field! Mohammed Siraj continues to impress at Edgbaston. ✨ #SonySportsNetwork #GroundTumharaJeetHamari #ENGvIND #NayaIndia #DhaakadIndia #TeamIndia #ExtraaaInnings pic.twitter.com/rsQeJFNM1K
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) July 6, 2025
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात मोहम्मद सिराजने शानदार गोलंदाजी केली. पहिल्या डावात त्याने ६ बळी घेतले आणि इंग्लंडच्या खालच्या फळीला उद्ध्वस्त करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. पहिल्या डावात त्याने जो रूट आणि बेन स्टोक्सचे सलग चेंडूंवर बळी घेतल्याने त्याला हॅटट्रिकची संधी मिळाली. पण जेमी स्मिथने हॅटट्रिकचा चेंडू चौकारासाठी पाठवला आणि तो हॅटट्रिक घेऊ शकला नाही. यानंतर, त्याने दुसऱ्या डावात एक बळी घेतला आणि संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
भारताच्या संघाचा पुढील सामना हा लाॅर्डस मैदानावर खेळवला जाणार आहे हा सामना भारतीय संघासाठी महत्वाचा असणार आहे. हा सामना 10 जूलैपासुन सुरु होणार आहे.