
Syed Mushtaq Ali Trophy : अंडर-19 आशिया चषकात हिरो ठरलेल्या मोहित उल्वाची सौराष्ट्र संघात वर्णी
Syed Mushtaq Ali Trophy : मेन्स अंडर-19 आशिया चषक 2026 च्या फायनलमध्ये भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावल्यानंतर दोन दिवसांनी वेगवान गोलंदाज, अष्टपैलू मोहित उल्वाची सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी सौराष्ट्रच्या सीनियर पुरुष संघात वर्णी लागली.
सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (SCA)ने सोमवारी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटच्या माध्यमातून ही माहिती दिली. ते त्यात म्हणाले की, मोहित उल्वा इंदौरमध्ये सुरू असलेल्या सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2026-27 च्या लीग सामन्यासाठी सौराष्ट्र संघात समाविष्ट होणार आहे.
शेअर करण्यात आलेल्या छायाचित्रात उल्वा हा कर्णधार जयदेव उनाडकट, मुख्य प्रशिक्षक नीरज ओदेदरा आणि प्रशिक्षक शेल्डन जॅक्सनसोबत उभं असल्याचे पाहण्यास मिळत आहे. दरम्यान, इंदौरच्या द डेली कॉलेज ग्राउंडमध्ये हरियाणाविरुद्ध सुरू असलेल्या सामन्यात उल्वाला संघात जागा मिळाली नाही.
परंतु सौराष्ट्रच्या एलीट ग्रुप ‘बी’ मध्ये अद्याप अनेक सामने शिल्लक आहेत, अशात अपेक्षा आहे की, या सामन्यात संधी मिळत उल्वा सीनियर पुरुष टी-20 मध्ये डेब्यू करू शकेल.
उल्वाला ही संधी मस्कटच्या अलम अमीरातमधील मिनिस्ट्री टर्फ ग्राउंड-2 वर खेळवण्यात आलेल्या अविस्मरणीय सामन्यानंतर मिळाली. जिथे भारताने अंडर-19 आशिया चषक फायनलमध्ये पाकिस्तानचा पराभव करत जेतेपदाला गवसणी घातली होती.
पाकिस्तानकडून मिळालेल्या 338 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना एक वेळ भारताची अवस्था 8 बाद 252 धावा अशी होती. ज्यानंतर 10 व्या क्रमांकावर खेळण्यास आलेल्या उल्वाने 26 चेंडूंत नाबाद 49 धावा केल्या, ज्यात त्याचा स्ट्राइक रेट 188 पेक्षा जास्त होता.
भारताला विजयासाठी अखेरच्या चेंडूवर 3 धावांची गरज होती. अशात उल्वाने मिड ऑफवरून चौकार ठोकत भारताला विजय मिळवून दिला. त्याच्या या चौकारानंतर भारतीय खेळाडूंसह क्रिकेट चाहतेही आनंदाने जल्लोष करताना पाहण्यास मिळाले.
उल्वाने मनल चौहानच्या साथीने नवव्या विकेटसाठी 35 चेंडूंत 57 धावांची भागीदारी रचली आणि शेवटचा फलंदाज असलेल्या चिगुरपती वँकटासोबत 16 चेंडूंत नाबाद 30 धावांची भागीदारी रचली.
या काळात अर्जुन राजपूत ज्याने आशिया चषकातील गट फेरीतील सामन्यात पाकिस्तानविरुद्ध शतक ठोकले होते, त्याला स्थानिक टी-20 स्पर्धेसाठी पंजाबने आपल्या संघात समाविष्ट केले आहे. सौराष्ट्रप्रमाणेच 2023/24 चा विजेता पंजाब संघालाही या स्पर्धेत एलीट ग्रुप ‘बी’ मध्ये ठेवण्यात आले आहे.
Ans: मोहित उल्वाची सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2026-27 साठी सौराष्ट्रच्या सीनियर पुरुष संघात निवड झाली आहे.
Ans: मोहितने पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात 26 चेंडूंत नाबाद 49 धावांची आक्रमक खेळी केली.
Ans: भारताला शेवटच्या चेंडूवर विजयासाठी तीन धावांची गरज होती. मोहितने मिड ऑफच्या दिशेने चौकार मारत भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.