फोटो सौजन्य – X
जसप्रीत बुमराहचे होणार पुनरागमन : पहिल्या सामन्यामध्ये भारताच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता मोठी धावसंख्या उभारूनही इंडिया इंडियाच्या हाती पराभव लागला होता. बीसीसीआयने फार आधीच सांगितले होते की वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह फक्त इंग्लंड दौऱ्यावर तीनच सामने खेळणार आहे. पहिला सामन्यात तो प्लेइंग इलेव्हनचा भाग होता पण ती मिनी याला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यांमध्ये त्याला विश्रांती देण्याचं निर्णय भारतीय संघाने घेतला होता.
टीम इंडियाने जसप्रीत बुमराह याच्या अनुपस्थितीत आकाशदीप आणि मोहम्मद सिराज यांच्या जोरावर भारताच्या संघाने सामना जिंकला. सामना जिंकल्यानंतर भारताचा कर्णधार गिल याने आता पुढील कसोटी सामन्यांमध्ये जसप्रीत बुमराह याचे पुनरागमन होणार आहे असा मोठा खुलासा केला आहे. मुलाखतीमध्ये संवाद साधताना शुभमन गिल म्हणाला की, लॉर्ड्स कसोटीसाठी जसप्रीत बुमराह निश्चितच परतेल असं त्याने स्पष्ट सांगितले आहे.
Thailand vs India : भारताच्या महिला फुटबाॅल संघाने रचला इतिहास, आशिया कपसाठी मिळवली पात्रता
आता जसप्रीत बुमराह संघामध्ये परतल्यानंतर कोणत्या खेळाडूंना बाहेर केले जाणार? त्याचबरोबर कोणत्या खेळाडूंना कायम ठेवली जाणार याकडे लक्ष देणे देखील महत्वाचे ठरेल. प्रसिद्ध कृष्णाला मागील दोन सामन्यांमध्ये स्थान मिळाले पण तो फार काही चांगले कामगिरी करू शकला नाही पहिल्या सामन्यात त्यांने विकेट्स घेतले होते पण संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.
Shubman Gill said, “Jasprit Bumrah will definitely be back for the Lord’s Test”. pic.twitter.com/wbRP2L1vR0 — Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 6, 2025
दुसऱ्या सामन्यांमध्ये जसप्रीत बुमराह यांच्या जागेवर जसप्रीत बुमराह यांच्या जागेवर आकाशदीप याला संघामध्ये स्थान मिळाले होते. त्याने संघासाठी दहा विकेट्स घेतले त्यामुळे त्याला संघामध्ये कायम ठेवली जाऊ शकते याची जागेवर प्रसिद्ध कृष्णा त्याचबरोबर नितेश कुमार रेड्डीने देखील फारच खराब कामगिरी केली त्यामुळे या दोघांना बाहेर करून दोन जागा खेळाडूंना स्थान दिले जाऊ शकते.






